Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीवरुन सुनावणी

Marathi breaking live marathi headlines - संविधानाच्या कलम २०० आणि २०१ अंतर्गत राज्यपालांच्या अधिकारांचा अर्थ लावण्यासाठी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे एक संदर्भ पाठवला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 25, 2025 | 11:11 AM
LIVE
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:
  • 25 Nov 2025 11:55 AM (IST)

    25 Nov 2025 11:55 AM (IST)

    इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, काळ्या राखेचा विषारी लोट भारतात दाखल

    २३ नोव्हेंबर रोजी इथिओपियाच्या हेली गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर निघालेली ज्वालामुखीची राख आता ओमान आणि अरबी समुद्रमार्गे भारतीय हवाई क्षेत्रात पोहोचली आहे. ही राख सुमारे ३०,०००-३५,००० फूट उंचीवर तरंगत आहे. विमानांसाठी ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेता, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) SIGMET इशारा दिला आहे.

     

  • 25 Nov 2025 11:45 AM (IST)

    25 Nov 2025 11:45 AM (IST)

    रोहित पवारांचा मंत्री गिरीश महाजनांवर घणाघात

    आमदार रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा खरपूस समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवार यांनी लिहिले आहे की, मा. गिरीश महाजन साहेब, आपल्याला आपल्या कर्तृत्वावर एवढा विश्वास होता तर गुंडगिरी करून समोरच्या उमेदवारांना पकडून आणून बळजबरीने अर्ज मागे का घ्यायला लावले? विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवण्याची हिम्मत का दाखवली नाही? एवढं मोठं मंत्रिपद असूनही आपण उत्तर महाराष्ट्र तर सोडा जळगावसाठी काय केलं, एकतरी उद्योग आणला का? जळगाव आपलं घर असताना आपलं सगळं चित्त फक्त नाशिककडंच का? आपल्या कार्यकाळात भकास असलेला विकास गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण मोटारसायकलवरून जात असतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने बघितलाच आहे. आता मंत्रिपद आहे तर किमान आपल्या भागाला, आपल्या जिल्ह्याला तरी फायदा करून द्या… तूर्तास एवढंच! असा टोला त्यांनी लगावला आहे.

  • 25 Nov 2025 11:45 AM (IST)

    25 Nov 2025 11:45 AM (IST)

    कालीमातेला 'मदर मेरी'ची वेशभूषा केल्याप्रकरणी पुजाऱ्याला अटक

    चेंबूर-वाशी नाका येथे 'मदर मेरी' असे वेशभूषा केलेले कालीमातेचे शिल्प आढळल्याने मोठा वाद निर्माण झाला. भाविक संतप्त झाले आणि पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. पुजाऱ्याने दावा केला की देवी त्याच्या स्वप्नात दिसली, तर स्थानिकांनी असा आरोप केला की त्याला स्वप्नात दिसण्यासाठी पैसे देण्यात आले होते. एफआयआर दाखल करण्यात आला आहे, पुजाऱ्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून तपास सुरु आहे.

  • 25 Nov 2025 11:25 AM (IST)

    25 Nov 2025 11:25 AM (IST)

    अयोध्येमध्ये PM मोदींचा रोड शो सुरु

    अयोध्येतील प्रभू श्री रामांच्या मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणाऱ्या या ध्वजारोहणासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांचा अयोध्येमध्ये रोड शो पार पडत आहे.

  • 25 Nov 2025 11:15 AM (IST)

    25 Nov 2025 11:15 AM (IST)

    धर्म ध्वजरोहणासाठी अयोध्यानगरी पुन्हा सजली

    श्री राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे प्रभू श्री रामांचे मंदिर बांधकाम पूर्ण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिखरावर धर्म ध्वजरोहण करण्यात येणार आहे. यासाठी अयोध्यानगरी सजली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

  • 25 Nov 2025 11:11 AM (IST)

    25 Nov 2025 11:11 AM (IST)

    मुंबई कफ पेड येथे मेट्रो बंद

    मुंबईत कफ परेड येथे मेट्रो बंद पडली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो बंद पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिक बिघाडामुळे अॅक्वा लाईन उशिराने पिक अवर मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी हैराण, मेट्रो प्रत्येक स्टेशन वर नेहमीप्रक्षा जास्त वेळ थांबत पुढे जात असल्याची प्रवाशांची तक्रार. कफ परेड, सिद्धिविनायक या स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाश्यांचा संताप व्यक्त केला.

