
Top Marathi News Today Live
Marathi Breaking News Updates : काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दिल्लीतील अलीकडील राजकीय घडामोडींचा आढावा यावेळी देण्यात आला. तसेच पक्षाशी संबंधित 6 खासदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच पश्चिमी विक्षोभ, चक्रीय वारे आणि सक्रिय मान्सूनच्या प्रभावामुळे देशभरातील हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता असून, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि उष्णता वाढण्याचीही शक्यता आहे.
देशातील हवामान पुन्हा एकदा वेगाने बदलणार आहे. नवीन पश्चिमी विक्षोभ, चक्रीय वारे आणि सक्रिय नैऋत्य मान्सूनच्या एकत्रित प्रभावामुळे वायव्य, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपिटीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आसाम, मेघालय आणि सिक्कीमसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर वायव्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सोसाट्याचा वारा, वादळे आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
19 Jun 2026 06:28 PM (IST)
कोणतीही नवीन गाडी जेव्हा शोरूममध्ये दिमाखात उभी राहते, तेव्हा आपल्याला फक्त तिचे चकचकीत रूप दिसते. पण त्याआधी कित्येक वर्षे ती गाडी जगाच्या नजरेपासून दूर, अत्यंत गुप्तपणे एका कठीण प्रवासातून गेलेली असते. सोशल मीडिया आणि कॅमेऱ्यांच्या आजच्या युगात नवीन गाडीचे डिझाईन लीक होऊ नये म्हणून ऑटोमोबाईल कंपन्या कोट्यवधी रुपये खर्च करून ‘सिक्रेट टेस्टिंग’ करतात.
19 Jun 2026 06:20 PM (IST)
मुंबई : राज्यातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा यासाठी परिवहन विभागाने धोरणात्मक व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 1 जून ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत सर्व अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी चार तासांचा ‘मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम’ पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले असून, 15 ऑगस्टनंतर प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
19 Jun 2026 06:10 PM (IST)
कर्जत: कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामस्थांचा विरोध असताना देखील पाली साई डोंगर येथे टोरंट कंपनी कडून येथील जमिनीवर अतिक्रमण कायम ठेवले आहे. वन विभागाने आपली जमीन धरणे बांधण्यास देण्याचा निर्णय घेतला असल्याने त्या जमिनी वर असलेली 200 वर्षे जुनी झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे.दरम्यान जंगलातील झाडे तोडण्यास स्थानिक पर्यावरणप्रेमी यांनी विरोध केला असून तेथील जंगलात लावलेल्या आगी बद्दल देखील संताप व्यक्त केला आहे.झाडे काही दिवसांनी पडतील अशी व्यवस्था करण्यात येत असून झाडांच्या मुळाशी करवतीचे घाव घातले जात आहेत.
19 Jun 2026 06:03 PM (IST)
सोनाजी गाढवे /पुणे: बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांची नव्याने निर्मिती करण्यात आली असून, इयत्त चौथी मधील ‘शारीरिक शिक्षण व निरामयता’ या पाठ्यपुस्तकात (Education) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर भर देण्यात आला आहे. खेळ, व्यायाम, योग, सूर्यनमस्कार, स्वसंरक्षण, निरामयता आणि क्रीडांगण विषयक सवयी यांचा समावेश करून विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीची ओळख करून देण्यात आली आहे.
19 Jun 2026 05:40 PM (IST)
अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या नावातील पहिल्या अक्षराला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार, ‘D’ हे अक्षर ४ या अंकाशी आणि राहू ग्रहाशी संबंधित आहे. यामुळे त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित आणि असामान्य घटना घडतात. या लोकांमध्ये प्रबळ आत्म-नियंत्रण असते, जे त्यांची सर्वात मोठी ताकद बनते. वास्तु गुरू आणि अंकशास्त्र तज्ज्ञ मान्या यांच्या मते, हे लोक अद्वितीय आणि मानसिक व शारीरिकदृष्ट्या कणखर असतात. त्यांना शिस्त आवडते आणि ते आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवतात. चला, ‘D’ अक्षराने सुरू होणाऱ्या नावांच्या लोकांचे करिअर, प्रेम जीवन आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
19 Jun 2026 05:30 PM (IST)
सोन्याचा एखादा मौल्यवान दागिना हरवला की तो कधीच परत मिळणार नाही, अशी भीती अनेकदा मनात असते. दागिन्यांचे केवळ पैशांमधील मूल्य नाही, तर त्यांच्याशी जुडलेल्या कौटुंबिक आठवणी, महत्त्वाचे प्रसंग आणि जिव्हाळ्याचे क्षण यांमुळे त्यांचे भावनिक मूल्यही खूप मोठे असते, जे कधीच भरून काढता येत नाही. आधुनिक ज्वेलरी रिटेल क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाची ताकद दाखवणारी एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच समोर आली आहे.
