Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: स्मृती मानंधनाचा विवाह पुढे ढकलला; काय आहे कारण?

Marathi breaking live marathi - डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत . दरम्यान , स्मृती मानधना हिने एक मोठे पाऊल उचलले आहे. स्मृती मानधनाचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांच्या मते, स्मृतीने स्वतःहून निर्णय घेतला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 24, 2025 | 10:27 AM
LIVE
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:
  • 24 Nov 2025 10:59 AM (IST)

    24 Nov 2025 10:59 AM (IST)

    पाकिस्तान ट्राय सिरीज मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचला

    पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना २३ नोव्हेंबर रोजी झाला. पाकिस्तानने हा सामना ६९ धावांनी जिंकला. उस्मान तारिकने हॅटट्रिक घेत पाकिस्तानसाठी धमाकेदार कामगिरी केली. त्याने पाकिस्तानसाठी शानदार खेळ केला आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह पाकिस्तानने तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने ४१ चेंडूत ६३ धावा केल्या. सॅम अयुबनेही ८ चेंडूत १३ धावा केल्या.

  • 24 Nov 2025 10:51 AM (IST)

    24 Nov 2025 10:51 AM (IST)

    आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो

    आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या गुगल प्ले स्टोअरचा वापर यूजर्स वेगवेगळे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यासाठी करतात. मात्र आता या प्लॅटफॉर्मच्या मदतीने यूजर्सना त्यांचे आवडते चित्रपट आणि शो सर्च करण्यासाठी देखील मदत होणार आहे. यासाठी टेक जायंट कंपनी गुगलने गुगल प्ले स्टोअरसाठी एक नवीन अपडेट रिलीज केलं आहे.

  • 24 Nov 2025 10:43 AM (IST)

    24 Nov 2025 10:43 AM (IST)

    लवकरच भारत करणार सिंध काबीज?

    भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अलीकडील विधानामुळे भारत-पाकिस्तान (India-Pakistan) संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीमध्ये आयोजित सिंधी समुदायाच्या विशेष कार्यक्रमात भाषण देताना राजनाथ सिंह यांनी स्पष्ट म्हटले “सिंध हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यात सीमा बदलू शकतात.” त्यांच्या या टिप्पणीनंतर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया नोंदवत भारतावर हिंदुत्ववादी विस्तार धोरणाचा आरोप केला आहे.

  • 24 Nov 2025 10:37 AM (IST)

    24 Nov 2025 10:37 AM (IST)

    बॉलिवूडची पहिली लाफ्टर क्वीन

    आयुष्यातील आव्हानांना दु:खांना दु:ख हसऱ्या चेहऱ्यामागे लपवून कलाकार माय बाप रसिकप्रेक्षकांच निखळ मनोरंजन करतात. आपल्या अभिनय शैलीने डोळ्यात टचकन पाणी आणणारे आपल्या अभिनयातून कलाकार जितके काळजाचा ठाव घेतात तसंच हसवून हसवून डोळ्यात पाणी आणणारे विनोदी कलाकार हे देखील मनोरंजनसृष्टीला लाभलेलं वरदान आहे. अशीच एक विनोदी अभिनेत्री या बॉलीवूड इंडस्ट्रीला लाभली होती. बॉलीवूडचा सुवर्णकाळ जिच्या शिवाय अपूर्ण आहे ती हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे ‘लाफ्टर क्वीन टुनटून’.

  • 24 Nov 2025 10:29 AM (IST)

    24 Nov 2025 10:29 AM (IST)

    गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

    गौरी पालवे- गर्जे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही तासांपासून अनंत गर्जे हे फरार होते. अखेर वरळी पोलिसांसमोर रविवारी रात्री १ वाजता अनंत गर्जे यांनी आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली. अनंत गर्जे यांना आज सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयात अनंत गर्जे यांची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यावेळी पोलीस न्यायालयात नेमकी काय माहिती देतात हे महत्वाचं आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी अनंत गर्जे यांच्या वकिलांकडून जामीन मिळवण्यासाठी युक्तिवाद होणार.