  • 25 Nov 2025 11:05 AM (IST)

    25 Nov 2025 11:05 AM (IST)

    सुसंस्कृत राजकारणाची पायाभरणी करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी

    महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी राज्यामध्ये सुसंस्कृत राजकारणाची पायाभरणी केली. काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. दिल्ली येथे हृदयविकाराच्या झटका आल्याने य़शवंतराव चव्हाण यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

  • 25 Nov 2025 10:59 AM (IST)

    25 Nov 2025 10:59 AM (IST)

    किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार करून खून

    गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नागपुरात एक संतापजनक घटना घडली. मित्रांसोबत पिकनिकसाठी आलेल्या तरुणाचा लायटरवरून वाद झाला. याच वादातून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात आरोपींनी चाकूने सपासप भोसकून त्याचा जीव घेतला. तसेच एकजण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे.

  • 25 Nov 2025 10:52 AM (IST)

    25 Nov 2025 10:52 AM (IST)

    भारत सरकार लवकरच जारी करणार नवीन CNAP सिस्टिम!

    भारत सरकार लवकरच नवीन CNAP सिस्टिम सुरु करण्याचा विचार करत आहे. सध्या या सिस्टिमची चाचणी सुरु आहे आणि लवकरच ही सिस्टिम सर्व भारतीयांसाठी सुरु केली जाणार आहे. या सिस्टिममुळे यूजर्सचा कॉलिंग अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. विशेषत: जेव्हा एखाद्या अनोळखी नंबरवरून कॉल येईल, तेव्हा या नवीन सिस्टिमचा यूजर्सना फायदा होणार आहे. CNAP म्हणजेच Calling Name Presentation.

  • 25 Nov 2025 10:46 AM (IST)

    25 Nov 2025 10:46 AM (IST)

    हजारो वर्षानंतर इथिओपियात ज्वालामुखीचा विस्फोट

    इथिओपियामध्ये १२ हजार वर्षानंतर पहिल्यांदाच ज्वालामुखीचा विस्फोट झाला आहे. हैली गुब्बी या ज्वालामुखीचा विस्फोट झाला असून हवेत राख आणि ढगाचे लोट पसरले आहे. ही राख, ओमान, अरब सागरामार्गे भारताच्या नॉर्थ साइडपर्यंत पोहचली आहे. याचा भारताच्या हवाई क्षेत्रावर परिणाम झाला असून अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही राख सुमारे ३०-३५ हजार फूट उंचीवर पसरली आहे. यामुळे हवाई सुरक्षा लक्षात घेत वाहतूक  महासंचालनाने (DGCA) SIGMET अलर्ट जारी केला आहे.

  • 25 Nov 2025 10:39 AM (IST)

    25 Nov 2025 10:39 AM (IST)

    उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाडला जामीन

    बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी ९ सप्टेंबर रोजी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील घरासमोर आपल्या गाडीत रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून नाव समोर आल्याने पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ती जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. अखेर तिच्या जामीन अर्जावर सोमवारी बार्शी सत्र न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला.

  • 25 Nov 2025 10:31 AM (IST)

    25 Nov 2025 10:31 AM (IST)

    हे स्पर्धक टिकट टू फिनाले टास्कसाठी बनले दावेदार

    BBTak ने त्याच्या आधीच्या अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये टिकट टू फिनाले टास्कमधील स्पर्धकांची नावे उघड झाली होती. पोस्टनुसार, अशनूर कौर, प्रणीत मोरे, गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट हे टिकट टू फिनाले टास्कसाठी दावेदार आहेत. तथापि, अशनूरच्या नावाने सर्वांना आश्चर्य वाटले, कारण सलमान खानने स्वतः म्हटले होते की अशनूर गेममध्ये चांगली कामगिरी करत नव्हती.