19 Jun 2026 05:20 PM (IST)
शीतलकुमार शिंदे, धाराशिव : जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण २२७ जलसाठ्यांमधील पाणीस्थिती चिंताजनक असून २२२ प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर केवळ चार प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या १७ जून २०२६ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या जिल्ह्यात सध्या २ मोठे, १७ मध्यम आणि २०८ लघु असे एकूण २२७ प्रकल्प आहेत. यामध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा ५३.३४१ टीएमसी असून तो मागील वर्षीच्या तुलनेत लक्षणीय कमी आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी केवळ २२ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे.
19 Jun 2026 05:10 PM (IST)
सोनाजी गाढवे /पुणे: बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पाठ्यपुस्तकांची नव्याने निर्मिती करण्यात आली असून, इयत्त चौथी मधील ‘शारीरिक शिक्षण व निरामयता’ या पाठ्यपुस्तकात (Education) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर भर देण्यात आला आहे. खेळ, व्यायाम, योग, सूर्यनमस्कार, स्वसंरक्षण, निरामयता आणि क्रीडांगण विषयक सवयी यांचा समावेश करून विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीची ओळख करून देण्यात आली आहे.
19 Jun 2026 05:01 PM (IST)
मृत्यू हा कसाही होऊ शकतो पण गर्लफ्रेंडच्या अतिप्रेमामुळे मृत्यू झाल्याची घटना तुम्ही कधी ऐकली आहे का? सोशल मिडियावर याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असनू घटनेची सत्यता तुम्हाला हादरवून सोडेल. किरकोळ भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि फक्त एका चुकीने बाॅयफ्रेंडचा जीव गेला. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
19 Jun 2026 04:57 PM (IST)
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या पक्षफुटी आणि पक्षांतरांच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदारांच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातही संभाव्य फुटीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या दाव्यावर आमदार अनिल देशमुख यांनी जोरदार पलटवार केला आहे. वाचा सविस्तर...
19 Jun 2026 04:47 PM (IST)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नवीन केंद्रीय कराराअंतर्गत खेळाडूंचे पगार आणि सामना शुल्क निश्चित केले आहे. या करारानुसार, पाकिस्तानी खेळाडूंचे सामना शुल्क( Match Fee) जवळपास दुप्पट होणार आहे. वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ‘ग्रेड ए’ आणि ‘ग्रेड बी’ मधील केंद्रीय करारांतर्गत खेळाडूंना सर्वाधिक वेतन मिळेल. सामना शुल्काव्यतिरिक्त, या खेळाडूंना दरमहा ५० लाख पाकिस्तानी रुपयांचे मानधनही मिळेल. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना १५ लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंतचे सामना शुल्क मिळेल. वाचा सविस्तर...
19 Jun 2026 04:37 PM (IST)
राज्यातील राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ने सगळ्यांना हाळवून ठेवेल आहे. पुन्हा एकदा शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाचे ६ आमदार फोडले यांनी राजकीय वर्तुळात मोठा भुंकप आला. ९ पैकी ६ खासदार फुटल्याने उद्धव ठाकरे पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे. दरम्यान, ठाकरे सेनेच्या फुटेलेल्या ६ खासदाराविरुद्ध अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे धक्कादायक उदाहरण पाहत आहोत. हे निर्लज्ज, कृतघ्न आणि भ्रष्ट लोक जे काही विशिष्ट व्यक्तींमुळे २०२४ मध्ये निवडून आले तेच आता त्या लोकांना धोका देत आहेत! असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर...
