Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता कधी मिळणार 

Marathi breaking live marathi सरकार सहसा दर चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांना पुढील हप्ता पाठवते. या योजनेअंतर्गत, पंतप्रधान मोदी यांनी २४ फेब्रुवारीला बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात १९ वा हफ्ता हस्तांतरीत केला होता

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 11, 2025 | 07:26 PM
Top Marathi News Today: पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता कधी मिळणार 
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates:  शेतकरी वर्ग सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या योजनेअंतर्गत जून महिन्यात २,००० रुपयांचा हप्ता मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, काही कारणास्तव हा हप्ता लांबणीवर गेला आहे.दरम्यान, लवकरच या हप्त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे आणि संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली असावी लागते. यामध्ये ई-केवायसी (e-KYC), जमीन दस्तऐवजांची अद्ययावत नोंदणी, आणि बँक खाते आधारशी संलग्न असणे अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

The liveblog has ended.
  • 11 Jul 2025 06:53 PM (IST)

    11 Jul 2025 06:53 PM (IST)

    Navi Mumbai News : नरेश म्हस्के यांची संयुक्त बैठक संपन्न; महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

    नवी मुंबई : नवी मुंबईत नरेश म्हस्के यांची संयुक्त बैठक पार पडली आहे. घणसोली ते ऐरोली सेक्टर 10 ए उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात यावी, बाधितांना योग्य मोबदला तात्काळ द्यावा, नवी मुंबई महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, ठाणे कोपरी ते नवी मुंबई एअरपोर्ट कॉरिडॉर रस्ता मार्गी लावण्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना करुन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आज निर्देशने दिले आहेत.

  • 11 Jul 2025 06:23 PM (IST)

    11 Jul 2025 06:23 PM (IST)

    Pune News: ‘या’ अन्यायकारक धोरणांविरुद्ध हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी रस्त्यावर; नक्की काय आहे प्रकरण?

    पुणे: पुणे जिल्ह्यातील हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांनी ११ जुलै २०२५ रोजी शिक्षण विभागाच्या अन्यायकारक धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत शाळा बंद ठेवत शासनाला ठोस निवेदन सादर केले.

  • 11 Jul 2025 06:03 PM (IST)

    11 Jul 2025 06:03 PM (IST)

    राहुल गांधींनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत भेट टाळली? गांधी कुटुंब कन्नडविरोधी म्हणत भाजपचा निशाणा

    काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या अटकळी सुरू असताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार दोघेही दिल्लीला पोहोचले होते. सिद्धरामय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली, तर शिवकुमार यांनी प्रियंका गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी राहुल गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितला होता, परंतु त्यांना भेटण्याची संधी मिळाली नाही. यामुळे कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या चर्चा आणखी तीव्र झाल्या आहेत

  • 11 Jul 2025 05:45 PM (IST)

    11 Jul 2025 05:45 PM (IST)

    ‘नवराष्ट्र इम्पॅक्ट’! कुरुंदवाड पोलिसांची धडाडीची कारवाई; अवैध जुगार प्रकरणी पाच जणांवर थेट…

    कुरुंदवाड: कुरुंदवाड शहरात सुरू असलेल्या अवैध मावा विक्री व मटका जुगार यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्याने ९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास चार ठिकाणी धडक कारवाई केली. यामध्ये एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (विनियमन) अधिनियम २००३ अंतर्गत तीन पानटप्यांवर छापे टाकण्यात आले. प्लेयर्स पान शॉप (सिद्धार्थ चौक) येथून नयुम झाकीर तेरदाळे याच्याकडून माव्याच्या ४० पुड्या, सुमारे एक किलो सुपारी आणि १४०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • 11 Jul 2025 05:19 PM (IST)

    11 Jul 2025 05:19 PM (IST)

    सलग तिसऱ्या दिवशी बाजार लाल रंगात बंद, पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर टीसीएस 3 टक्क्याने घसरला

    जागतिक बाजारातील मंदीच्या संकेतांमध्ये, भारतीय शेअर बाजारही शुक्रवारी (११ जुलै) आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग सत्रात घसरणीसह बंद झाले. यासह, प्रमुख बेंचमार्क निर्देशांक निफ्टी-५० आणि सेन्सेक्स सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात घसरणीसह राहिले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) चे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत असल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या घसरणीमुळे बाजार घसरला. त्याच वेळी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर ३५% टॅरिफ लादण्याच्या घोषणेमुळे जागतिक व्यापार चिंता वाढल्या.

    सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा

  • 11 Jul 2025 05:07 PM (IST)

    11 Jul 2025 05:07 PM (IST)

    Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट लाँच

    बजाज ऑटो त्यांच्या लोकप्रिय Bajaj Pulsar N160 लाइनअपचा विस्तार करण्यावर काम करत आहे. कंपनीने आता त्याचा एक नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये सिंगल-सीट आणि ड्युअल-चॅनेल ABS सारखी फीचर्स आहेत, ज्याची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये आहे. त्यात इतर अनेक उत्तम फीचर्ससह अपडेट केले गेले आहे.

    सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

  • 11 Jul 2025 04:45 PM (IST)

    11 Jul 2025 04:45 PM (IST)

    मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आणखी दोन आव्हान

    कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेच्या कथानकात आता एक नवं वळण येणार आहे. मायेचा विनाश होईल की ती देवीला शरण जाईल हे बघणे उत्सुत्केचे असणार आहे. पण, मायानंतर आता जगदंबेसमोर समोर उभे ठाकणार आहेत आणखी दोन आव्हानं म्हणजेच दोन षड्रिपू ‘मोह’ आणि ‘क्रोध’. येत्या आठवड्यात या दोन प्रबळ आसुरी शक्तींचं अवतरण थरारक आणि रहस्यमय पद्धतीने मालिकेत होणार आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 11 Jul 2025 04:40 PM (IST)

    11 Jul 2025 04:40 PM (IST)

    बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर गंभीर आरोप

    बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांचे गृहमंत्री असदुज्जमान खान यांच्यावर देशात मोठ्या खळबळ उडवणारे आरोप न्यायालयाने निश्चित केले आहेत. हे आरोप 2024 मध्ये झालेल्या एका तीव्र जनआंदोलनाशी संबंधित असून, या आंदोलनात शेकडो विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले होते. आंदोलन दडपण्यासाठी सरकारी यंत्रणांचा अमानवी आणि हिंसक वापर झाल्याचा आरोप आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 11 Jul 2025 04:35 PM (IST)

    11 Jul 2025 04:35 PM (IST)

    चांदीने गाठला सर्वकालीन उच्चांक! सोने आणि चांदीच्या किंमती २८ टक्क्यांनी वाढल्या

    आज म्हणजेच शुक्रवारी (११ जुलै) चांदीच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, शुक्रवारी एक किलो चांदीची किंमत २,३६६ रुपयांनी वाढून १,१०,३०० रुपये प्रति किलो झाली आहे. काल ती १,०७,९३४ रुपये होती. त्याच वेळी, आज २४ कॅरेट सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. ते ४२७ रुपयांनी महाग झाले आहे आणि ते प्रति १० ग्रॅम ९७,४७३ रुपयांवर पोहोचले आहे. काल सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९७,०४६ रुपये होता. यापूर्वी १८ जून रोजी चांदीने १,०९,५५० रुपयांचा आणि सोन्याने ९९,४५४ रुपयांचा सर्वोच्च उच्चांक गाठला होता.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 11 Jul 2025 04:30 PM (IST)

    11 Jul 2025 04:30 PM (IST)

    ‘कॅप्स कॅफे’च्या गोळीबारानंतर कपिल शर्माची मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा

    कॅनडामधील प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर, मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांची सक्रियता वाढली आहे. मुंबई पोलिसांनी कपिलच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. तसेच, ही ‘कॅप्स कॅफे’च्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी वाढली आहे. कारण, बुधवारी रात्री त्याच्या कॅनडास्थित ‘कॅप्स कॅफे’ रेस्टॉरंटवर गोळीबार करण्यात आला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे रेस्टॉरंट सुरू होऊन एक आठवडाही झाला नव्हता आणि दहशतवाद्यांनी विनोदी कलाकाराचे स्वप्न चकनाचूर करून टाकला आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांनी या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 11 Jul 2025 04:25 PM (IST)

    11 Jul 2025 04:25 PM (IST)

    IGI एअरपोर्टवर १४०० पदांसाठी भरती...

    दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. IGI Aviation Services Pvt. Ltd. ने 2025 मध्ये एकूण 1400 पदांसाठी भरती जाहीर केली असून, यात “एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ” आणि “लोडर” या पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन igiaviationdelhi.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 10 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 11 Jul 2025 04:20 PM (IST)

    11 Jul 2025 04:20 PM (IST)

    लॉर्ड्सवर नितीश कुमार रेड्डीचा भीम पराक्रम

    भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. या कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियासाठी संमिश्र राहिला होता. सामना सुरु होण्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ४ गडी गमावून २५१ धावा केल्या होत्या. त्याआधी, टीम इंडियासाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली होती. अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने एकाच षटकात इंग्लंडच्या दोन बड्या खेळाडूंना माघारी पाठवले. या कामगिरीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 11 Jul 2025 04:15 PM (IST)

    11 Jul 2025 04:15 PM (IST)

    छांगूर बाबा प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासे

    उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्मांतर टोळी चालवणाऱ्या जलालुद्दीन उर्फ ​​छांगूर बाबाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.  ​​छांगूर बाबा हिंदू मुलींना त्याच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर करायचा. त्याच्या टोळीतील लोक लव्ह जिहादद्वारे या मुलींना बाबांकडे आणत असत, जिथे छांगूर बाबा त्यांचे ब्रेनवॉश करायाचय या कामात नीतू उर्फ ​​नसरीन ​छांगूरला पूर्ण पाठिंबा देयाची.. अखेर पोलिसांनी तिला छांगूर बाबासह हॉटेलमधून अटकही केली आहे. नीतू उर्फ ​​नसरीन अनेक वर्षांपासून छांगूर बाबांकडे काम करायची आणि बाबाच्या सर्व काळ्या कृत्यांमध्ये सहभागी होती.  छांगूर तिला त्याच्या प्रेयसी आणि पत्नीप्रमाणे त्याच्यासोबत ठेवायचा. त्यानंतर तिच्याबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत की नीतू बाबाच्या संपर्कात कशी आली.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 11 Jul 2025 04:10 PM (IST)

    11 Jul 2025 04:10 PM (IST)

    संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल

    आमदार निवासात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीनमध्ये मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी बनियान आणि टॉवेल गुंडाळून त्या ठिकाणी मारहाण केली. निकृष्ट पद्धतीचे जेवण दिल्याने त्यांना उलटी झाली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी अमरहण केली. मात्र आता आमदार संजय गायकवाड यांच्यावर मुंबईत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 11 Jul 2025 04:06 PM (IST)

    11 Jul 2025 04:06 PM (IST)

    अमेरिकेचा नवा पवित्रा! ड्रोन युद्धासाठी छोट्या लढवणार ‘ही’ शक्कल

    रशिया-युक्रेन युद्धात ड्रोनच्या वापरामुळे युद्धाचे गणितच बदलले. या अनुभवातून धडा घेत अमेरिकेने आता ड्रोन युद्धात आघाडी घेण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी लहान, वेगवान आणि अत्याधुनिक ड्रोन बनवण्याचा नवा अध्याय सुरू केला असून, या संदर्भात त्यांनी अधिकृत ज्ञापनपत्रावर नाट्यमयरित्या स्वाक्षरी केली  तेही एका ड्रोनकडूनच तो दस्तऐवज प्राप्त करून!

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 11 Jul 2025 04:04 PM (IST)

    11 Jul 2025 04:04 PM (IST)

    गायिका आशा भोसलेंच्या निधनावर मुलगा आनंद यांची प्रतिक्रिया

    गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्या सारख्या पसरताना दिसत आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर आणखी एका सुप्रसिद्ध सेलिब्रिटीच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या निधनाचे खोटे वृत्त पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. आता या बातमीवर आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 11 Jul 2025 03:22 PM (IST)

    11 Jul 2025 03:22 PM (IST)

    रायगडच्या सर्व मच्छीमार बोटींना शासकीय नोंदणी करण्याची तंबी

    6 जून रोजी रायगडच्या कोर्लई समुद्र किनाऱ्यावर एक संशयित बोट आढळून आल्याची माहिती मिळताच रायगड जिल्ह्यातील सर्व यंत्रणा अलर्ट झाली होती मात्र तपासादरम्याना ही बोट नसून पाकिस्तान मधून वाहून आलेली बोया असल्याची माहिती प्राप्त झाली होती.मात्र या घटनेचे पडसाद जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेवर पडल्यानंतर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी आता मोठा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील सर्व मच्छिमारी करणाऱ्या बोट मालकांना आता आपल्या बोटींची अधिकृत शासकीय नोंदणी करण्यासाठी तंबी दिली आहे.

