Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: मराठी शाळा ओस, उर्दू शाळांत रांगा; जळगावात नेमकं काय घडतंय?

Jalgaon News: जळगाव महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये यंदा इयत्ता पहिलीत ५३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यापैकी उर्दू माध्यमात सर्वाधिक ४२६, मराठी माध्यमात १०८, तर हिंदी माध्यमात केवळ ५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 28, 2026 | 11:16 AM
Jalgaon News: मराठी शाळा ओस, उर्दू शाळांत रांगा( Photo सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: मराठी शाळा ओस, उर्दू शाळांत रांगा( Photo सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इयत्ता पहिलीत ५३९ प्रवेश
  • मोफत शिक्षणाची सुविधा
  • मराठी माध्यमातील घट
Jalgaon News : खासगी शाळांमधील प्राथमिक शिक्षणाचा खर्च वाढत असतानाही महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये आजही मोफत शिक्षण दिले जात आहे. यंदा इयत्ता पहिलीत तब्बल ५३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, मराठी माध्यमापेक्षा उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. महापालिकेतर्फे इयत्ता आठवीपर्यंत मराठी, उर्दू आणि हिंदी माध्यमातून मोफत प्राथमिक शिक्षण दिले जाते.

इयत्ता पहिलीसाठी तिन्ही माध्यमांत प्रवेश

महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या १२, उर्दू माध्यमाच्या १० आणि हिंदी माध्यमाची एक शाळा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता पहिलीसाठी तिन्ही माध्यमांत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यावर्षी एकूण ५३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती महापालिका शिक्षण मंडळाने दिली. त्यामध्ये मराठी माध्यमात १०८, उर्दू माध्यमात ४२६, तर हिंदी माध्यमात केवळ ५ विद्याथ्यांनी प्रवेश घेतला आहे. मोफत शिक्षणासह विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध असूनही संख्या घट आहे.

Jalgaon News: स्वच्छतेचा वसा, हरिततेचा ध्यास! जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम

मुलींची संख्या अधिक

यंदा मुलींची संख्या मुलांपेक्षा किंचित अधिक आहे. एकूण २६९ मुलांनी, तर २७० मुलींनी प्रवेश घेतला आहे. मराठी माध्यमात ५६ मुले व ५२ मुली, उर्दू माध्यमात २११ मुले व २१५ मुली, तर हिंदी माध्यमात २ मुले व ३ मुलींनी प्रवेश घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

उर्दूला अधिक पसंती

उर्दू माध्यमाच्या पालकांची आजही महापालिकेच्या शाळांना अधिक पसंती असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकूण ४,८२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी उर्दू माध्यमातील ३.८३९, मराठी माध्यमातील ९२१, तर हिंदी माध्यमातील ६३ विद्यार्थी आहेत. यामध्ये २.२९३ मुले आणि २,५३० मुलींचा समावेश आहे.

Maharashtra News: वंचित आघाडीचा रास्ता रोको, पोलिसांकडून आंदोलनकर्ते ताब्यात

शिक्षण समितीची स्थापना नाही

राज्य शासनाने राज्यातील सर्व नगरपालिका व महापालिकांतील शिक्षण मंडळे बरखास्त केली आहेत. शिक्षण व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची शिक्षण समिती स्थापन करण्याची तरतूद असली, तरी जळगाव महापालिकेत अद्याप या समितीची स्थापना झालेली नाही.

Web Title: Marathi schools fall urdu schools line up what is really happening in jalgaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • Jalgaon News
  • Latest Marathi News

संबंधित बातम्या

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
1

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Hollywood News : हेडन पॅनेटीअरच्या मृत्यूचं गूढ उकललं; फेंटॅनिलसह इतर पदार्थांच्या विषारी परिणामाने मृत्यू
2

Hollywood News : हेडन पॅनेटीअरच्या मृत्यूचं गूढ उकललं; फेंटॅनिलसह इतर पदार्थांच्या विषारी परिणामाने मृत्यू

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
3

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
4

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.