19 Jun 2026 04:27 PM (IST)
Hormuz Strait Crisis: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी एक अंतरिम करार झाला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूकही पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे अमेरिकेसह संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळाला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद होती त्याचा त्रास जागतिक स्तरावर भोगावा लागला होता. जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यात मोठा व्यत्यय आला होता. या सगळ्याचा परिणाम अमेरिकेवरही दिसून आला होता. तेलाच्या किमतीही विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या आणि महागाईत लक्षणीय वाढ झाली होती. ही परिस्थिती आणखी काही दिवस टिकली असती, तर अमेरिकेतील परिस्थिती आणखी बिघडली असती. नेमकी काय होती अमेरिकेची परिस्थिती ? वाचा सविस्तर...
19 Jun 2026 04:17 PM (IST)
क्रिकेट सामन्यादरम्यान झालेली एक सामान्य क्रीडा दुखापत अखेरीस अधिक गुंतागुंतीच्या अस्थिरोगाच्या प्रकरणात परिवर्तित झाली. ३१ वर्षीय क्रिकेटपटू उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आला असता, डॉक्टरांना त्याच्या दुसऱ्या गुडघ्यातील अनेक वर्षांपासूनची गंभीर समस्या आढळून आली. वाचा सविस्तर...
19 Jun 2026 04:07 PM (IST)
ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला शनि प्रदोष व्रत पाळले जाते. त्रयोदशी शनिवारी येत असल्यामुळे हे शनि प्रदोष व्रत आहे. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी तीन शुभ योग तयार होत असतात. जे या दिवशी उपवास करून भगवान शिवाची पूजा करतात, त्यांना संतती प्राप्त होते. यावेळी भक्तांना शिव पूजेसाठी २ तास १ मिनिटाचा शुभ वेळ मिळेल. शनि प्रदोष व्रत कधी आहे, मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व जाणून घेऊया. वाचा सविस्तर...
19 Jun 2026 03:59 PM (IST)
विविध मागण्यांसाठी राज्यभरातील प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) क्लार्क बेमुदत संपावर गेल्याने वाहन संबंधित अनेक कामे ठप्प झाली आहेत. याचा फटका नागरिकांसह रिक्षा चालकांना बसत आहे.
रिक्षा परमिट नूतनीकरण, लायसन्स नूतनीकरण, वाहन ट्रान्सफर प्रक्रिया तसेच इतर वाहन संबंधित कामे बंद असल्याने अनेक जण अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, एखादा अपघात झाला किंवा एखादी गंभीर घटना घडली तर कागदपत्रांची प्रक्रिया अपूर्ण असल्याने इन्शुरन्स क्लेम करताना अडचणी निर्माण होणार नाहीत का, असा सवाल रिक्षा चालकांकडून उपस्थित केला जात आहे.
19 Jun 2026 03:47 PM (IST)
नालासोपारा पश्चिमेतील पाटणकर पार्क पावर या सोसायटीत काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. मनसेने या पट्टीवर आक्षेप घेत धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र सोसायटीतील रहिवाशांनी हा दावा फेटाळून लावत, ही पट्टी केवळ सुरक्षेच्या आणि मार्गदर्शनाच्या उद्देशाने काढण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात शेवाळ साचल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पाणी साचल्यानंतर चालण्याचा मार्ग स्पष्ट दिसावा यासाठी एका रहिवाशाने स्वतःच्या खर्चातून ही पट्टी रंगवली होती. याबाबत १० जून रोजी सोसायटीला लेखी पत्रही देण्यात आले होते.
19 Jun 2026 03:34 PM (IST)
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असंख्य उद्यान आहेत या उद्यानाचा विकास करत असताना अनेक वृक्षांची लागवड सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे काही वृक्ष बिल्डरांच्या भूखंडावर इमारत बांधण्यासाठीआड येत आहेत या भूखंडावरची वृक्षतोड केली जाते मात्र नवी मुंबई महानगरपालिकेचे उद्यान विभाग डोळे बंद करून बसलेली आहे या विरोधात सूर्योदय युवा प्रतिष्ठानच्या वतीने वारंवार निवेदन देऊन सुद्धा महापालिकेच्या प्रशासनाने लक्ष दिले नसल्यामुळे एक दिवसाचा उपोषणाचा इशारा दिला आहे यापुढे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नवराष्ट्र शी बोलताना सत्यवान गायकवाड यांनी दिला
19 Jun 2026 03:27 PM (IST)
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामस्थांचा विरोध असताना देखील पाली साई डोंगर येथे टोरंट कंपनी कडून येथील जमिनीवर अतिक्रमण कायम ठेवले आहे. वन विभागाने आपली जमीन धरणे बांधण्यास देण्याचा निर्णय घेतला असल्याने त्या जमिनी वर असलेली 200 वर्षे जुनी झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे.दरम्यान जंगलातील झाडे तोडण्यास स्थानिक पर्यावरण प्रेमी यांनी विरोध केला असून तेथील जंगलात लावलेल्या आगी बद्दल देखील संताप व्यक्त केला आहे.झाडे काही दिवसांनी पडतील अशी व्यवस्था करण्यात येत असून झाडांच्या मुळाशी करवतीचे घाव घातले जात आहेत.