  • 24 Nov 2025 10:27 AM (IST)

    24 Nov 2025 10:27 AM (IST)

    पाकिस्तानातील पेशावरमध्ये स्फोट: दहशतवाद्यांचा एफसी मुख्यालयावर हल्ला 

    Blast In Peshawar: पाकिस्तानातील पेशावरमध्ये दोन ठिकाणी स्फोट झाले आहेत. अनेक लोक ठार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असल्याची माहिती देखील आहे. ताज्या माहितीनुसार, या स्फोटांमध्ये तीन दहशतवाद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण परिसर सील केला आहे. दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

     

  • 24 Nov 2025 10:21 AM (IST)

    24 Nov 2025 10:21 AM (IST)

    विमा ग्राहकांसाठी खुशखबर! हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर करणार

    सरकार विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मर्यादा वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या या क्षेत्रातील एफडीआय मर्यादा ७४०% आहे. सरकार ती १००% पर्यंत वाढवेल, सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठी एक विधेयक सादर करणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होईल आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, या काळात लोकसभा आणि राज्यसभेची एकूण १५ दिवस बैठक होईल.

  • 24 Nov 2025 10:12 AM (IST)

    24 Nov 2025 10:12 AM (IST)

    लेकीच्या लग्नासाठी खूप उत्साही दिसले स्मृती मानधनाचे वडील

    संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना (२३ नोव्हेंबर २०२५) लग्न बंधनात अडकणार होते. परंतु, स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना काल रात्री आजारी पडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान, पलाश आणि स्मृतीच्या संगीत समारंभाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये स्मृतीचे वडील त्यांच्या मुलीसाठी अनेक गाण्यांवर सादरीकरण करताना दिसले आहेत.

  • 24 Nov 2025 10:09 AM (IST)

    24 Nov 2025 10:09 AM (IST)

    पाकिस्तानात सेनेजवळ बॉम्बचा धमाका

    सोमवारी पाकिस्तानातील पेशावर येथील फेडरल कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयावर मोठा हल्ला झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हल्ल्याची पुष्टी केली आणि सांगितले की सुरक्षा दल प्रत्युत्तर देत आहेत आणि संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे, असे डॉन न्यूजने वृत्त दिले आहे. कॅपिटल पोलिस अधिकारी डॉ. मियां सईद अहमद म्हणाले, “एफसी मुख्यालयावर हल्ला झाला आहे. सुरक्षा कर्मचारी प्रत्युत्तर देत आहेत आणि परिसराला वेढा घालण्यात आला आहे.” सुरक्षा सूत्रांच्या मते, हा हल्ला एका आत्मघातकी बॉम्बरने केला होता ज्याने मुख्यालयाच्या गेटवर स्वतःला उडवून दिले. स्फोटानंतर लगेचच गोळीबार ऐकू आला.

  • 24 Nov 2025 10:04 AM (IST)

    24 Nov 2025 10:04 AM (IST)

    पत्नीच्या आत्महत्येवर अनंत गर्जेची पहिली प्रतिक्रीया

    गौरी गर्जे यांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना अनंत गर्जे म्हणाले की, ज्यावेळी हा प्रकार झाला त्यावेळी मी घरी नव्हतो, घरी पोहचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते. घाबरून ३१ व्या मजल्यावरील खिडकीतून उतरून मी ३० व्या मजल्यावरील माज्या घरात प्रवेश केला. तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली उतरवून मी रुग्णालयात नेलं. असं अनंत गर्जे यांनी सांगितलं.

  • 24 Nov 2025 10:00 AM (IST)

    24 Nov 2025 10:00 AM (IST)

    एक महिन्यात दोन विश्वचषक टीम इंडियाने केले नावावर!