  • 11 Jul 2025 03:20 PM (IST)

    11 Jul 2025 03:20 PM (IST)

    खुशबू मृत्यूप्रकरणी १६ जुलै पासून पेण मध्ये ठिय्या आंदोलन

    पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणारी विद्यार्थिनी खुशबू ठाकरे हिचा २२ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. खुशबू ला न्याय देण्यासाठी आणि
    दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी पेण मध्ये १६ जुलै पासून तहसील कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.आदिवासी विद्यार्थिनी खुशबू ठाकरे मृत्यु प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रमुख मागणी आहे.

  • 11 Jul 2025 03:05 PM (IST)

    11 Jul 2025 03:05 PM (IST)

    पुण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना निषेधार्थ आंदोलन

    पुणे रेल्वे स्टेशनसमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला करून झालेल्या विटंबनेच्या घटनेचा राष्ट्र सेवा दल, छात्रभारती व गांधीवादी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय निषेध आंदोलन करण्यात आले व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.या आंदोलनात राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते व गांधीविचारांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  • 11 Jul 2025 03:02 PM (IST)

    11 Jul 2025 03:02 PM (IST)

    चीनमधून आयात होणाऱ्या खतांवर बंदी

    China Ban Special Fertilizer Export Marathi News: चीनने भारतात निर्यात होणाऱ्या विशेष खतांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे आणि तीही अशा हंगामात जेव्हा शेतीसाठी विशेष खते अधिक महत्त्वाची होती. चीनने अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही, परंतु केवळ निर्यात थांबवली आहे. अशा परिस्थितीत, भारत आता युरोपियन युनियन (EU) आणि पश्चिम आशियातील काही देशांसह काही इतर देशांकडून खते आयात करण्याचा विचार करत आहे.

  • 11 Jul 2025 03:01 PM (IST)

    11 Jul 2025 03:01 PM (IST)

    हेलिकॉप्टर हवेतून थेट नदीत कोसळले

    helicopter crashes into river : मलेशियाच्या जोहोर प्रांतात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. पोलिस दलाचे एक हेलिकॉप्टर आपत्कालीन लँडिंग करताना थेट नदीत कोसळले असून, या अपघाताचा थरारक लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या दृश्यांनी प्रेक्षकांचे मन सुन्न झाले आहे, कारण व्हिडिओत असे स्पष्टपणे दिसते की, जणू काही नदीच त्या हेलिकॉप्टरला स्वतःकडे खेचून घेत आहे!

  • 11 Jul 2025 03:01 PM (IST)

    11 Jul 2025 03:01 PM (IST)

    कॅनडातील कॅप्स कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्मासाठी आणखी एक वाईट बातमी

    कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातल्या कॅप्स कॅफेवर काल फायरिंग करण्यात आली. एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्याच्या कॅफेवर गोळीबार केला. अभिनेत्याच्या कॅफेवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्यामुळे अभिनेता चिंतेत असताना, आता अशातच अभिनेत्यासंबंधित आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शोच्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. गोळीबाराचा फटका अभिनेत्याच्या शोवरही पडला आहे. नेमका अभिनेत्याला काय फटका बसला आहे ? जाणून घेऊया…

  • 11 Jul 2025 03:00 PM (IST)

    11 Jul 2025 03:00 PM (IST)

    मुंबई लोकलमध्ये झाला होता दहशतवादी हल्ला

    गेल्या काही दशकांमध्ये दहशतवाद हा जगभरात एक भयानक प्रवृत्ती म्हणून उदयास आली आहे. ११ जुलै रोजी देशाची व्यावसायिक राजधानी मुंबईवर दहशतवादाने असा घाव घातला, ज्याची वेदना काळानुसार वाढतच गेली. ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील काही लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका घडली. या स्फोटांमध्ये १८७ लोक मृत्युमुखी पडले आणि सुमारे ७०० जण जखमी झाले. यामुळे मुंबई लोकलमधील गर्दी आणि दहशतवादींनी केलेल्या हल्ला हा प्रश्न ऐरणीवर आला.

