कर्जत/ संतोष पेरणे: माथेरान या पर्यटन स्थळी रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटक आले,या पर्यटकांना परतीच्या प्रवासाच्या वेळी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. घाटरस्त्यात वाहने अडकून पडल्याने पर्यटकांना चालत घाटरस्ता उतरावा लागला.या सर्व गैरसोयींमुळे पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळाले. या वाहतूक कोंडीबाबत पोलीस प्रशासन देखील हतबल झाल्याचे पर्यटक पाहत होते. दरम्यान शनिवारी रविवारी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करायला हवे अशा सूचना सातत्याने येत आहेत.
माथेरानला भेट देण्यास पर्यटक खास करुन पावसाळा आणि थंडीत मोठ्या प्रमाणात येतात. थंड हवेच्या ठिकाणी पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते. दररोज 4 ते 5 हजार पर्यटक माथेरानमधील धुके आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. शनिवार आणि रविवारी वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे तांडे माथेरानकडे पहाटे पासून सुरु होतात आणि त्यामुळे माथेरानला जाणारा नेरळ गटारातसा हा सकाळी नऊ पासून वाहतूक कोंडीच्या आहारी जात असतो. रविवारी सर्वात जास्त पर्यटक माथेरान मध्ये आले होते आणि त्यांच्यासाठी परतीचा प्रवास मोठा त्रासदायक ठरला.पर्यटकांची वाहने आणि टॅक्सी गाड्या यांच्या कोंडीमुळे पर्यटकांना वॉटर पाईप स्टेशन पर्यंत आपले सामान सोबत घेऊन पायी प्रवास करावा लागत होता.सायंकाळ पासून पर्यटक दस्तुरी येथील वाहनतळ येथून गाड्या घेऊन निघाले आणि दुसरीकडे परतीच्या प्रवासासाठी निघालेले पर्यटक यांची टॅक्सी पकडण्यासाठी झालेली गर्दी यामुळे वाहतूक कोंडी माथेरान घाटरस्त्यात दिसून आली.
घाटात चांगभले मंदिराच्या खाली पर्यटकांनी टॅक्सी पकडण्यासाठी रांगा लावल्या होत्या. त्या पॉईंट पर्यंत साधारण 700 मीटर रस्ता चालत पर्यटकांना जावे लागत होते. तर तेथून देखील टॅक्सी सहज उपलब्ध होत नव्हती आणि त्यामुळे टॅक्सी साठी लागलेल्या रांगा बघून पर्यटक चालतच पुढे घाटरस्ता उतारताना दिसत होते.पर्यटकांचा आपल्या चिमुकळ्यांसह पायी प्रवास हा साधारण 2किलोमीटर पर्यटन म्हणजे एसटर्न पुढे सुरूच होता.पर्यटकांना पेब किल्ला पॉईंट आणि वॉटर पाईप येथे टॅक्सी मिळत होत्या. त्यामुळे पर्यटकांचे मेगा हाल तेथे बंदोबस्त करण्यासाठी असलेले पोलीस देखील त्यावेळी हतबल झालेले दिसून आले.दरम्यान ही अभूतपूर्ण गर्दी यामुळे मौजमजा करून निघालेले पर्यटक पायी चालत जात होते आणि या सगळ्या समस्येवर स्थानिक प्रशासनदेखील असमर्थ ठरले.