19 Jun 2026 03:17 PM (IST)
कोयना धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका आता थेट औद्योगिक क्षेत्राला बसू लागला आहे. उद्योगमंत्र्यांच्या मतदारसंघातील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक उद्योग अडचणीत आले असून, नामांकित घरडा केमिकल कंपनीचे सर्व युनिट बंद करण्यात आले आहेत.
19 Jun 2026 02:59 PM (IST)
ठाणे आणि नवी मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे खाडीवर कोपरी ते पटनी या मार्गादरम्यान आधुनिक 6 पदरी पूल बांधण्याची योजना राबवली जाणार आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांतील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार असून, प्रकल्पाच्या कामासाठी संबंधित यंत्रणेकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
19 Jun 2026 02:52 PM (IST)
२१ जून रोजी बंडखोर खासदार आपली भूमिका मांडणार आहेत. यावेळी अधिकृतपणे पक्ष सोडल्याचं जाहीर करणार आहेत. उद्धव ठाकरेंना का सोडलं याची कारणं जनतेसमोर मांडणार आहे. यावेळी ६ खासदार यांच्या सह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला असणारअधिकृतपणे पक्ष सोडल्याचं जाहीर करतील.
19 Jun 2026 02:41 PM (IST)
उद्धव ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. इतर खासदार पक्ष सोडून गेले तरी वाजे मात्र ठाकरेंसोबत कायम असल्याने ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.
19 Jun 2026 02:31 PM (IST)
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईतील बससेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. वडाळा डेपोत आंदोलन आणि कर्मचाऱ्यांची भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसफेऱ्या रद्द झाल्याने अनेक बसस्टॉपवर प्रवाशांची गर्दी वाढली असून मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.
19 Jun 2026 02:20 PM (IST)
नाशिकच्या येवला तालुका पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. रात्री नगरसुलमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल 70 हजार रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्य साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलंय. येवला तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
19 Jun 2026 02:12 PM (IST)
राजकीय संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.... सोशल मीडियावर बाळासाहेबांचा एक बोलका फोटो शेअर करत त्यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या ओळी लिहिल्या आहेत. किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी. अस उद्धव ठाकरेंनी लिहलं आहे.
19 Jun 2026 02:09 PM (IST)
भाजप नेते व आमदार प्रसाद लाड यांनी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणच करु नये अशी विनंती यावेळी प्रसाद लाड यांनी केली. मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्याने मी त्यांचा आभारी असल्याचं लाड यांनी सांगितलं.
19 Jun 2026 01:59 PM (IST)
महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या (ICC Womens T20 World Cup 2026) स्पर्धेदरम्यान भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाची स्टार ऑलराउंडर श्रेयंका पाटील दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तिच्या जागी युवा लेग-स्पिनर प्रेमा रावतला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. बुधवारी (दि.१७) नेदरलँड्सविरुद्धच्या ‘अ’ गटाच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना श्रेयंका पाटीलच्या पायाला दुखापत झाली. दुखापत इतकी गंभीर होती की तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले. यानंतर वैद्यकीय तपासणीत हे स्पष्ट झाले की ती स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
19 Jun 2026 01:45 PM (IST)
राज्यात मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागल्याने पावसाची प्रतीक्षा वाढली असतानाच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आगामी 15 दिवसांच्या विस्तारित अंदाजाने दिलासा आणि सावधगिरीचा असा दुहेरी संदेश दिला आहे. १८ ते २४ जूनदरम्यान महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती तुलनेने कमकुवत राहण्याची शक्यता असून, २५ जूननंतर मात्र मान्सूनला पुन्हा वेग मिळून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. यात कोकण पट्टयात मुसळधारेचा अंदाज आहे.
