Vanchit Aaghadicha Rasta Roko News (फोटो सौजन्य- सोशलमी
आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वंचित बहुजन आधाडीच्या पदाधिका-यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला.
रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलन सुरूच राहिल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवसांपासून विद्यार्थी ठिय्या आंदोलन करत बसले आहेत. या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. प्रकाश आंबडेकर यांनी 25 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी महाराष्ट्र बंदला पाठिंबा मिळत गेला. गेल्या अनेकदिवसांपासून सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले आहेत. क्रॉकोज जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके हे सुद्धा सोनम वांगचूक यांच्यासोबत उपोषणाला बसले आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी आहे. जो पर्यंत शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत. तो पर्यंत आंदोलनमागे घेणार नाही असे ठाम भूमिकेवर दिल्लीतील आंदोलन करत आहेत.






