Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: लाडक्या बहिणींनी KYC कशी करावी?

Marathi breaking live marathi- या पार्श्वभूमीवर सरकारने अशा महिलांसाठी नवीन पर्यायी केवायसी प्रक्रिया सुरू केली असून त्यांच्या अर्जांची अडथळ्याविना नोंदणी होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 22, 2025 | 09:59 AM
LIVE
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:
  • 22 Nov 2025 09:59 AM (IST)

    22 Nov 2025 09:59 AM (IST)

    दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकले

    भारताच्या संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. टीम इंडियाने मागील सामन्यांमध्ये खराब फलंदाजी केली होती त्यामुळे आज भारतीय फलंदाजांवर चाहत्यांची नजर असणार आहे. मागील सामन्यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याला दुखापत झाली होती त्यामुळे आज दुसऱ्या सामन्यामध्ये तो संघाबाहेर असणार आहे. त्याचबरोबर आज या दुसऱ्या सामन्याचे कर्णधारपद हे रिषभ पंत सांभाळताना दिसणार आहे.

  • 22 Nov 2025 09:55 AM (IST)

    22 Nov 2025 09:55 AM (IST)

    बारामती नगरपालिका निवडणुकीत येणार रंगत

    बारामती : बारामती नगरपालिका निवडणुकीत आता रंगत येणार आहे. बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १५ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र गुजर यांना माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांनी थेट समर्थन देत आपला मुलगा यशपालच्या पाठीशी नाही तर जितेंद्र गुजर यांच्या पाठीशी आहोत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी जाहीर केली.

  • 22 Nov 2025 09:52 AM (IST)

    22 Nov 2025 09:52 AM (IST)

    राजधानी दिल्लीत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा

    नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रदूषण ही चिंतेची बाब ठरत आहे. सध्या सगळीकडे थंडी असल्याने या वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे राजधानीतील हवा काही प्रमाणात शुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तरी देखील सोमवारपर्यंत दिल्लीकरांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचेही म्हटले जात आहे. शुक्रवारी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहिली. शुक्रवारी सकाळची सुरुवात हलक्या धुक्याने झाली.

  • 22 Nov 2025 09:48 AM (IST)

    22 Nov 2025 09:48 AM (IST)

    विद्यार्थ्यांसाठी सरकारी टेलिकॉम कंपनी घेऊन आली विशेष प्लॅन

    सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL पुन्हा एकदा एक खास प्लॅन घेऊन आली आहे. यावेळी कंपनीचा हा प्लॅन त्यांच्या इतर प्लॅनेपक्षा पूर्णपणे वेगळा आहे. कारण BSNL कंपनीने हा विद्यार्थ्यांसाठी सादर केला केला आहे. BSNL चे CMD ए. रॉबर्ट जे. रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी विद्यार्थी आणि महिलांसाठी विशेष प्लॅन लाँच करण्याची तयारी करत आहे, याच दिशेने पहिले पाऊल उचलण्यात आलं आहे, म्हणजेच कंपनीने विद्यार्थ्यांसाठी पहिला रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.

  • 22 Nov 2025 09:45 AM (IST)

    22 Nov 2025 09:45 AM (IST)

    तब्बल 4 हजार रुपयांनी कोसळली चांदी

    Today’s Gold Rate: भारतात 22 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,397 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,364 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,298 रुपये आहे. भारतात 22 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,970 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,980 रुपये आहे. भारतात 22 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 160.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,60,900 रुपये आहे.

  • 22 Nov 2025 09:41 AM (IST)

    22 Nov 2025 09:41 AM (IST)

    हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

    • WOPLMFJ4NTDHR3V
    • 4PAS6TQ87CXMLNV
    • NRD8L6Y7M4E29U1
    • CT6P42J7GRH50Y8
    • YW2B64F7V8DHJM5
    • VQRB39SHXW10IM8
    • ZRJAPH294KV5
    • MCPW2D1U3XA3
    • X99TK56XDJ4X
    • CT6P42J7GRH50Y8
    • YW2B64F7V8DHJM5
    • VQRB39SHXW10IM8
  • 22 Nov 2025 09:38 AM (IST)

    22 Nov 2025 09:38 AM (IST)

    तुमचा नंबर लीक नाही झाला ना?