  • 11 Jul 2025 03:00 PM (IST)

    11 Jul 2025 03:00 PM (IST)

    बाबा रामदेवांनी दिला Cholesterol नष्ट करण्याचा देशी जुगाड

    कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढत आहे. भारतातील २५ ते ३० टक्के लोक कोलेस्ट्रॉलचे बळी आहेत. २५-३० वर्षे वयोगटातील लोकही कोलेस्ट्रॉलच्या विळख्यात आहेत. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक आहे परंतु वाईट कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग, हृदयविकार आणि स्ट्रोकसह अनेक गंभीर आणि जीवघेण्या समस्या निर्माण होतात. अनेक लोकांना आयुष्यभर कोलेस्टेरॉलसाठी औषधांवर अवलंबून राहावे लागते.

  • 11 Jul 2025 02:59 PM (IST)

    11 Jul 2025 02:59 PM (IST)

    चालू सामन्यातच जडेजा आणि केएल राहुलमध्ये राडा

    IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळववली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना इंग्लंडच्या ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसा खेळ संपला असून इंग्लिश संघाने ४ गडी गमावून २५१ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, जो रूट (९९) आणि कर्णधार बेन स्टोक्स (३९) नाबाद आहेत.

  • 11 Jul 2025 02:59 PM (IST)

    11 Jul 2025 02:59 PM (IST)

    आता पुन्हा खदखदू लागलं इराण-इस्रायल युद्ध!

    जगभराचे लक्ष वेधून घेतलेल्या इराण-इस्रायल संघर्षात पुन्हा एकदा तापमान चढू लागले आहे. जून महिन्यात अमेरिकेने ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ अंतर्गत इराणच्या तीन प्रमुख अणुस्थळांवर जोरदार हल्ला केला होता. इस्फहान, फोर्डो आणि नतान्झ ही ठिकाणे लक्ष्य करत अमेरिकेने दावा केला होता की या भागांत मोठे नुकसान घडवून आणण्यात आले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटले की, ही ठिकाणे ‘पूर्णपणे नष्ट’ झाली आहेत. मात्र आता इस्रायली आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या संयुक्त अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे इराणचे अणुकार्यक्रम पूर्णपणे संपलेले नाहीत!

  • 11 Jul 2025 02:58 PM (IST)

    11 Jul 2025 02:58 PM (IST)

    प्रसिद्ध टेनिसपटू राधिका यादवची वडिलांनी का केली हत्या?

    दिल्लीतील गुरुग्रामच्या सेक्टर-५७ मध्ये राज्यस्तरीय महिला टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी एक नवीन खुलासा झाला आहे. एका क्षुल्लक कारणामुळे राधिकाच्या वडिलांनी तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मृत महिलेची ओळख राज्यस्तरीय टेनिस खेळाडू राधिका यादव (सुमारे २५ वर्षे) अशी झाली आहे, जी तिच्या कुटुंबासह सेक्टर-५७ येथील सुशांतलोक-२ येथे राहत होती. मृत राधिका टेनिस अकादमी चालवत होती आणि तिचे वडील (आरोपी) तिच्या टेनिस अकादमी चालवण्याच्या प्रकरणावर नाराज होते.

  • 11 Jul 2025 02:57 PM (IST)

    11 Jul 2025 02:57 PM (IST)

    लॉर्ड्स कसोटीत ध्रुव जुरेल ऋषभ पंतचा पूर्णवेळ रिप्लेसमेंट होऊ शकतो का?

    भारत सरकार इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिनी इंग्लंडच्या संघाने चांगली फलंदाजी केली आणि भारताच्या संघाने चार विकेट्स नावावर गेले. या मॅचमध्ये टीम इंडीयाला पहिल्याच दिनी मोठा धक्का बसला, भारतीय संघाचा मुख्य विकेटकीपरला हाताला दुखापत झाल्यामुळे सामन्या बाहेर व्हावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाली. दुसऱ्या सत्रात चेंडू उचलताना पंतच्या तर्जनीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टीरक्षक म्हणून काम करत आहे. आता बीसीसीआयने दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे.

