
Swabhimani Farmers Protest : ऊसाला 4,500 रुपये प्रतिटन दरासाठी शेतकरी आक्रमक; पुणे-बंगळूर महामार्गावर चक्काजाम
ऊसाला प्रतिटन 4 हजार 500 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Farmers Protest) साताऱ्यात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. गेल्या 36 तासांपासून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, ऊसदराचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेदरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी आता पोलीस अधिक्षक निखील पिंगळे हे रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान, उस दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. पण शेतकरी संघटनांनी यावर बहिष्कार टाकल्यामुळे उसदराचा प्रश्न अधांतरीच राहिला असून गुरुवारी सकाळी अकरा वाजता ही बैठक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभुराज देसाई घेणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनानी ऊसाला प्रतिटन 4 हजार 500 रुपये दर मिळावा, या मागणीवर दुसऱ्या दिवशीही ठामच राहिली आहे. दरम्यान, माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी नागठाणे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनस्थळी भेट दिली आहे.
Pune Water: पुणेकरांना Diwali 2026 चे मोठे गिफ्ट; पाणी कपातीबाबत महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पुणे-बंगळूर महामार्गावर किणी (जि. कोल्हापूर) आणि नागठाणे (ता. जि. सातारा) येथे चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. 4) आंदोलनस्थळी शेतकऱ्यांचा निर्धार कायम असतानाच स्थानिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. आंदोलनकर्त्यांच्या जेवणासह अन्य आवश्यक बाबींसाठी परिसरातील शेतकरी आणि व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करीत आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना मानसिक बळ मिळत आहे.
या आंदोलनामुळे सातारा शहरातील वाढे फाटा ते शिवराज पेट्रोल पंप या महामार्गावर ट्रकच्या रांगा लागलेल्या आहेत. तर सातारा शहरात ये-जा करणारी वाहतुक ही आता अडथळ्यांची शर्यत होऊ लागली आहे.
शेतकऱ्यांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये देण्याच्या मुद्द्यावरूनही आंदोलकांनी सरकारला धारेवर धरले. मंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना दिली जाणारी पाच हजार रुपयांची मदत किती तोकडी आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान शेतकरी बांधवांनी एकमेकांना दिलेली साथ आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी दाखवलेले सहकार्य मनाला समाधान देणारे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी समाजातील सर्व घटकांनी दाखवलेली ही एकजूट आमचा लढा अधिक बळकट करणारी आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. प्रशासन आणि कारखानदारांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास चर्चेतून मार्ग काढण्यास आम्ही तयार आहोत.
Ans: ऊसाला प्रतिटन 4 हजार 500 रुपये दर मिळावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे.
Ans: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्यातील किणी आणि सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे चक्काजाम आंदोलन सुरू आहे.
Ans: माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी नागठाणे येथील आंदोलनस्थळी भेट दिली.