दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
पुन्हा पाऊस…! मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता
आतापर्यंत ज्या ठिकाणांच्या दुष्काळाची माहिती मिळाली आहे, त्याठिकाणी उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. तसेच अधिसुचना काढण्याचे कामही सुरू झाले आहे. जसजशी माहिती येत राहिल त्यानुसार त्या भागांचाही समावेश केला जाईल, येत्या शनिवारपूर्वी दुष्काळासंदर्भाची अधिसूचना काढण्यात येईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. याशिवाय गरज पडल्यास केंद्र सरकारकडेही आर्थिक मदत मागितली जाऊ शकते, पण केंद्र सरकारच्या मदतीसाठी थांबणार नाही, राज्य सरकारचे मदतकार्य सुरू राहिल, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आज (23 सप्टेंबर) विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सर्व मंत्र्यांनाही आपापल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे आणि पाहणी करण्याचे, गावागावात जनता दरबार घेण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेचा प्रत्येक मंत्री ग्राऊंड झिरोवर उतरला पाहिजे, उद्यापासून कामाला लागा, अशा स्पष्ट सुचनाही शिंदेंनी दिल्या आहेत.
भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यंनी अमरावतीतील वरूड-मोर्शी तालुक्यातील दुष्काळी भागांचा आढावा घेतला. मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी वरूड-मोर्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि नागरिकांच्या समस्यांसह पाणी टंचाईच्या समस्यांची माहिती दिली. यानंतर सुनेत्रा पवारांनी तत्काळ अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला.