  • 25 Nov 2025 10:24 AM (IST)

    25 Nov 2025 10:24 AM (IST)

    हेमा मालिनीला ना मिळणार संपत्ती, ना ही पेन्शन

    ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. २४ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री शोकात बुडाली आहे. धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी देखील खूप दुःखी दिसल्या. तसेच धर्मेंद्र यांनी त्यांच्या मागे कोटींची संपत्ती ठेवली आहे. धर्मेंद्र त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. तसेच आता या संपत्तीचा वारस कोण होणार? आणि हेमा मालिनी यांना याचा वाटा मिळणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

  • 25 Nov 2025 10:16 AM (IST)

    25 Nov 2025 10:16 AM (IST)

    ट्रम्पचं आर्थिक साम्राज्य धुळीस!

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनमध्ये घसरण झाल्याने मोठा फटका बसला आहे. यामुळे ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 9800 कोटींची घसरण झाली आहे. यामुळे त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. जवळपास डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेटवर्थमध्ये 1.1 अब्ज डॉलर्सने घसरण झाली असून याचे मुख्य कारण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झालेली घसरण आहे.

  • 25 Nov 2025 10:07 AM (IST)

    25 Nov 2025 10:07 AM (IST)

    IND vs SA : टीम इंडिया मोठ्या संकटात!

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका आतापर्यंत टीम इंडियासाठी पूर्णपणे एकतर्फी आणि लाजिरवाणी ठरली आहे. पहिली कसोटी ३० धावांनी गमावल्यानंतर, दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाजी कोसळली. तीन डावांमध्ये, भारताने फक्त एकदाच २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि तोही फक्त २०१ धावांनी. सर्वात धक्कादायक म्हणजे, भारतीय संघाने या तीन डावांमध्ये एकही शतक केलेले नाही. शिवाय , फक्त एक अर्धशतक केले आहे, तेही गुवाहाटी कसोटीच्या पहिल्या डावात ५८ धावांवर बाद झालेल्या यशस्वी जयस्वालने.

  • 25 Nov 2025 09:59 AM (IST)

    25 Nov 2025 09:59 AM (IST)

    चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

    Kolhapur News:  महायुती सरकारमधील तीन पक्षांमध्ये सध्या अंतर्गत उफाळल्याचे दिसून येत आहे. एकीकडे भाजप आणि शिंदे गटात संघर्ष सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद रंगल्याचे दिसत आहे. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये आयोजित प्रचार सभेत भाजप आमदार चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कडवट इशारा दिल्याने राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 25 Nov 2025 09:55 AM (IST)

    25 Nov 2025 09:55 AM (IST)

    निवडणुकीतील आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त करत निवडणुका रोखण्याचा इशारा दिला. त्यामुळे निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • 25 Nov 2025 09:54 AM (IST)

    25 Nov 2025 09:54 AM (IST)

    इथिओपियातील ज्वालामुखीचा उद्रेक; काळी विषारी राखेचा लोट भारतात पसरला

    २३ नोव्हेंबर रोजी इथिओपियातील हैली गुब्बी ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर निर्माण झालेली ज्वालामुखीची राख आता ओमान आणि अरबी समुद्र मार्गे भारतीय हवाई क्षेत्रात पोहोचली आहे. ही राख सुमारे ३०,००० ते ३५,००० फूट उंचीवर तरंगत असून विमानांसाठी संभाव्य धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे डीजीसीएने सिग्मेटचा इशारा जारी केला आहे.

    हैली गुब्बी ज्वालामुखीतून निघणारा दाट काळा धूर भारताच्या आकाशात प्रवेशला असून त्याचा परिणाम म्हणून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही राख राजस्थान, हरियाणा, दिल्लीसह उत्तर भारतात वेगाने पसरत आहे. मात्र, राखेची उंची जास्त असल्याने जमिनीवरील किंवा सामान्य नागरिकांवरील थेट परिणाम तुलनेने मर्यादित राहत आहे.

  • 25 Nov 2025 09:48 AM (IST)

    25 Nov 2025 09:48 AM (IST)

    एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन

    भारतीय रेल्वे हा जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक मानला जातो. दररोज कोट्यवधी प्रवासी विविध गंतव्यस्थानी जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. रेल्वे गाड्यांसोबतच देशातील काही रेल्वे स्थानकेही त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. अशाच एका स्थानकाबद्दल येथे माहिती देत आहोत, जिथून भारताच्या जवळपास प्रत्येक दिशेला जाण्यासाठी ट्रेन मिळू शकते. विशेष म्हणजे हे स्टेशन उत्तर प्रदेशात आहे.

