Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: मेढा सोसायटीत शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची बाजी; डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर

मेढा सेंटर विकास सेवा सोसायटीच्या बँक ठरावावरून मोठी राजकीय चुरस रंगली. अखेर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने ८ विरुद्ध ५ अशा बहुमताने डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर करत सोसायटीवरील आपले वर्चस्व कायम राखले. या घडामोडीमुळे विरोधकांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 27, 2026 | 07:08 PM
मेढा सोसायटीत शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची बाजी; डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर

मेढा सोसायटीत शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची बाजी; डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर

Follow Us
Follow Us:
  • डॉ.वांगडे यांना मिळाले निष्ठेचे फळ
  • मेढा सोसायटी ठराव नावावर शिक्कामोर्तब
  • हाय व्होल्टेज ड्राम्यांनंतर अखेर ठराव शिवेंद्रसिंहराजे गटाचाच
दत्तात्रय पवार, मेढा : सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मेढा सेंटर विकास सेवा सोसायटीच्या बँक ठरावावरून मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. सुरुवातीला ठरावाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा रंगला. मात्र, अखेरीस मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने त्यांच्या गटाने ८ विरुद्ध ५ अशा बहुमताने ठराव मंजूर करून आपले वर्चस्व कायम राखले.

या ठरावात डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. गत पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी पॅनलकडून १२ विरुद्ध १ असा निकाल लागला असताना डॉ. वांगडे हे शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे एकमेव संचालक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या सातत्यपूर्ण निष्ठेला अखेर फळ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वाई तालुक्यात FDAच्या कारवायांचा दिखावा की खरोखरची धडक मोहीम? जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह!

सत्तांतरानंतर बदलले चित्र

मेढा सेंटर विकास सेवा सोसायटी ही बारा गावांचा समावेश असलेली महत्त्वाची संस्था असल्याने तिचे राजकीय महत्त्व मोठे मानले जाते. पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार सदाशिव सपकाळ आणि अमित कदम यांच्या पॅनेलने विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतरच्या तीन वर्षांत ज्ञानदेव रांजणे यांच्या प्रयत्नांतून अनेक संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाकडे वळले आणि अखेर सत्तांतर घडून आले.

शिंदे गटाला बहुमत मिळवता आले नाही

बँक ठरावाच्या वेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटात जोरदार राजकीय चुरस पाहायला मिळाली. मात्र, भोसले गटाकडे आठ संचालकांचे बहुमत असल्याने डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव मंजूर झाला. शिंदे गटाकडे केवळ पाच संचालक राहिल्याने त्यांना बहुमत मिळवण्यात अपयश आले. डॉ. रामदास वांगडे यांच्या नावाचा ठराव सुरेश दळवी यांनी सूचविला, तर पुंडलिक पार्टे यांनी त्यास अनुमोदन दिले.

विरोधी सोसायट्याही भोसले गटाकडे

तालुक्यातील मेढा आणि गांजे या दोन्ही सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थक पॅनेलचा पराभव झाला होता. मात्र, निवडणुकीनंतर त्यांनी विरोधी गटातील संचालकांना आपल्या बाजूने वळवून दोन्ही सोसायट्यांतील ठराव आपल्या गटाच्या बाजूने मंजूर करून घेतले. त्यामुळे विरोधकांना मोठा राजकीय धक्का बसला असून, मेढा सोसायटीतील भविष्यातील फोडाफोडीलाही या निर्णयामुळे पूर्णविराम मिळाल्याची चर्चा सुरू आहे.

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश

Web Title: Medha society bank resolution shivendrasinh bhosale group retains control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • political news
  • Satara
  • Shashikant Shinde

संबंधित बातम्या

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
1

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
2

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
3

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार
4

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.