    रविवारी केपी सारा ओव्हल मैदानावर झालेल्या टी-२० ब्लाइंड महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळला सात विकेट्सने हरवून विजय मिळवला. हा पहिला ब्लाइंड महिला क्रिकेट विश्वचषक आहे. टी-२० ब्लाइंड महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार दीपिका टीसी म्हणाली की, हा एक मोठा विजय आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे. कर्णधार म्हणाली की, स्पर्धेदरम्यान काही संघ त्यांच्याविरुद्ध खेळण्यास घाबरत होते. त्याच वेळी, तिने संघावर विश्वास व्यक्त केला आणि पुरुषांविरुद्ध खेळण्याची इच्छाही व्यक्त केली.

  • 24 Nov 2025 09:58 AM (IST)

    24 Nov 2025 09:58 AM (IST)

    मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट!

    Israel attck on Lebnon : बेरुत : मध्य पूर्वेत पुन्हा एकाद युद्धाची आग धगधगण्यास सुरुवात झाली आहे. इस्रायलच्या (Israel) सैन्याने रविवारी (23 नोव्हेंबर) लेबनॉनमध्ये मोठा हल्ला केला आहे. या हवाईआ हल्ल्यात लेबनॉनची राजधानी बेरुतला लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायली सैन्याने या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या (Hezbollah) प्रमुखाचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • 24 Nov 2025 09:54 AM (IST)

    24 Nov 2025 09:54 AM (IST)

    मालती चहरने तान्या मित्तलला मारली कानशिलात

    सलमान खानचा लोकप्रिय रिॲलिटी शो “बिग बॉस १९” सध्या चर्चेत आहे. या शो चा सध्या अंतिम टप्पा सुरु झाला आहे. त्याआधी, घरात एक नॉमिनेशन टास्क आयोजित करण्यात आला होता, जिथे सर्व घरातील सदस्यांना एका स्पर्धकाला नॉमिनेटेड करायचे होते आणि त्यांच्या तोंडावर नॉमिनेशनचा शिक्का मारायचा होता. तसेच, नुकताच झालेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने अनेक घरातील सदस्यांना फटकारले. फॅमिली वीकनंतर, तो इतर अनेकांचे कौतुक करतानाही दिसला. एकता कपूरनेही तान्या मित्तल आणि अमालला एक मोठ शो ऑफर केला. तसेच आता या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये गोंधळ उडालेला दिसणार आहे. तान्या मित्तलच्या असभ्यतेमुळे संतापलेल्या मालती चहरने तिला कानशिलात दिली आहे.

  • 24 Nov 2025 09:52 AM (IST)

    24 Nov 2025 09:52 AM (IST)

    स्मृती मानधनाने साखरपुड्याच्या आणि मेहंदीच्या आठवणी टाकल्या पुसून

    स्मृती मानधना हिने एक मोठे पाऊल उचलले आहे. स्मृती मानधनाचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांच्या मते , स्मृतीने स्वतःहून निर्णय घेतला आहे की तिचे वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत लग्न होणार नाही. तिने लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. दरम्यान, स्मृतीने सोशल मीडियावरही तिचे दुःख व्यक्त केले आहे . तिने केवळ तिच्या साखरपुड्याची घोषणा करणारा व्हिडिओच नाही तर इंस्टाग्रामवरून लग्नाशी संबंधित इतर सर्व पोस्ट देखील डिलीट केल्या आहेत . या निर्णयामुळे तिचे चाहतेही हैराण झाले आहेत .

  • 24 Nov 2025 09:48 AM (IST)

    24 Nov 2025 09:48 AM (IST)

    सोनं–चांदी खरेदीची संधी

    Gold Rate Today: भारतात 24 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,583 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,534 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,437 रुपये आहे. भारतात 24 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,340 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,830 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 94,370 रुपये आहे. भारतात 24 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 163.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,63,900 रुपये आहे.