  • 11 Jul 2025 02:57 PM (IST)

    11 Jul 2025 02:57 PM (IST)

    अमेरिकेत SpaceX Starlink ची इंटरनेट सर्विस ठप

    एलन मस्कची इंटरनेट सर्विस Starlink ची सेवा अमेरिकेत ठप्प झाली आहे. त्यामुळे युजर्स हैराण झाले असून एक्सवर अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. स्टारलिंक सर्विस आउटेजबाबत डाउनडिटेक्टरमध्ये अनेक युजर्सनी तक्रार केली आहे. आतापर्यंत अमेरिकेतील 1000 हून अधिक युजर्सनी स्टारलिंक डाऊनची तक्रार केली आहे. यामध्ये 86 टक्के युजर्सना नेटवर्कशी संबंधित अडचणींचा सामान करावा लागला आहे. तर 14 टक्के युजर्सना टोटल ब्लॅकआउटचा सामना करावा लागला आहे.

  • 11 Jul 2025 02:55 PM (IST)

    11 Jul 2025 02:55 PM (IST)

    अजित पवार यांच्यावर टीका करताना लक्ष्मण हाकेंची पुन्हा जीभ घसरली

    ओबीसी (OBC) आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर शिवराळ भाषेत टीका करताना जीभ घसरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. तर अजित पवारांच्या समर्थकाने लक्ष्मण हाकेंना थेट कायदेशीर नोटीस बजावली. आता या नोटीसीला प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांना 'दरोडेखोर' म्हटले आहे.

  • 11 Jul 2025 02:50 PM (IST)

    11 Jul 2025 02:50 PM (IST)

    जो रूट शतकापासून एक धाव दूर

    जो रूट लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे शतक पूर्ण करू इच्छितो. तो ९९ धावांवर खेळत आहे. जर त्याने त्याचे शतक पूर्ण केले तर ते या मैदानावरील त्याचे आठवे शतक असेल.

  • 11 Jul 2025 02:45 PM (IST)

    11 Jul 2025 02:45 PM (IST)

    छांगूर बाबाची एटीएसकडून चौकशी सुरू आहे

    बलरामपूर एटीएस छांगूर बाबाची चौकशी करत आहे आणि या प्रकरणात तपास सुरू आहे.

  • 11 Jul 2025 02:44 PM (IST)

    11 Jul 2025 02:44 PM (IST)

    पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

    पंढरपूर -सातारा राष्ट्रीय महामार्गावर पंढरपूर जवळच्या उपरी येथील कासाळ ओढ्यावरच्या पूलाचे काम रखडले आहे. या पूलाचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आज येथील ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले.

  • 11 Jul 2025 01:45 PM (IST)

    11 Jul 2025 01:45 PM (IST)

    तुर्कीची Grok वर बंदी

    मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी तुर्कीमधील न्यायालयाने एलन मस्कच्या मालकीच्या ग्रोकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
    ग्रोकवर राष्ट्रपती आणि इतरांबद्दल अपमानास्पद मजकूर पसरवल्याचा आरोप आहे, याच आरोपांचा विचार करून तुर्कीच्या न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. ए हॅबर न्यूज चॅनलने वृत्त दिले आहे की ग्रोकने तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान, त्यांच्या दिवंगत आई आणि सेलिब्रिटींविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पण्या पोस्ट केल्या आहेत.

  • 11 Jul 2025 01:40 PM (IST)

    11 Jul 2025 01:40 PM (IST)

    कपिल शर्माच्या रेस्टॉरंटच्या गोळीबार नंतर कॅप्स कॅफेने दिली पहिली प्रतिक्रिया

    गुरुवारी विनोदी कलाकार कपिल शर्माबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. बुधवारी रात्री त्याच्या कॅनडास्थित ‘कॅप्स कॅफे’ रेस्टॉरंटवर गोळीबार करण्यात आला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हे रेस्टॉरंट सुरू होऊन एक आठवडाही झाला नव्हता आणि दहशतवाद्यांनी विनोदी कलाकाराचे स्वप्न चकनाचूर करून टाकला आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांनी या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. आता एका दिवसानंतर, कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेने या गोळीबारावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • 11 Jul 2025 01:32 PM (IST)

    11 Jul 2025 01:32 PM (IST)

    श्रावण महिन्यात महिलांनी मेंहदी का लावावी

    श्रावण महिना शंकराला समर्पित आहे. शास्त्रामध्ये या महिन्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आलेले आहे. असे म्हटले जाते की, श्रावण महिना हिरवळीने सुरु होतो. श्रावणामध्ये सर्वत्र हिरवळ असते. श्रावण महिन्यामध्ये शंकराची पूजा करण्यासोबतच मेंहदी लावण्याला देखील विशेष महत्त्व आहे. दरम्यान या परंपरेचा सबंध केवळ सौंदर्याशीच नाही तर धार्मिक महत्त्व देखील आहे. श्रावणात मेंहदी का लावावीत, काय आहेत फायदे जाणून घ्या

