Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MCOCA: वारंवार गुन्हे करणाऱ्या डॉक्टरांवर ‘मकोका’ची टांगती तलवार; मराठवाड्यात विशेष तपासणी मोहीम सुरू

संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत अलीकडेच उघडकीस आलेल्या स्त्रीभ्रूण हत्यांच्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकरणांमागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 10, 2026 | 09:00 PM
MCOCA for Female Foeticide, Chhatrapati Sambhajinagar News, Beed Gender Detection Case, Health Minister Prakash Abitkar,

MCOCA for Female Foeticide, Chhatrapati Sambhajinagar News, Beed Gender Detection Case, Health Minister Prakash Abitkar,

Follow Us
Close
Follow Us:
  • स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकार आक्रमक
  • संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत अलीकडेच उघडकीस आलेल्या स्त्रीभ्रूण हत्यांच्या घटनांमुळे प्रशासन सतर्क
  • आठ दिवसांत पुन्हा आढावा बैठक होणार असून, पुढील अधिवेशनापर्यंत अंतिम निर्णय जाहीर
MCOCA for Female Foeticide: जिल्हा बेकायदेशीर गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपीविरोधात कठोर भूमिका घेत थेट मकोका लावण्याचा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर कठोर शिक्षेसाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Nashik News: शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा! ७४२ रुपये प्रीमियम भरला अन् विम्याच्या नावाखाली मिळाले अवघे १८३ रुपये

संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत अलीकडेच उघडकीस आलेल्या स्त्रीभ्रूण हत्यांच्या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. या प्रकरणांमागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले असून, कारवाईनंतरही आरोपी जामिनावर सुटून पुन्हा गुन्हे करत असल्याची बाब गंभीर मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस, जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभाग यांना संयुक्त पातळीवर कडक सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन कलमे वाढवणे आणि आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

 

मराठवाडा विभागात, विशेषतः बीडमध्ये, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक गतीने राबविण्यात येणार आहेत. संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून नियमित भेटी व तपासण्या केल्या जाणारआहेत. या संदर्भात आठ दिवसांत पुन्हा आढावा बैठक होणार असून, पुढील अधिवेशनापर्यंत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

मोठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी Metro चे नेटवर्क जोडले जाणार; प्रताप सरनाईक काय म्हणाले?

महिला रुग्णालय लवकरच सेवेत
जालनारोडवरील दुध डेअरी मैदान परिसरात उभारण्यात आलेले ४०० खाटांचे महिला व शिशू रुग्णालय लवकरच रुग्णसेवेत दाखल होणार आहे. निधीअभावी रखडलेला हा प्रकल्प आता मार्गी लागला असून, हुडकोमार्फत आर्थिक प्रश्न सुटल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले. रुग्णालयासाठी सुमारे ५ हजार पदभरतीचा प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर असून, आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. पुढील दोन महिन्यांत रुग्णालय सुरू होईल.

 

काय आहे पीसीपीएनडीटी कायदा? स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठीच्या कडक तरतुदी?

महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रामुख्याने ‘पीसीपीएनडीटी’ (PCPNDT) हा कायदा अत्यंत प्रभावीपणे राबवला जातो. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायदा, १९९४ (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act – PCPNDT) करण्यात आला आहे. गर्भधारणेपूर्वी किंवा प्रसवपूर्व तंत्राचा वापर करून लिंग निवडणे किंवा लिंग चाचणी करणे यावर बंदी घालणे, हा या कायद्याचा उद्देश आहे.

सोनोग्राफी किंवा इतर कोणत्याही तंत्राद्वारे गर्भातील बाळाचे लिंग तपासणे हा कायदेशीर गुन्हा आहे. गर्भलिंग निदानासंदर्भात कोणतीही जाहिरात (छापील, डिजिटल किंवा तोंडी) करणे निषिद्ध आहे. सर्व सोनोग्राफी केंद्रांची शासकीय नोंदणी असणे बंधनकारक आहे. अवैध गर्भलिंग निदानाची माहिती देण्यासाठी शासनाने १८००२३३४४७५ हा टोल-फ्री क्रमांक आणि amuchimulgimaha.in हे पोर्टल सुरू केले आहे.

“लेजेंड” म्हणत ‘धुरंधर 2’ दिग्दर्शक आदित्य धरने केले प्रभासचे कौतुक; पॅन-इंडिया स्टारडम पुन्हा चर्चेत

शिक्षेच्या तरतुदी

या कायद्याचे उल्लंघन केल्यास खालीलप्रमाणे कठोर शिक्षा होऊ शकते:

डॉक्टरांसाठी: प्रथम गुन्ह्यासाठी ३ वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि १०,००० रुपयांपर्यंत दंड. गुन्हा सिद्ध झाल्यास वैद्यकीय परिषदेकडून डॉक्टरांची नोंदणी कायमस्वरूपी रद्द होऊ शकते.

कुटुंबियांसाठी: लिंग चाचणीची मागणी करणाऱ्या पतीला किंवा नातेवाईकांना ५ वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि ५०,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

 

 

 

 

Web Title: Mcoca to be imposed on accused of female foeticide maharashtra health ministers stern warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • health minister
  • Marathwada
  • MCOCA Action

संबंधित बातम्या

जायकवाडीचे नियोजन की पैशांचा ‘उद्योग’? ७५० कोटींच्या नव्या टेंडरमुळे चर्चांना उधाण; तज्ज्ञांकडून पाणी नियोजनावर प्रश्नचिन्ह
1

जायकवाडीचे नियोजन की पैशांचा ‘उद्योग’? ७५० कोटींच्या नव्या टेंडरमुळे चर्चांना उधाण; तज्ज्ञांकडून पाणी नियोजनावर प्रश्नचिन्ह

दहा वर्षे झाली तरी मराठवाडा सिंचनात ‘दुष्काळीच’! विदर्भातील ६८ प्रकल्प अद्यापही अपूर्ण; आर्थिक पाहणी अहवालातून सरकारची पोलखोल
2

दहा वर्षे झाली तरी मराठवाडा सिंचनात ‘दुष्काळीच’! विदर्भातील ६८ प्रकल्प अद्यापही अपूर्ण; आर्थिक पाहणी अहवालातून सरकारची पोलखोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.