Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : 2029 पर्यंत ठाकरेंकडे एकही आमदार नसेल; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Marathi Breaking Live Updates : राज्यात सध्या वातावरणात होतोय बदल...पावसाची लागली सर्वांनाच प्रतिक्षा...राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिसून येत आहेत अनेक घडामोडी...राजकारणातही दिसतोय बदल...यांसारख्या महत्त्वाच्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 20, 2026 | 12:12 PM
LIVE
2029 पर्यंत ठाकरेंकडे एकही आमदार नसेल; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

2029 पर्यंत ठाकरेंकडे एकही आमदार नसेल; शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Follow Us
Follow Us:
  • 20 Jun 2026 12:12 PM (IST)

    20 Jun 2026 12:12 PM (IST)

    मित्रानेच घेतला मित्राचा जीव

    मैत्रीणीच्या कारणातून मित्रानेच मित्राचा आपल्या साथीदारांना सोबत घेऊन लाकडी दांडके, बॅटने मारहाण करून खून केल्याची घटना गोखलेनगर येथे घडली आहे. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी तिघा आरोपींना नवी मुंबई येथील रबाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बारा तासाच्या आत ताब्यात घेतले आहे. हर्षद मच्छींद्र जाधव (वय. २० ,रा. शकुंतला गार्डन शेजारी गोखलेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अभिषेक संतोष पवार (वय. २०), प्रथमेश धोत्रे (वय. २१)  आणि मारुती देवकर (वय. २८, तिघे राहणार जनवडी) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास एकतानगर सोसायटी भगवान चाळ गोखलेनगर येथे घडली आहे. याबाबत हर्षद याची आई पोर्णिमा जाधव (वय. ४०) यांनी फिर्याद दिली आहे.

  • 20 Jun 2026 11:40 AM (IST)

    20 Jun 2026 11:40 AM (IST)

    Girish Mahajan: ‘मित्राच्या मुलीसोबतचे फोटो एडिट केले’; गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण, सायबर पोलिसांत तक्रार

    जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, हे फोटो बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.  फोटोशॉपद्वारे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे त्यांच्या मित्राच्या मुलीसोबतचे फोटो मॉर्फ करून बदनामी करण्यात आली आहे. नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.

  • 20 Jun 2026 11:31 AM (IST)

    20 Jun 2026 11:31 AM (IST)

    ‘संजय राऊत हे हातात कुलूप घेऊनच बसले- सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांचा टोला

    मंत्री शिरसाट म्हणाले, सहा महिन्यांपूर्वीच ‘ऑपरेशन टायगर’च्या बातम्या येत होत्या. तेव्हा पक्ष सावध का झाला नाही ? इतके माहित असूनही पदाधिकाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न कोणी का केला नाही. ? राऊत हे हातात कुलूप घेऊनच बसले आहेत. ते पक्षाला कुलूप लावून कधी पळून जातील हेही कळणार नाही असा टोलाही शिरसाट यांनी लगावला. ते भविष्यात पुन्हा खासदार होणार नाही, असे भाष्यही त्यांनी केले.

  • 20 Jun 2026 11:10 AM (IST)

    20 Jun 2026 11:10 AM (IST)

    संतापजनक! नर्सने रुग्णाच्या अंगावर फेकून मारली ग्लुकोजची बाटली म्हणाली...

    गुरुवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सोशल मिडियावर एका रुग्णालयातील व्हिडिओ वेगाने व्हायरल होऊ लागला. व्हिडिओमध्ये नर्स रुग्णावर उपचार न करता त्याला मारहाण करताना दिसली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समजले की, मुरैना जिल्ह्याच्या एका सरकारी रुग्णालयात हा सर्व प्रकरा घडला आहे. आरोपानुसार, नर्सने रुग्णाला कानशिलात मारली, शिवीगाळ केली आणि इतकंच नाही तर ग्लुकोजची बाटली देखील त्याच्या अंगावर फेकली. या घटनेच्या व्हिडिओ समोर येताच यातील दृष्यांनी यूजर्सना हैराण केलं.

  • 20 Jun 2026 11:07 AM (IST)

    20 Jun 2026 11:07 AM (IST)

    NTA चा मोठा निर्णय! नीट परीक्षा केंद्रांत बायोमेट्रिक पडताळणीशिवाय मिळणार नाही प्रवेश?

    यावर्षीच्या नीट पुनर्परीक्षेच्या सुरक्षेतेसाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सर्व परीक्षा केंद्रे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे (NTA) सुपूर्द करण्यात आली असल्याने परीक्षेच्या दिवशी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू असेल. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची जबाबदारी निमलष्करी दलाकडे असेल. तसेच यंदा ५,००० हून अधिक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर असेल.