  • 24 Nov 2025 09:44 AM (IST)

    24 Nov 2025 09:44 AM (IST)

    गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट

    गरेनाच्या मालकीच्या असलेल्या Free Fire Max या बॅटल ग्राउंड गेममध्ये प्लेयर्ससाठी एक नवा इव्हेंट सुरू करण्यात आला आहे. हा इव्हेंट Carnival Funk या नावाने सुरू करण्यात आला असून तो अतिशय खास आहे. कारण या इव्हेंट मध्ये प्लेअर्सना स्पेशल फंकी इमोट रिवॉर्ड म्हणून जिंकण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नाही तर या इव्हेंटमध्ये प्लेअर्सना लूट बॉक्स, सुपर लॅग पॉकेट, वेपन लूट क्रेट आणि खास बॅकपॅक सारखे आइटम्स देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे. गेम डेवलपर गरेनाने असा दावा केला आहे की हा ईव्हेंट विशेषत: गेमर्सना नवीन आयटम जिंकण्याची संधी मिळावी यासाठी सुरू करण्यात आला आहे. या इव्हेंटमुळे प्लेअर प्लेयर्सना प्रीमियम आयटम्स मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे आणि यामुळे गेमचा अनुभव देखील अधिक चांगला होणार आहे.

  • 24 Nov 2025 09:40 AM (IST)

    24 Nov 2025 09:40 AM (IST)

    पालघरच्या जंगलात मुंबईतील फुटबॉलपटूचा मृतदेह आढळला

    पालघरच्या मेंढावन खिंड जंगलातून मुंबईतील प्रसिद्ध फुटबॉलपटू सागर सोरतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.सागर गेल्या दोन वर्षांपासून मानसिक तणावाखाली होता. १५ नोव्हेंबर रोजी तो पुण्यात फुटबॉल खेळत असल्याचे सांगून घराबाहेर गेला, परंतु त्यानंतर त्याचा काहीही संपर्क कुटुंबाशी झाला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत होते. दोन दिवसांनी, म्हणजेच १८ नोव्हेंबरला, पालघरच्या मेंढावन खिंड जंगलातील एका झाडाला गळफास घेतलेला सागर आढळला. मृतदेहाजवळ त्याचा मोबाईल सापडला, ज्यावरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

  • 24 Nov 2025 09:30 AM (IST)

    24 Nov 2025 09:30 AM (IST)

    लोककला आधारित “गोंधळ” बॉक्स ऑफिसवर अपयशी

    मराठी चित्रपटसृष्टीत आता लोककलेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहे. दीड महिन्यांपूर्वी आलेल्या दशावतार चित्रपटाने प्रेक्षकांना थेट चित्रपटगृहात खेचून आणले आणि बॉक्स ऑफिसवर थेट 20 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. यानंतर चर्चा रंगली ती गोंधळ चित्रपटाची.

    काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोंधळ चित्रपटाची सुद्धा चांगलीच हवा पाहायला मिळाली होती. महाराष्ट्रातील एका महत्वाच्या लोककलेवर आधारित असलेला हा सिनेमा नक्कीच सुपरहिट ठरणार अशी सगळ्यांची अपेक्षा होती. त्यात दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इल्लैयाराजा यांचे संगीत या चित्रपटाला लाभले. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवेल? अशी उत्सुकता सगळ्यांनाच होती.

  • 24 Nov 2025 09:25 AM (IST)