  • 11 Jul 2025 01:06 PM (IST)

    11 Jul 2025 01:06 PM (IST)

    सर्वसामान्यांनी जाणून घ्यायलाच हवा ‘जनसुरक्षा कायदा’

    राज्याचे विधीमंडळ पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामध्ये राज्य सरकारकडून जनसुरक्षा कायदा मंजूर करुन घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयक सादर केले. यानंतर महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये हे विधेयक मंजूर झाले आहे. कोणत्याही डिसेंट नोट शिवाय हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यावरुन पूर्वी जोरदार चर्चा रंगली होती. या विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर समिती देखील स्थापन करण्यात आली. हरकती आणि सूचना लक्षात घेत त्यानंतर योग्य ते बदल करण्यात आले. आता जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले आहे. हे विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पाचवे राज्य ठरले आहे.

  • 11 Jul 2025 01:06 PM (IST)

    11 Jul 2025 01:06 PM (IST)

    पुणे-सोलापूर हायवेवर एसटीची दुर्घटना होता होता टळली

    पुणे-सोलापूर हायवेच्या दुभाजकाला ओलांडून जाणाऱ्या रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात गेली. ही घटना वरवंड येथील इंडियन पेट्रोल पंपासमोर घडली. एसटी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दौंड एसटी डेपोचे वाहन परिक्षक अनिल भागवत यांनी घटनास्थळी दिली.

  • 11 Jul 2025 01:00 PM (IST)

    11 Jul 2025 01:00 PM (IST)

    डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, कॅनडाहून येणाऱ्या वस्तूंवर ३५ टक्के आयात शुल्क

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री (स्थानिक वेळेनुसार) एक मोठा निर्णय घेतला आणि १ ऑगस्ट २०२५ पासून कॅनडाहून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर ३५ टक्के दर लावण्याची घोषणा केली. कॅनडाच्या कथित व्यापार अडथळ्यांमुळे आणि सूडबुद्धीने केलेल्या कारवाईमुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले.

    (सविस्तर बातमी)

  • 11 Jul 2025 12:55 PM (IST)

    11 Jul 2025 12:55 PM (IST)

    खासदार निलेश लंके उपोषण करणार

    खासदार निलेश लंके आजपासून (शुक्रवार) अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामाचे टेंडर होऊन देखील काम सुरू न झाल्याने त्यांनी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

  • 11 Jul 2025 12:45 PM (IST)

    11 Jul 2025 12:45 PM (IST)

    पावसामुळे भाज्या कडाडल्या; सर्वच भाज्यांचे दर ४० रुपये पावशेरपुढे

    जिल्ह्यात दोन महिन्यांपासून पावसाने ठिय्या दिला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

  • 11 Jul 2025 12:35 PM (IST)

    11 Jul 2025 12:35 PM (IST)

    वडोदरा पूल अपघात: १८ जणांचा मृत्यू, ३ बेपत्ता, ५ जखमी

    गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मुजपूर-गंभीरा पूल कोसळला. या पूल कोसळल्याने आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ३ बेपत्ता आहेत आणि ५ जण जखमी आहेत.

  • 11 Jul 2025 12:25 PM (IST)

    11 Jul 2025 12:25 PM (IST)

    बिहार पशुवैद्यकीय महाविद्यालयात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोळीबारानंतर गोंधळ

    बिहारमधील पाटणा येथील बिहार पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी गुरुवारी संध्याकाळी स्थानिक लोकांवर हल्ला आणि कॅम्पसमध्ये गोळीबार केल्याचा आरोप करत अनिश्चित काळासाठी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला. निदर्शक विद्यार्थी सुरक्षेची मागणी करत आहेत.

  • 11 Jul 2025 12:23 PM (IST)

    11 Jul 2025 12:23 PM (IST)

    शेअर बाजारात घसरणीचा कल निर्माण करणारी ‘ही’ आहेत कारणे

    शुक्रवारी बाजार उघडताच शेअर बाजारात कमकुवतपणा दिसून आला. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात सुरुवातीपासूनच तफावत होती. निफ्टीने २५१९० ची नीचांकी पातळी गाठली. निफ्टीने २५३०० ची पातळी ओलांडताच, विक्रेत्यांनी त्यावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आणि निफ्टीमधील प्रत्येक खरेदीचा प्रयत्न विक्रीत बदलला.