  • 20 Jun 2026 10:55 AM (IST)

    20 Jun 2026 10:55 AM (IST)

    20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल;

    महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा आज तब्बल 20 वर्षांनंतर निकाल लागणार आहे. 2006 मध्ये झालेल्या या हत्याकांडानंतर सुरू झालेला न्यायालयीन प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान या संवेदनशील खटल्याचा अंतिम निकाल १६ जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात लागणे अपेक्षित होते. मात्र, “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला होता. आता तब्बल २० वर्षांनंतर हा निकाल आज लागणार आहे.

  • 20 Jun 2026 10:45 AM (IST)

    20 Jun 2026 10:45 AM (IST)

    भारतीय यूजर्ससाठी नवं फीचर; आता एकाच पोस्टमध्ये लिहा अनेक कॅप्शन्स

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram च्या भारतीय यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन आणि बहुप्रतिक्षित फीचर रोलआऊट केलं आहे. आता यूजर्स पोस्ट शेअर करताना प्रत्येक स्लाईडसाठी वेगवेगळे कॅप्शन्स जोडू शकणार आहेत. हे नवीन अपडेट ‘मल्टिपल कॅप्शन्स ऑन कॅरोसेल’ या नावाने रोलआऊट करण्यात आले आहे. या नवीन फीचरमुळे आता क्रिएटर्स आणि सामान्य यूजर्सचा इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. आता कॅरोसेल पोस्टमधील सर्व स्लाईड्ससाठी यूजर्सना केवळ एकच कॅप्शन शेअर करण्याचा पर्याय होता. मात्र आता यूजर्स नव्या फीचरमुळे पोस्टमधील प्रत्येक स्लाईडसाठी वेगळे कॅप्शन जोडू शकणार आहेत.

  • 20 Jun 2026 10:35 AM (IST)

    20 Jun 2026 10:35 AM (IST)

    लंडनमध्ये दोन प्रवासी ट्रेनची एकमेकांना भीषण धडक; एकाचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी

    ब्रिटनची राजधानी लंडनच्या (London) उत्तर भागात एका अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या रेल्वे अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेडफोर्डशायर प्रांताच्या दक्षिण भागात दोन वेगवान प्रवासी गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली. या भीषण रेल्वे अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, ५० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ब्रिटन सरकारने या दुर्घटनेला ‘मोठी राष्ट्रीय आपत्कालीन घटना’ म्हणून घोषित केले असून संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी रवाना केली आहे.

  • 20 Jun 2026 10:25 AM (IST)

    20 Jun 2026 10:25 AM (IST)

    UPSC मध्ये EWS आरक्षणाचा गैरवापर? नेमकं काय सांगतो UPSC 2025 चा रिपोर्ट?

    NTA च्या अडचणी संपता संपत नव्हत्या तोपर्यंत आता UPSC वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, हे प्रश्न पेपर लीकबाबत नसून EWS कोट्याबाबत आहेत. अनेक निवडलेल्या उमेदवारांच्या आर्थिक परिस्थितीच्या चौकशीत मोठे खुलासे झाले आहेत.

    ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या एका अहवालानुसार, संघ लोक सेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) कोट्यातून निवडलेल्या १०४ उमेदवारांपैकी मोठ्या संख्येने असे विद्यार्थी होते, ज्यांनी महागड्या कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी खाजगी शाळांमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे किंवा त्यांचे कुटुंब व्यवसायाशी जोडलेले आहे.

  • 20 Jun 2026 10:15 AM (IST)

    20 Jun 2026 10:15 AM (IST)

    जयपूरमध्ये शाही लग्नाची तयारी, पण लोहगडावर काळाचा घाला; 26 वर्षीय तरुण उद्योजकाचा

    पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. फिरण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय तरुण बिझनेसमन यांचा 350 फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबीय आणि मित्रांसोबत किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अचानक पाय घसरला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. काही दिवसांतच होणाऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • 20 Jun 2026 10:05 AM (IST)

    20 Jun 2026 10:05 AM (IST)

    खासदार फुटणार माहिती असूनही तुम्ही काय केलं? संजय शिरसाटांचा संजय राऊतांना सवाल

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटून शिंदेसेनेत दाखल झाले. याची राज्यभर चर्चा सुरु आहे. सहा महिन्यांपूर्वी खासदार फुटणार हे तुम्हाला माहित असूनही तुम्ही काय करत होते? अशी टीका राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केली.

  • 20 Jun 2026 09:55 AM (IST)

    20 Jun 2026 09:55 AM (IST)

    काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक

    काँग्रेस नेते राहुल गांधी आज आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अश्यातच, वाराणसीमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अनोख्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाराणसीमधील राहून गांधींच्या वाढदिवसाच्या सेलेब्रेशनचा व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यात राहुल गांधींचे एक पोस्टर परशुराम अवतारात दाखवण्यात आले आहे. तसेच हातात संविधानाची प्रत घेतलेल्या त्यांच्या पोस्टरवर कार्यकर्ते दुग्धाभिषेक करत आहेत.

