
Top Marathi News Today Live:
26 Nov 2025 09:53 AM (IST)
देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईत 17 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याची फक्त भारतातच नाहीतर जगभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या हल्ल्याला 17 वर्षे झाली असली तरीही जखम मुंबईकरांच्या मनात अजूनही कायम आहे. हल्ला होऊन इतका काळ उलटूनही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाची सुरक्षा व्यवस्था आजही रामभरोसेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाचा सविस्तर- 26/11 Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम
26 Nov 2025 09:48 AM (IST)
डोंबिवली: डोंबिवली येथे खाडी जवळ सुटकेशमध्ये एका तरुणीचा सडलेला मृतदेह आढळला होता.ही घटना पलावा उड्डाणपुलाच्या खाली देसाई खाडी जवळ सोमवारी दुपारी जवळपास 1.45 वाजता समोर आली. ही घटना समोर आल्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात या महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. डायघर पोलिसांनी या प्रकरणाचा १२ तासात उलगडा केला आहे. या हत्येमागचं कारण काय, कोणी केली हत्या, कसा झाला उलगडला? जाणून घ्या.
वाचा सविस्तर- Dombivali Crime: डोंबिवली सुटकेस मर्डरचा उलगडा, १२ तासात पोलिसांनी केले उघड; कोणी केली हत्या? कारण काय?
26 Nov 2025 09:46 AM (IST)
‘बिग बॉस १९‘ चा ग्रँड फिनाले काही दिवसांपासून दूर आहे. सध्या घरात आठ स्पर्धक शिल्लक आहेत आणि एक जण आता थेट फिनालेमध्ये पोहचणार आहे. चार स्पर्धकांनी ‘टिकट टू फिनाले’ टास्कमध्ये भाग घेतला आणि त्यापैकी एकाने हा टास्क जिंकून अखेर फिनालेमध्ये एन्ट्री मिळवली आहे. हा स्पर्धक आता नक्की कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
वाचा सविस्तर- Bigg Boss 19 : अखेर ‘या’ स्पर्धकाने जिंकला Ticket To Finale, ‘बिग बॉस’ला मिळाला शोचा पहिला फायनलिस्ट
26 Nov 2025 09:44 AM (IST)
सिंहाला जंगलाचा राजा म्हणून ओळखलं जातं. त्याची शक्ती आणि साहस इतर प्राण्यांहून त्याला अधिक बलवान बनवते. सिंहाची नजर एकदा कोणत्या प्राण्यावर पडली की मग त्याचा जीव वाचणे फार कठीण होऊन बसते. सिंहाच्या शिकारीचे अनके व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल झालेले असतानाच आता इथे एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सिंंहाचं कुटुंब नदीकिनारी आराम करत असल्याचं दिसतं पण तितक्यातच पाण्यातून असा प्राणी बाहेर येतो की ज्याला पाहताच सिंहाच संपूर्ण घाबरुन पळून जातं. सिंहासारख्या जंगलाच्या राजाला घाबरताना पाहून यूजर्स थक्क झाले. हा नक्की कोणता प्राणी होता ज्याला पाहताच सिंहाच कुटुंब घाबरलं ते चला जाणून घेऊया.
वाचा सविस्तर- नदीकाठी आराम करत असलेल्या सिंहाच्या कुटुंबाने एका क्षणात काढला पळ
26 Nov 2025 09:43 AM (IST)
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सरकारी, अनुदानित अशा 20 आणि त्याहून कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने येत्या काळात विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल 600 हून अधिक शाळांना टाळे लागण्याची शक्यता आहे. यातून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढल्यास राज्यात सध्या सुरू असलेली शिक्षक भरतीची प्रक्रियाही रखडण्याची भीती शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
Marathi Breaking news live updates- आज आपल्या देशासाठी अत्यंत खास दिवस आहे. २६ नोव्हेंबर जो भारतीय इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला होता. कारण आजच्या दिवशी १९४९ मध्ये आपल्या स्वंतत्र देशाच्या संविधान औपचारिकरित्या स्वीकारण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. हे संविधान पूर्ण होण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालवधी गेला होता. २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये आपल्या भारताचे संविधान अधिकृतपणे स्वीकरले गेले होते, पण २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान लागू करण्यात आले, ज्यामुळे आपला देश प्रजासत्ताक बनला. पण याचे महत्त्व पटवून देण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२५ मध्ये पहिला संविधान दिन साजरा करण्यात आला.