संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई: आमदार निवासात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीनमध्ये मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी बनियान आणि टॉवेल गुंडाळून त्या ठिकाणी मारहाण केली. निकृष्ट पद्धतीचे जेवण दिल्याने त्यांना उलटी झाली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी अमरहण केली. मात्र आता आमदार संजय गायकवाड यांच्यावर मुंबईत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी देखल पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे समजते आहे. दरम्यान मी चांगले काम केले या, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा, असे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत.
गुन्हा दाखल झाला तरी संजय गायकवाड यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप नसल्यची टीका विरोधकांकडून केले जात आहेत. त्यामुळे आता मरिन ड्राइव्ह पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर कॅन्टीनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदार निवास येथे मुक्कामास होते. कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ते असलेल्या रुममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला कृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. कॅन्टीन चालकाला त्यांनी बोलावून घेत दिलेल्या अन्नाचा वास घेण्यास सांगितले. अन्न खराब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला. मात्र त्यानंतर त्यांनी कॅन्टीन चालकाच्या थेट कानशिलात लगावली. सलग एका मागून एक बुक्क्या देखील मारल्या. या प्रकरणावरुन विधीमंडळामध्ये देखील आवाज उठवण्यात आला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणावरुन विधीमंडळामध्ये देखील ऊहापोह झाला. आमदार संजय गायकवाड यांची वर्तवणूक बरोबर नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडीओ पाहिला अशाप्रकारचे वर्तन विधीमंडळ सदस्यास भूषणावह असे नाही. यामुळे विधीमंडळाची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होत आहे. आमदार निवासात सोयी-सुविधा नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. अशावेळी तक्रार करावी पण लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे चुकीचे आहे. तसेच विधीमंडळ अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी,” असे देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.