  • 25 Nov 2025 09:38 AM (IST)

    25 Nov 2025 09:38 AM (IST)

    सांगलीच्या आजी-माजी खासदार, आमदारांना वसुली नोटीस

    सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहारातील ८१ कोटी ९१ लाखांच्या वसुलीसाठी ३० एप्रिल अखेर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश विभागीय सह निबंधकांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांना दिले आहेत. याप्रकरणी बँकेच्या ३८ आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बुधवारी (दि.२६) हजर राहण्याची नोटीस प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बजावली आहे.

  • 25 Nov 2025 09:28 AM (IST)

    25 Nov 2025 09:28 AM (IST)

    पंतप्रधान मोदी सनातनच्या शिखरावर आज फडकवणार भगवा ध्वज

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे भव्य असे राम मंदिर उभारण्यात आले आहे. या राम मंदिरात आता एक वैभवशाली सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवणार आहेत. हा भव्य ध्वजारोहण सोहळा परंपरा, श्रद्धा आणि राष्ट्रवादाचा एक अनोखा संगम असेल. ध्वजारोहणाचा शुभ काळ सकाळी ११:५८ ते दुपारी १२:३० पर्यंत आहे. त्यामुळे या 32 मिनिटांत हा सोहळा पार पडेल, अशी माहिती दिली जात आहे.

  • 25 Nov 2025 09:18 AM (IST)

    25 Nov 2025 09:18 AM (IST)

    हे आहेत आजचे रिडीम कोड्स

    • MCPW2D1U3XA3
    • X99TK56XDJ4X
    • CT6P42J7GRH50Y8
    • YW2B64F7V8DHJM5
    • VQRB39SHXW10IM8
    • ZRJAPH294KV5
    • VQRB39SHXW10IM8
    • NRD8L6Y7M4E29U1
    • CT6P42J7GRH50Y8
    • YW2B64F7V8DHJM5
  • 25 Nov 2025 09:05 AM (IST)

    25 Nov 2025 09:05 AM (IST)

    भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेसाठी संघ जाहीर, केएल राहुल कॅप्टन

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आगामी वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाकडून संघ जाहीर करण्यात आले आहेत. भारताच्या संघात एक मोठा बदल दिसून आला आहे, कारण शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले आहे. यामुळे केएल राहुलला भारतीय संघाचे कॅप्टन नियुक्त करण्यात आले आहे.

    विशेष म्हणजे, गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दोन सलामीवीरांची निवड केली आहे - ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल. या दोन्ही युवा खेळाडूंना त्यांच्या चांगल्या फॉर्ममुळे संघात स्थान मिळाले आहे. शुभमन गिलच्या दुखापतीमुळे आता गायकवाड आणि जैस्वाल यांच्यात चुरस रंगणार आहे, कारण तेच आता रोहित शर्माचा परफेक्ट सलामी जोडीदार ठरू शकतात.

  • 25 Nov 2025 09:00 AM (IST)

    25 Nov 2025 09:00 AM (IST)

    Canada Bill C-3 : आनंदाची बातमी! भारतीयांसाठी कॅनडात नागरिकत्वाचा मार्ग खुला

    कॅनडात( Canada) राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी आणि ऐतिहासिक ठरणारी घटना घडली आहे. कॅनडाच्या संसदेत सादर केलेले विधेयक C-3 अधिकृतपणे मंजूर झाले असून त्याची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आहे. या बदलामुळे कॅनडात राहत असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या भावी पिढ्यांसाठी नागरिकत्व मिळवणे आता अधिक सोपे, न्याय्य आणि स्पष्ट मार्गाने शक्य होणार आहे.