    (सविस्तर बातमी)

  • 11 Jul 2025 12:15 PM (IST)

    11 Jul 2025 12:15 PM (IST)

    उदयपूर फाइल्सवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

    कंवर यात्रा संपेपर्यंत उदयपूर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

  • 11 Jul 2025 12:05 PM (IST)

    11 Jul 2025 12:05 PM (IST)

    लातूरमध्ये काँग्रेसला धक्का

    लातूरमध्ये भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. चाकूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि 3 विद्यमान नगरसेवक भाजपात प्रवेश करणाप आहेत. तसेच चाकूर पंचायत समितीचे ५ पंचायत समिती सदस्य देखील काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणार आहेत.

  • 11 Jul 2025 11:59 AM (IST)

    11 Jul 2025 11:59 AM (IST)

    झारखंडमध्ये वृद्ध महिलेने पुल पार करताना जीव लावला पणाला

    झारखंडमधील एक व्हि़डिओ समोर आली आहे. यामध्ये एक वृद्ध महिला जीवाची बाजी लावून पुल पार करत आहे. पुल तुटलेला असून या तुटलेल्या पुलावर ती आज्जीबाई चालत आहे.

    झारखंडमधील बोकारोमधील हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. एक वृद्ध महिला तुटलेल्या पुलावरून जात असतानाच्या या व्हिडिओमुळे त्या गावातील मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे.#Jharkhand #ViralVideo #SocialViral #Viral #ViralOnInternet pic.twitter.com/OlDX79OxVl

    — Navarashtra (@navarashtra) July 11, 2025

  • 11 Jul 2025 11:53 AM (IST)

    11 Jul 2025 11:53 AM (IST)

    ‘बालभारती’ची नवीन सुसज्ज इमारत लवकरच - डॉ.पंकज भोयर

    ‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे तातडीने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली. पुणे येथील बालभारती कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारत बांधण्यासंदर्भात सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता, त्यास राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी उत्तर दिले. यात सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, विक्रम काळे, किशोर दराडे यांनी सहभाग घेतला. 

  • 11 Jul 2025 11:45 AM (IST)

    11 Jul 2025 11:45 AM (IST)

    गुरुपौर्णिमा साजरा करण्यासाठी शिंदे दिल्लीला रवाना - संजय राऊत

    खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. खासदार राऊत यांनी लिहिले आहे की, गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्य मंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले! धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले, दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले! त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली! तूर्त इतकेच! असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

    गुरूपौर्णिमे निमित्त उपमुख्य मंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले!
    धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमे निमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले,
    दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले!
    त्यानंतर: मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी…

    — Sanjay Raut (@rautsanjay61) July 11, 2025

  • 11 Jul 2025 11:28 AM (IST)

    11 Jul 2025 11:28 AM (IST)

    गोरेगावमध्ये बेस्ट बसची ट्रकला धडक

    दिंडोशीहून शिवडी बस स्थानकाकडे जात असताना, बस स्थानक जवळ येत असताना, खाजगी कार अचानक सर्व्हिस रोडवरून बसच्या समोर आली. यामुळे बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस ट्रकला (RJ 12 GA 4756) धडकली.

Web Title: Marathi breaking news today live updates political sports crime entertainment business national viral lifestyle news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today:  पाऊस चिंता वाढवणार; ऑक्टोबरमध्येही धुमाकूळ घालणार
1

Top Marathi News Today: पाऊस चिंता वाढवणार; ऑक्टोबरमध्येही धुमाकूळ घालणार

Top Marathi News Today: भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video
2

Top Marathi News Today: भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

Top Marathi News Today Live: मुसळधार पावसाने मराठवाड्यात हाहाकार; संपर्क मार्ग ठप्प
3

Top Marathi News Today Live: मुसळधार पावसाने मराठवाड्यात हाहाकार; संपर्क मार्ग ठप्प

Top Marathi News Today: सुशिला कार्की यांनी घेतली नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ
4

Top Marathi News Today: सुशिला कार्की यांनी घेतली नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.