    जर एखाद्या रात्री अचानक WhatsApp वर तुम्हाला मेसेज आला की Hi, तुम्हाला जॉब मिळाला आहे… तर? अशा परिस्थितीतत तुमचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे कसा गेला, हाच प्रश्न तुमच्यासमोर असेल. हे ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी अगदी सामान्य वाटत असलं तरी देखील याचा मोठा परिणाम होऊ शकतो. कारण हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. जर तुमचा WhatsApp नंबर लीक झाला किंवा एकाद्या चुकीच्या व्यक्ती हाती पडला तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. आता असंच झालं आहे. संपूर्ण WhatsApp मेंबर डायरेक्टरी डार्क वेबवर विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    वाचा सविस्तर- WhatsApp Data Leak: तुमचा नंबर लीक नाही झाला ना? सर्वच भारतीयांचा व्हॉट्सअ‍ॅप डेटा धोक्यात, अशी करा तुमची सुरक्षा

  • 22 Nov 2025 09:37 AM (IST)

    22 Nov 2025 09:37 AM (IST)

    कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दुपारच्या जेवणापूर्वी चहापानाचा ब्रेक

    भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांची मालिका सुरु आहे, या मालिकेच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या मालिकेचा दुसरा सामना हा गुवाहाटी येथे खेळवला जात आहे. जर तुम्ही कसोटी क्रिकेटचे चाहते असाल, तर तुम्ही कदाचित हे लक्षात घेतले असेल की पहिल्या सत्रानंतर दुपारचे जेवण दिले जाते आणि गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यांमध्ये, पहिल्या सत्रानंतर प्रवासाचा ब्रेक किंवा चहाचा ब्रेक घेतला जातो, तर दुसरा ब्रेक डिनर ब्रेक असतो. तथापि, पारंपारिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, आजपासून, २२ नोव्हेंबरपासून, पहिल्या सत्रानंतर चहाचा ब्रेक आणि दुसऱ्या सत्रानंतर दुपारचे जेवणाचा ब्रेक घेतला जाईल.

    वाचा सविस्तर- IND vs SA : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दुपारच्या जेवणापूर्वी चहापानाचा ब्रेक, सामन्यांच्या वेळेतही करण्यात आला बदल

  • 22 Nov 2025 09:34 AM (IST)

    22 Nov 2025 09:34 AM (IST)

    काश्मीरमध्ये पुन्हा हल्ल्याची तयारी? दहशतवाद्यांची संख्या तिप्पट

    जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) पुन्हा एकदा दहशतीची सावट दाटू लागली आहे. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) आणि पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने (Pakistan) भारताविरुद्ध पुन्हा मोठा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. विशेषतः दिल्लीसारख्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांचे मॉडेल आता काश्मीरमध्ये वापरले जाऊ शकते, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. चालत्या वाहनांत IED लावून नागरीक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचे उघड झाले आहे.

  • 22 Nov 2025 09:29 AM (IST)

    22 Nov 2025 09:29 AM (IST)

    विजेच्या तीव्र धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू,

    कपडे वाळवताना अचानक एका महिलेला विजेचा जोरदार धक्का बसला. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या मुलालाही विजेचा धक्का बसला. यात माय-लेकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.21) सकाळच्या सुमारास खापरखेडा येथील दहेगाव रोडवरील जयभोलेनगरात घडली. निर्मला उत्तम सोनटक्के (वय ५१) आणि मुलगा लोकेश सोनटक्के (वय ३१) असे यामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. लोकेश हा भानेगाव खुल्या कोळसा खाणीत कंत्राटदारीवर काम करत होता. गुरुवारी रात्रीची ड्युटी करून तो सकाळी घरी येऊन झोपला होता. नेहमीप्रमाणे आई निर्मला अंघोळीनंतर लोखंडी तारेवर कपडे वाळवत होत्या. या लोखंडी तारेच्या अगदी वरूनच वीजवाहिनी गेली आहे.

  • 22 Nov 2025 09:28 AM (IST)

    22 Nov 2025 09:28 AM (IST)

    भारताच्या संघाने लाज घालवली,

    रायझिंग स्टार्स आशिया कपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत अ संघ सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाला. बांगलादेश अ संघाने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नाही. कर्णधार जितेश शर्माने सामन्यानंतर पराभवाचे कारण स्पष्ट केले. शुक्रवारी, २१ नोव्हेंबर रोजी दोहा येथे झालेल्या सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशकडून पराभव पत्करल्यानंतर भारत अ संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

Marathi Breaking news live updates:  लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आली असून महिलांना आता अद्ययावत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

योजनेनुसार लाभ मिळण्यासाठी वडील किंवा पतीची केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, पती व वडील दोघेही हयात नसलेल्या महिलांसाठी केवायसी प्रक्रियेत अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने अशा महिलांसाठी नवीन पर्यायी केवायसी प्रक्रिया सुरू केली असून त्यांच्या अर्जांची अडथळ्याविना नोंदणी होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political national international crime sports entertainment business weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today नितीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; उद्या NDA चा  शपथविधी
1

Top Marathi News Today नितीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; उद्या NDA चा शपथविधी

Top Marathi News Today Live:  मक्का मदीना मार्गावर भीषण अपघात; ४२ भारतीयांच्या मृत्यूची शक्यता
2

Top Marathi News Today Live: मक्का मदीना मार्गावर भीषण अपघात; ४२ भारतीयांच्या मृत्यूची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.