Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मायणीत नागपंचमीचा उत्साह; नागदेवतेच्या पूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी

Mayani Nag Pancham celebration : मायणीत नागपंचमीचा सण भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. चांदीच्या व मातीच्या नागोबांच्या मूर्तींची पूजा, ढोल-ताशांच्या गजरात नगरप्रदक्षिणा तसेच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 17, 2026 | 09:17 PM
मायणीत नागपंचमीचा उत्साह; नागदेवतेच्या पूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी
Follow Us
Follow Us:
  • मायणीत नागपंचमीचा उत्साह
  • नागदेवतेच्या पूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी
  • परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम
मायणी : श्रावण महिन्यातील पहिला सण आणि नागदेवतेच्या पूजेचा पवित्र दिवस म्हणून साजरी होणारी नागपंचमी मायणीत भक्तिभावाने, उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यंदा नागपंचमीचा योग श्रावणातील पहिल्या सोमवारी आल्याने मायणीतील पुरातन आणि ऐतिहासिक हेमाडपंथी महादेव मंदिर परिसरात भाविकांनी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तसेच नागदेवतेची पूजा करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

येथील श्री संत सेना महाराज नाभिक मंडळाच्या वतीने नागपंचमीच्या दिवशी सकाळी मातीच्या तसेच चांदीच्या नागोबांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी पार पडल्यानंतर या दोन्ही नागोबांच्या मूर्तींची ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत आणि जयघोषात नगर प्रदक्षिणा काढण्यात आली.त्यानंतर धनगर विठोबा मंदिर व पुरातन हेमाडपंती महादेव मंदिरातील नागोबा मंदिरात चांदीच्या नागोबासह मातीपासून तयार केलेल्या नागोबाच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली.

भाविकांनी महादेवाला जलाभिषेक करून बेलपत्र, फुले आणि इतर पूजासाहित्य अर्पण केले. नागदेवतेला दूध, लाह्या, दुर्वा, फुले आदी अर्पण करून महिलांनी पारंपरिक पद्धतीने नागपंचमीची पूजा केली.नाभिक समाजाच्या पुढाकाराने जपली जाणारी ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून मायणीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानले जाते. भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. विविध मंदिरांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी महिला झिम्मा फुगडी फेर आदी खेळ खेळताना दिसत होत्या.

औरंगजेबाच्या तावडीतून सुटका अन् स्वराज्याची गरुडझेप! आग्र्यात घुमला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जयघोष

Web Title: Mayani nag panchami celebration maharashtra nag devta puja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • celebretion news
  • Festival News
  • nagpanchami news

संबंधित बातम्या

Nag Panchami 2026: श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा दुर्मिळ योग; शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी
1

Nag Panchami 2026: श्रावण सोमवार आणि नागपंचमीचा दुर्मिळ योग; शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

नागदेवतेच्या आशीर्वादाने लाभो सुख-समृद्धी…! श्रावणातील नागपंचमीच्या नातेवाईक आणि प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
3

नागदेवतेच्या आशीर्वादाने लाभो सुख-समृद्धी…! श्रावणातील नागपंचमीच्या नातेवाईक आणि प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

Navi Mumbai News : भव्य ११११ फूट तिरंगा यात्रेत पनवेल-खारघरमध्ये राष्ट्रभक्तीचा जल्लोष !
4

Navi Mumbai News : भव्य ११११ फूट तिरंगा यात्रेत पनवेल-खारघरमध्ये राष्ट्रभक्तीचा जल्लोष !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.