  • 25 Nov 2025 08:53 AM (IST)

    25 Nov 2025 08:53 AM (IST)

    कोल्हापुरात निवडणूक खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, विवाहितेचा गळफास

    कोल्हापुरात एका विवाहित महिलेच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्हा तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कौसर गरगरे नावाच्या 30 वर्षीय विवाहित महिलेने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तिच्या आत्महत्येमागे निवडणूक खर्चासाठी माहेरकडून तब्बल दहा लाख रुपये आणण्याचा दबाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे

    वाचा सविस्तर- कोल्हापूर हादरलं! निवडणूक खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा, विवाहितेचा गळफास

  • 25 Nov 2025 08:50 AM (IST)

    25 Nov 2025 08:50 AM (IST)

    चंद्रकांत पाटलांचा अजित पवार यांना टोला: ‘तिजोरीचा मालक आम्हीच’

    राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असाव्यात, पण तिजोरीचा मालक आपल्या हातातच आहे, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी अजित पवार यांच्यावर केला आहे. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये प्रचार सभेच्या शुभारंभाच्या वेळी चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केले. राज्यातील सरकारी निधीच्या वाटपावरून सत्ताधाऱ्यांमध्ये तणाव वाढले असून, अजित पवार यांनी दावा केला होता की, “राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत आणि निधी कुणाला द्यायचा हे देखील आपल्यावरच अवलंबून आहे.” यावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. “तुम्ही तिजोरीच्या चाव्या ठेवलेल्या असाल, तरी त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही, आणि जर ती उघडली, तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहितीच आहे,” असा खोचक टोला चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना लगावला.

  • 25 Nov 2025 08:45 AM (IST)

    25 Nov 2025 08:45 AM (IST)

    Vivah Panchami: विवाहच्या पंचमीच्या दिवशी राशीनुसार रामसीतेला अर्पण करा या गोष्टी

    विवाह पंचमीचा पवित्र सणांपैकी एक सण मानला जातो. हा दिवस राम सीतेच्या विवाहाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात या दिवसाचे धार्मिक महत्त्व खूप आहे. पंचांगानुसार, विवाह पंचमी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यावेळी आज मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी आहे. असे म्हटले जाते की, जर तुम्ही विवाह पंचमीच्या दिवशी राशीनुसार राम आणि सीतेला काही वस्तू अर्पण केल्या तर त्यांना शाश्वत फळे मिळतात. शिवाय, विवाहाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतात. विवाह पंचमीच्या दिवशी रामसीतेला राशीनुसार कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या जाणून घ्या.

    वाचा सविस्तर- Vivah Panchami: विवाहच्या पंचमीच्या दिवशी राशीनुसार रामसीतेला अर्पण करा या गोष्टी

  • 25 Nov 2025 08:37 AM (IST)

    25 Nov 2025 08:37 AM (IST)

    पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

    राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादविवादातून माहेरी आलेल्या पत्नीवर पतीने तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करून तिच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. खडकीतील औंध रोडवरील पोस्ट ऑफिसजवळ हा प्रकार घडला आहे. हल्ला करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • 25 Nov 2025 08:36 AM (IST)

    25 Nov 2025 08:36 AM (IST)

    Local Body Election: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीबाबत महत्वाची अपडेट

     आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी मतदानकेंद्रनिहाय मतदारयाद्या आता बुधवारी (दि. २६)प्रसिध्द करण्यात येणार आहेत. यापूर्वी या मतदारयाद्या सोमवारी प्रसिध्द करण्याचे नियोजन होते. मात्र, त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

    जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदासाठी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी या याद्या १२ तारखेला आणि त्यानंतर सोमवारी (दि. २४) प्रसिध्द करण्याचे नियोजन होते. मात्र, आता या याद्या बुधवारी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि पंचायत समित्यांचे १४६ गण आदींसाठी ३ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. जिल्हा परिषदेतील सदस्य पदासाठी १३ ऑक्टोंबरला आरक्षण सोडत काढण्यात आली होती.

  • 25 Nov 2025 08:32 AM (IST)

    25 Nov 2025 08:32 AM (IST)

    घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट! Home Loan वर ४% व्याजात सबसिडी

    Pradhan Mantri Awas Yojana Urban 2.0: प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न असते, पण ते साध्य करणे सोपे नसते. बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यातील कष्टाने कमावलेल्या पैशाची गुंतवणूक करून हे स्वप्न पूर्ण करू शकतात. तथापि, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना हे स्वप्न साकार करण्यास मदत करत नाही तर मध्यमवर्गीय व्यक्तींना त्याचा फायदा मिळवून देत आहे. कसे ते समजून घेऊया.