19 Jun 2026 01:33 PM (IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ८६ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध देणी रक्कम अंदाजे ७,५०० कोटी रुपये इतकी थकित असून एस्. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती खालावली असल्याने सदर रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यासाठी एसटीकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे एक वेळचा पर्याय म्हणून शासनाने अर्थ सहाय्य करावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. यावेळी श्रीरंग बरगे यांनी आज (19 जून 2026) एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या संदर्भातील निवेदन देण्यात आले
19 Jun 2026 01:23 PM (IST)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील (उबाठा) सहा खासदार फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. खासदारांचा गट फोडण्यासाठी आखलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा शिंदे सेनेतील काही नेत्यांकडून केला जात आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नऊ पैकी केवळ तीनच खासदार उपस्थित होते. तर दुसरीकडे आज (19 जानेवारी 2026) शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे.
19 Jun 2026 01:13 PM (IST)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना २० जून रोजी खेळवला जाणार आहे. यापूर्वी, BCCI ने हर्षित राणाचा भारतीय संघात समावेश केला आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी एका सराव सामन्यादरम्यान तो जखमी झाला होता. बीसीसीआयने माहिती दिली की, सेंटर ऑफ एक्सलन्सकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हर्षितचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या आगमनाने भारतीय वेगवान गोलंदाजी विभाग अधिक मजबूत होईल. त्याला थेट अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची संधीही मिळू शकते. अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघात सातत्याने बदल केले जात आहेत
19 Jun 2026 01:02 PM (IST)
तळेगाव चौकात डाव्या बाजूने आलेल्या एका भरधाव कंटेनरने पादचारी महिलेला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये कंटेनरचे चाक महिलेच्या पाय आणि कमरेवरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही अपघाताची घटना रविवारी (१४ जून) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे घडली आहे.
19 Jun 2026 12:48 PM (IST)
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील गुंजाळवाडी फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१७) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. लौकिक सखाराम मुलमुले (वय ३२, रा. बेल्हे, ता. जुन्नर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
19 Jun 2026 12:36 PM (IST)
आंबोली-दोडामार्ग राखीव वनक्षेत्रात बेकायदेशीर शिकार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळ्यांचा वनविभागाने पर्दाफाश केला असून, दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये ८ आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे आगर असलेल्या या संवर्धन क्षेत्रातून आरोपींकडून गावठी ठासणीची बंदूक, काडतूस बंदूक, जिवंत व वापरलेली काडतुसे, तलवार, विजेऱ्या, एक आलिशान एमजी हेक्टर गाडी आणि शिकार केलेले दुर्मिळ वन्यजीव जप्त करण्यात आले आहेत.
19 Jun 2026 12:24 PM (IST)
आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथे १६ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.१७) रात्री घडली. सार्थक किरण वाघ (वय १६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश पिंगळे हे अंकुश डोके यांच्या घरी पूजेच्या कार्यक्रमासाठी गेले असताना रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास आरडाओरडाचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता सार्थक वाघ याच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे निदर्शनास आले. घरातील सदस्यांनी खिडकीतून पाहिले असता सार्थक याने घरातील वासाला कपड्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर नातेवाईकांनी दरवाजा तोडून त्याला खाली उतरविले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, मंचर येथे दाखल केले. मात्र तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी नातेवाईकांनी कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले असून मंचर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
19 Jun 2026 12:12 PM (IST)
२१ जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेच्या ३ दिवस आधी अहमदाबादच्या न्यू राणीप परिसरातील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून एका नीट विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, पीडित विद्यार्थ्यांचे कुटुंब धक्क्यात आहे. मृत विद्यार्थ्यांची ओळख १८ वर्षीय कहान पटेल अशी पटली आहे. पोलिसांचे एक पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमी मुलाला स्थानिक रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
19 Jun 2026 12:00 PM (IST)
महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाने आज चित्रपटगृहांमधील यशस्वी ५० दिवस पूर्ण करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर ‘राजा शिवाजी’ने त्या सर्व अपेक्षांनाही मागे टाकत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश संपादन केले. रितेश विलासराव देशमुख यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला आणि त्यांच्या प्रमुख भूमिकेने सजलेला हा चित्रपट जगभरात १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. मात्र ‘राजा शिवाजी’चे यश केवळ आर्थिक आकडेवारीपुरते मर्यादित नाही. गेल्या ५० दिवसांत या चित्रपटाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ‘हिंदवी स्वराज्या’ची प्रेरणा, स्वाभिमानाची भावना आणि इतिहासाबद्दलचा अभिमान पुन्हा एकदा जनमानसात जागवण्यात या चित्रपटाला मोठे यश मिळाले आहे.