    24 Nov 2025 09:25 AM (IST)

    मद्यधुंद तरुणाने नारायण पेठेत कारने अनेक वाहनांना दिली धडक

    पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास एका मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने वेगाने वाहन चालवीत अनेक वाहनांना धडक दिल्याचे सांगितले आहे. यावेळी तरुणासोबत आणखी काही तरुणही असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना पुण्यातील मध्यवर्ती भागातील नारायण पेठेत घडली आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण गोंधळ घालतांना दिसत आहे. हा तरुण मद्यधुंद अवस्थेत कार चालवीत होता. यादरम्यान त्याने अनेक वाहनांना धडक दिली.यांनतर स्थानिकांनी त्या तरुणाला कारमधून बाहेर काढलं. घटनेच्या ठिकाणी बराच वेळ स्थानिक आणि तरुणांमध्ये बाचाबाची सुरु होती. इथे मोठा राडा झाला. या तरुणांसोबत काही तरुणीसुद्धा दिसत आहे. यापैकी एक तरुणी मद्यधुंद अवस्थेतील तरुणाला स्वतःचा भाऊ असल्याचे सांगत आहे. ती त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तरुण स्थानिकांशी भांडण करत होता. मी पोलिसांचा मुलगा आहे, मला दारू पिऊ द्या. असे तो म्हणत आहे. ही घटना पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार दाखल केली आहे.

  • 24 Nov 2025 09:21 AM (IST)

    24 Nov 2025 09:21 AM (IST)

    पित्त वाढल्यामुळे अंगावर लाल चट्टे येतात? मग आहारात करा ‘हे’ साधे बदल

    धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरात उष्णता वाढल्यानंतर काहींना पित्ताची समस्या उद्भवते. याशिवाय मसालेदार, तेलकट आणि वारंवार जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय शरीरात अनेक बदल दिसून येतात. पचनशक्ती कमकुवत झाल्यामुळे शरीरात पित्त वाढते. पित्त वाढल्यानंतर आंबट ढेकर येणे, छातीमध्ये वाढलेली जळजळ, तोंड कडू होणे, अंग गरम होणे, डोकेदुखी, चिडचिड, भूक मंदावणे आणि उलट्या होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. तसेच काहींच्या अंगावर पित्ताचे लाल चट्टे सुद्धा येतात. पित्ताची पातळी वाढल्यानंतर अंगावर आलेल्या लाल चट्ट्यानां खाज येण्यास सुरुवात होते. काहीवेळा खाज खूप जास्त असह्य होते. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे दैनंदिन कामात अनेक अडथळे निर्माण होतात.

  • 24 Nov 2025 09:16 AM (IST)

    24 Nov 2025 09:16 AM (IST)

    705 दिवसांनंतर ऋतुराज गायकवाडचे टीम इंडियात करणार शानदार पुनरागमन

    भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या भारताचा संघ हा कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे. या मालिकेमध्ये तीन सामने खेळवले जाणार आहेत. भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता भारताच्या संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी टीम इंडियाचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

  • 24 Nov 2025 09:11 AM (IST)

    24 Nov 2025 09:11 AM (IST)

    Share Market Today भारतीय बाजार हिरव्या निशाण्यावर उघडण्याची शक्यता,

    India Share Market Update: जागतिक बाजारात आज उत्साहवर्धक संकेत पाहायला मिळत आहेत. याच संकेतांचा विचार करून आज २४ नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,१५५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ७८ अंकांनी जास्त होता.

Marathi Breaking news live updates: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिचा विवाह अचानक पुढे ढकलण्यात आला आहे . संगीतकार पलाश मुच्छल यांच्यासोबत तिचा विवाह रविवार, २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात होणार होता, परंतु दुःखद कौटुंबिक परिस्थितीमुळे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात, रविवारी सकाळी नाश्त्याच्या वेळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना अचानक आजारी पडले. सुरुवातीला ही एक किरकोळ समस्या असल्याचे मानले जात होते, परंतु जेव्हा त्यांची प्रकृती सुधारली नाही तेव्हा त्यांना ताबडतोब सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाचा सविस्तर- Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधनाने साखरपुड्याच्या आणि मेहंदीच्या सर्व आठवणी टाकल्या पुसून, उचलले धक्कादायक पाऊल

 

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates business crime sports political national international entertainment weather news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live:  लाडक्या बहिणींनी KYC कशी करावी?
1

Top Marathi News Today Live: लाडक्या बहिणींनी KYC कशी करावी?

Top Marathi News Today नितीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; उद्या NDA चा  शपथविधी
2

Top Marathi News Today नितीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; उद्या NDA चा शपथविधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.