Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाचा FDA ला सवाल; मुंबई क्रिकेट असोसिएशनला मोठा दिलासा

MCA आणि FDA यांच्यातील वादात मुंबई क्रिकेट असोसिएशनला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. BKC येथील MCA क्लबच्या किचनवरील बंदी उठवताना न्यायालयाने FDA च्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Aug 29, 2026 | 06:26 PM
‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाचा FDA ला सवाल

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाचा FDA ला सवाल

Follow Us
Follow Us:
  • MCA क्लबच्या किचनवरील FDA ची बंदी हायकोर्टाने उठवली
  • 87 वरून किचनचे गुणांकन 95 वर; तरी कारवाईवर न्यायालयाचे सवाल
  • ‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाचा FDA ला सवाल
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने MCA ला मोठा दिलासा दिला आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील MCA क्लबच्या किचनवर FDA ने केलेली कारवाई आणि बंदीच्या निर्णयावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. FDA ने कायदेशीर स्थितीचा पूर्ण विचार न करता घाईघाईने कारवाई केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी FDA च्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने कठोर शब्दांत प्रश्न उपस्थित केले. यापूर्वीही न्यायालयाने प्रकरणाचा फेरविचार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही FDA ने व्यावहारिक दृष्टिकोन न स्वीकारता केवळ तांत्रिक बाबींवर भर दिल्याचे न्यायालयाने म्हटले.

‘तुम्ही देव आहात, काहीही करू शकता असं वाटतं का?’

सुनावणीदरम्यान न्यायालयाने FDA आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कायदेशीर परिस्थितीचा पूर्ण अभ्यास न करता अनावश्यक घाई का करण्यात आली, असा सवाल खंडपीठाने केला.

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

तसेच, FDA च्या अधिकाऱ्यांना यापूर्वीही वारंवार फटकारण्यात आले असल्याचे न्यायालयाने नमूद केले. ‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ अशा कठोर शब्दांत न्यायालयाने FDA च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अवमानाची कारवाई करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.

87 वरून किचनचे गुण 95 वर

MCA क्लबच्या किचनवरील FDA कारवाईच्या टाइमलाइनकडे पाहिल्यास हा वाद अधिक स्पष्ट होतो. 20 ऑगस्ट रोजी FDA ने केलेल्या तपासणीत किचनला 110 पैकी 87 गुण मिळाले होते. त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

27 ऑगस्ट रोजी झालेल्या पुनर्तपासणीत किचनचे गुणांकन वाढून 95 झाले. त्यामुळे किचनच्या स्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून येत असतानाही कारवाई सुरू राहिल्याने MCA ने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

सुनावणीदरम्यान समाधानकारक गुणांकन असतानाही किचनवर बंदी कायम ठेवण्याच्या FDA च्या निर्णयावर न्यायालयाने सवाल उपस्थित केले. अखेर BKC येथील MCA क्लबच्या किचनवरील बंदी उठवण्याचे आदेश देण्यात आले.

Parliament Special Session: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संसदेचे विशेष अधिवेशन होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

MCA कडून निर्णयाचे स्वागत

न्यायालयाच्या निर्णयानंतर MCA BKC चे अध्यक्ष अजय देसाई यांनी समाधान व्यक्त केले. प्रतिष्ठित संस्थांवर अशा प्रकारची कारवाई करून नेमके काय सिद्ध करायचे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायालयाने अखेर न्याय दिल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून राज्यभरात खाद्य सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात कारवाई सुरू आहे. मात्र, MCA प्रकरणात न्यायालयाने FDA च्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे.

Web Title: Mca vs fda bombay high court relief mca bkc kitchen fda action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • FDA
  • MCA
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

दुष्काळामुळे तुकाराम मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच; कराड नगरपरिषदेचा काटकसरीचा निर्णय
1

दुष्काळामुळे तुकाराम मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच; कराड नगरपरिषदेचा काटकसरीचा निर्णय

Bombay High Court : मुंबईत दिवाळीला फटाक्यांवर बंदी? डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सबाबतही उच्च न्यायालयाचे दिले महत्वाचे निर्देश
2

Bombay High Court : मुंबईत दिवाळीला फटाक्यांवर बंदी? डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सबाबतही उच्च न्यायालयाचे दिले महत्वाचे निर्देश

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू
3

Court Staff Protest : समान वेतानासह कामासाठी न्यायालयीन कर्मचार्‍यांचे आंदोलन; आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ व १७ ऑक्टोंबरपासून सुरू

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा
4

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.