19 Jun 2026 11:55 AM (IST)
सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आणि 21 जूनला सुरु होणाऱ्या नीट परिक्षांच्या पारर्श्वभूमीवर सरकार अँक्शन मोडवर आलं. या सगळ्यावर लोकप्रिय आणि बहुचर्चित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 22 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता. टेलिग्राम ॲपवरील तात्पुरत्या बंदीला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. टेलिग्रामसाठी दिल्ली उच्चन्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने ती जाचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने नेमका काय निर्णय घेतलाय जाणून घेऊयात.
19 Jun 2026 11:50 AM (IST)
Mumbai BEST Bus Strike : एकीकडे आज म्हणजेच 19 जून 2026 रोजी मुंबईतील बीकेसी येथे ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट डे’ साजरा केला जात आहे, तर दुसरीकडे 18 जूनच्या मध्यरात्रीपासून बेस्टचे बस आणि वीज विभागातील कर्मचारी संपावर गेले आहेत.18 जूनच्या सायंकाळी झालेल्या बैठकीत बेस्ट समितीचे सदस्य नितीन नांदगावकर यांनी कर्मचाऱ्यांना मध्यरात्रीनंतर डेपोतून एकही बस बाहेर काढू नये, असे आवाहन करत आंदोलनाची घोषणा केली. या बैठकीला चालक, वाहक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. मुंबईतील २२ बस डेपो जागतिक दर्जाचे होणार; ‘बेस्ट’च्या पुनर्विकासाची …
19 Jun 2026 11:45 AM (IST)
JD Vance Switzerland visit cancelled : जागतिक राजकारणाला आणि विशेषतः पश्चिम आशियातील युद्धाला कलाटणी देणाऱ्या ऐतिहासिक अमेरिका-इराण शांतता कराराच्या (US-Israel Iran War) अंमलबजावणीला सुरुवातीलाच मोठ्या राजनैतिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी गुरुवारी एका १४-कलमी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केल्यानंतर, दोन्ही देशांमधील पहिली तांत्रिक स्तरावरील बैठक स्वित्झर्लंडमध्ये होणार होती. या चर्चेचे नेतृत्व करण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स (JD Vance) हे गुरुवारी रात्री स्वित्झर्लंडला रवाना होणार होते. परंतु, अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला असून शुक्रवारी होणारी ही अत्यंत महत्त्वाची बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
19 Jun 2026 11:40 AM (IST)
प्रत्येक प्रेम कथेला आपला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या ड्रामाची गरज नसते. ‘कॉकटेल २’ हा चित्रपट नेमका याच कारणामुळे प्रभावी ठरतो, कारण तो गोष्टी सहज आणि सोप्या ठेवतो. नात्यांकडे एका त्रयस्थ नजरेने पाहणारा हा चित्रपट आपल्या पात्रांना पडद्यावर मोकळेपणाने जगण्याची संधी देतो. नवराष्ट्रने या चित्रपटाला ३.५ स्टार्स दिले आहेत. पहिला ‘कॉकटेल‘ चित्रपट हा स्टाईल, ग्लॅमर आणि हाय-एनर्जीसाठी ओळखला गेला होता, मात्र हा चित्रपट एक शांत आणि प्रगल्भ वाट निवडतो. कथेच्या आणि टोनच्या बाबतीत याचा पहिल्या चित्रपटाशी कोणताही थेट संबंध नाही. त्याऐवजी, हा चित्रपट आपली एक वेगळी, अधिक खाजगी, वास्तववादी आणि आजच्या पिढीच्या नात्यांच्या जवळ जाणारी दुनिया उभी करतो.