  • 20 Jun 2026 09:45 AM (IST)

    20 Jun 2026 09:45 AM (IST)

    आरटीआय नियम २०२६ विरोधात साताऱ्यात माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक

    महाराष्ट्र शासनाने १२ जून २०२६ पासून लागू केलेल्या महाराष्ट्र माहिती अधिकार (आरटीआय) नियम २०२६ विरोधात साताऱ्यात माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी गुरुवारी जोरदार आंदोलन करत नव्या नियमांना तात्काळ स्थगिती देण्याची अथवा ते रद्द करण्याची मागणी केली. आंदोलनानंतर मुख्यमंत्री, मुख्य माहिती आयुक्त, केंद्रीय माहिती आयोग तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

  • 20 Jun 2026 09:35 AM (IST)

    20 Jun 2026 09:35 AM (IST)

    होर्मुझ सामुद्रधुनी 2 महिने टोलमुक्त

    अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प आणि पेझेश्कियन यांनी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराचा (एमओयू) संपूर्ण तपशील आता सार्वजनिक झाला आहे. तो अमेरिकेने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडणे, इराणवरील काही आर्थिक निर्बंध शिथिल करणे आणि अणुविषयक मुद्द्यांवर चर्चा करण्याचा उल्लेख आहे. या सामंजस्य करारामध्ये १४ मुद्दे असून, त्यातील पाचवा मुद्दा सर्वांत महत्त्वाचा आहे.

  • 20 Jun 2026 09:35 AM (IST)

    20 Jun 2026 09:35 AM (IST)

    ‘अल-निनो’चा वाढता प्रभाव शेतकऱ्यांसाठी धोक्याचा

    पावसाळ्याला सुरूवात झाली असली तरी हवामानातील बदलामुळे विदर्भात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. तर दुसरीकडे भू-गर्भातील आणि जलाशयातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. विदर्भात ऐरवी १८ जूनपर्यंत ७९.०२ मिमी पाऊस पडतो. तर यंदा १८ जूनपर्यंत केवळ १९.०७ मिमी पाऊस विदर्भात झाला. त्यामुळे १८ जूनपर्यंत विदर्भात तब्बल ५९.९५ मिमी पावसाची तूट असल्याचे तज्ज्ञांच्या निरीक्षणात पुढे आले आहे.

  • 20 Jun 2026 09:25 AM (IST)

    20 Jun 2026 09:25 AM (IST)

    रेल्वेतून आता विनातिकीट प्रवास करू नकाच; दंडाच्या रकमेत झाली भलीमोठी वाढ

    रेल्वेतून प्रवास करताना तिकीट न काढताच प्रवास करणारे अनेक प्रवासी असतील. पण, आता विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पूर्वीच्या दंडाच्या दुप्पट दंड भरावा लागेल. रेल्वे मंत्रालयाने तिकिटाशिवाय प्रवास करण्याचा किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढवला आहे. दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणेदेखील प्रवाशांसाठी देशभरातील सर्व रेल्वे झोनना नवीन नियमांची माहिती देणारा आदेश जारी केला आहे. हे नियम १ जुलै २०२६ पासून लागू होतील.

Marathi Breaking News Updates : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक नेतेमंडळी बाहेर पडताना दिसत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापन दिन मेळाव्यात जोरदार टीका करत पक्षातील आणखी मोठ्या फुटीचे संकेत दिले आहेत.

मुंबईतील २५ माजी नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करताना २०२९ पर्यंत एकही आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिल्लक राहणार नसल्याचा दावा कदम यांनी केला. रामदास कदम यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, संजय राऊतांना आम्ही गांभिर्याने घेत नाही. तुम्ही ‘ऑपरेशन तुडवा’ असे म्हणाले, पण आम्ही शिवसैनिक आहोत, आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी संजय राऊतांना दिला.

दरम्यान, तुडवायची भाषा कुणाला करताय, हिंमत असेल तर खासदारांच्या केसाला धक्का लावून पाहा. तुमच्या घरात शिवसैनिक शिरतील आणि तोंड बंद करतील, फोडून काढतील, असेही रामदास कदम म्हणाले. राऊत तुमचे तोंड सांभाळा, असे कदम म्हणाले.

Web Title: Marathi live blog breaking news latest updates top news current updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • navarashtra breaking news
  • Navarashtra Live Updates

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live : मातोश्रीवर ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक;  6 खासदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा
1

Top Marathi News Today Live : मातोश्रीवर ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक; 6 खासदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा

Top Marathi News Today Live :नाशिक विधान परिषदेसाठी 100 टक्के मतदान, परभणी विधान परिषदेसाठी 99.78 टक्के मतदान
2

Top Marathi News Today Live :नाशिक विधान परिषदेसाठी 100 टक्के मतदान, परभणी विधान परिषदेसाठी 99.78 टक्के मतदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.