    वाचा सविस्तर  - घर घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी भेट! Home Loan वर ४% व्याजात सबसिडी; जाणून घ्या योजनेचा फायदा कोणाला?

  • 25 Nov 2025 08:30 AM (IST)

    25 Nov 2025 08:30 AM (IST)

    सांगलीच्या आजी-माजी खासदार, आमदारांना वसुली नोटीस

    सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहारातील ८१ कोटी ९१ लाखांच्या वसुलीसाठी ३० एप्रिल अखेर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश विभागीय सह निबंधकांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांना दिले आहेत. याप्रकरणी बँकेच्या ३८ आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी बुधवारी (दि.२६) हजर राहण्याची नोटीस प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बजावली आहे.

    जिल्हा बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी केली होती. तसेच स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनीही बँकेच्या कारभाराबाबत लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारीनुसार, मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली.

  • 25 Nov 2025 08:29 AM (IST)

    25 Nov 2025 08:29 AM (IST)

    Todays Gold-Silver Price: ग्राहकांचा आनंद द्विगुणित!

    Gold Rate Today: भारतात सोन्या – चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्या – चांदीच्या दरात सतत घसरण सुरु आहे. आज देखील पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोनं – चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यां ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज भारतातील विविध शहरातील सोन्याचे दर काय आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

    भारतात 25 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,512 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,469 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,384 रुपये आहे. भारतात 25 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,690 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,120 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,840 रुपये आहे. भारतात 25 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 162.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,62,900 रुपये आहे.

  • 25 Nov 2025 08:28 AM (IST)

    25 Nov 2025 08:28 AM (IST)

    भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही धर्मेंद्र यांच्या निधनाने व्यक्त केला शोक!

    सोमवारी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोककळाला बुडाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्या निधनाने केवळ भारतच शोक करत नाही, तर पाकिस्तानी लोकही दुःखी आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार रशीद लतीफ यांनी धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. धर्मेंद्र बऱ्याच काळापासून आजारी होते. ऑक्टोबरमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते बरे होऊन परतले असले तरी त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नव्हती.

    सोमवारी वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना लतीफ म्हणाले की धर्मेंद्र हे एक दिग्गज होते आणि त्यांनी एक दीर्घ वारसा सोडला आहे. माजी यष्टीरक्षक म्हणाले की, हे-मॅन पाकिस्तानमध्येही खूप प्रसिद्ध होते. “धर्मेंद्रजी एक दिग्गज नायक होते आणि त्यांचा ‘शोले’ हा चित्रपट सर्वकालीन क्लासिक आहे. त्यांनी संपूर्ण उपखंडात एक महान वारसा सोडला आणि तो पाकिस्तानमध्येही खूप प्रसिद्ध होता. त्यांना माझी श्रद्धांजली,” असे लतीफ म्हणाले.

Marathi Breaking news live updates- सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने संतुलित दृष्टिकोन स्वीकारत म्हटले आहे की, राज्य विधिमंडळांनी मंजूर केलेल्या विधेयकांना मंजुरी देण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांवर कोणतीही कालमर्यादा लादता येणार नाही. राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या कृती न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत, परंतु जर विलंब झाला तर ते हस्तक्षेप करू शकतात. जेव्हा विधेयक कायदा बनते तेव्हाच न्यायालयीन पुनरावलोकन उद्भवते.

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political national international business sports crime entertainment weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 08:16 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Dharmendra Passes Away News Update : डॉ. गौरी गर्जे प्रकरणात काय म्हणाले मंत्री पंकज भोयर?
1

Dharmendra Passes Away News Update : डॉ. गौरी गर्जे प्रकरणात काय म्हणाले मंत्री पंकज भोयर?

Top Marathi News Today Live:  लाडक्या बहिणींनी KYC कशी करावी?
2

Top Marathi News Today Live: लाडक्या बहिणींनी KYC कशी करावी?

Top Marathi News Today नितीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; उद्या NDA चा  शपथविधी
3

Top Marathi News Today नितीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; उद्या NDA चा शपथविधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.