19 Jun 2026 11:30 AM (IST)
OnePlus Smartphone Launched: टेक कंपनी वनप्लसने गेल्यावर्षी भारतात OnePlus 15R हा नवीन स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनचे आणखी एक नवीन व्हेरिअंट भारतात लाँच करण्यात आले आहे. या नव्या व्हेरिअंटमध्ये 16GB रॅम ऑफर केली जात आहे. तर इंटरनल स्टोरेज कॅपेसिटी 512GB आहे. या स्मार्टफोनच्या इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
19 Jun 2026 11:20 AM (IST)
नागपूर : शिवसेनेच्या हिरकमहोत्सवी वर्षात शिंदे गटात उत्साही वातावरण तयार होत आहे. तर, ठाकरे गटात अस्वस्थता असून, शिवसैनिकांची घालमेल सुरू आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे व शिंदे गटाने पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सुरुवातीच्या काळात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आणि खासदारांच्या स्वतंत्र गटाने ठाकरे गटातील शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. याउलट शिंदे सेनेतील सैनिकांचा उत्साह वाढतच होत चालला आहे.
19 Jun 2026 11:15 AM (IST)
Anupama Singh UN speech Pakistan : संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मंचावर भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा फुगा फोडला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) ६२ व्या सत्रात भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव आणि आयएफएस (IFS) अधिकारी अनुपमा सिंग यांनी पाकिस्तान आणि ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (OIC) ने जम्मू-काश्मीरबाबत केलेले सर्व आरोप अत्यंत तीव्र शब्दांत फेटाळून लावले. अनुपमा सिंग यांनी आपल्या भाषणात काश्मीर प्रश्न, सिंधू जल करार (Indus Waters Treaty) आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर इस्लामाबादच्या दुटप्पी धोरणावर घणाघाती प्रहार केला. त्यांनी स्पष्ट केले की, स्वतःच्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःला ‘दहशतवादाचा बळी’ म्हणून सादर करू शकत नाही.
19 Jun 2026 11:10 AM (IST)
Niamey airport terrorist attack Niger 2026 : पश्चिम आफ्रिकेतील वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. नायजर (Niger) देशाची राजधानी नियामे (Niamey) येथील ‘डिओरी हमाणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर’ (Diori Hamani International Airport) गुरुवारी पहाटेच्या सुमारास सशस्त्र दहशतवाद्यांनी एक अत्यंत भीषण आणि संघटित हल्ला चढवला. या आत्मघाती हल्ल्यामुळे संपूर्ण विमानतळ परिसर गोळीबार आणि शक्तिशाली बॉम्बस्फोटांच्या आवाजाने हादरून गेला. या हल्ल्याला तोंड देताना नायजर लष्कराचे ११ शूर सैनिक आणि २ सामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत सतर्कता दाखवत केलेल्या धाडसी कारवाईत २२ हल्लेखोरांना जागीच ठार केले आहे.
19 Jun 2026 11:00 AM (IST)
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) NEET UG 2026 पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. NTA ने २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याकरिता SMS, ईमेल आणि WhatsApp द्वारे स्मरणपत्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे. ही सुविधा विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी अद्याप त्यांचे नवीन प्रवेशपत्र डाउनलोड केलेले नाही.
19 Jun 2026 10:50 AM (IST)
टेक कंपनी Oppo ने ऑल न्यू Oppo Reno 15A 5G अखेर लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Oppo Reno 13A चा सक्सेसर असल्याचे सांगितलं जात आहे. कंपनीने हा स्मार्टफन काही निवडक ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईस तीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. दमदार क्वालकॉम स्नॅपड्रगन 6 सीरीज प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया.
19 Jun 2026 10:40 AM (IST)
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे निकाल मागील आठवड्यांपासून जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. या परीक्षांमध्ये अपेक्षित गुण न मिळालेले विद्यार्थी हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु बहुतांशी विद्यार्थी या-ना-त्या कारणामुळे प्रवेशापासून वंचित राहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीची लिंक सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना सचिव ॲड. वैभव थोरात यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे पत्रद्वारे केली आहे.
19 Jun 2026 10:30 AM (IST)
फ्रान्सच्या एव्हियन-ले-बेन्स येथे G7 परिषदत पार पडली. या परिषदेसाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत आमंत्रण देण्यात आले होते. ही परिषद संपली असून गुरुवारी (१८ जून) मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना एका खास अंदाजात निरोप दिला. त्यांनी हिंदी भाषेत एक संदेश रेकॉर्ड करत सोशल मीडियावर शेअर केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.