Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंजवडी ते शिवाजीनगर ‘मेट्रो लाईन 3’ला मिळाला अखेर मुहूर्त? 3 नोव्हेंबरला मेट्रो धावणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार असून, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 27, 2026 | 01:30 PM
हिंजवडी ते शिवाजीनगर 'मेट्रो लाईन 3'ला मिळाला अखेर मुहूर्त? 3 नोव्हेंबरला मेट्रो धावणार

हिंजवडी ते शिवाजीनगर 'मेट्रो लाईन 3'ला मिळाला अखेर मुहूर्त? 3 नोव्हेंबरला मेट्रो धावणार

Follow Us
Follow Us:
  • हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गिका ३ प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता.
  • गेल्या शंभरहून अधिक दिवसांपासून या मार्गावर ट्रायल रन सुरू आहेत.
  • आतापर्यंत चाचण्या होत असल्या तरी प्रवासी सेवा सुरू झालेली नाही.
पिंपरी : गेल्या शंभरहून अधिक दिवसांपासून केवळ रिकाम्या चाचण्या (ट्रायल रन) घेत हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावणाऱ्या ‘मेट्रो लाईन ३’ ला अखेर प्रवाशांची साथ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा लांबणीवर पडल्यामुळे मेट्रोचे उद्घाटन रखडणार अशी चर्चा असतानाच, आता ३ नोव्हेंबर रोजी या बहुप्रतिक्षित मेट्रोचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवणार असून, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. याच कार्यक्रमात महा मेट्रोच्या उर्वरित/विस्तारित टप्प्यांचाही लोकार्पण वा भूमिपूजनाचा कार्यक्रम समाविष्ट करून पुणेकरांना एकाच वेळी दुहेरी मेट्रो भेट देण्याचे नियोजन प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर सुरू आहे.

शंभर दिवसांची प्रतीक्षा संपली

हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटर मार्गावरील १७ स्थानकांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (सीएमआरएस) सुरक्षा तपासणी पूर्ण होऊन रीतसर परवानगी मिळाली होती. मात्र, औपचारिक उद्घाटनाच्या मुहूर्ताअभावी ही मेट्रो तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ प्रवाशांविनाच ट्रॅकवर रिकामी धावत होती. ३ नोव्हेंबर रोजी बालेवाडी स्टेडियम येथे भव्य शासकीय कार्यक्रमाची रूपरेषा आखली जात आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ऑनलाइन उपस्थितीसाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.

FAQ

1. हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होण्याची शक्यता आहे?
हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचे ३ नोव्हेंबर रोजी लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे.

2. मेट्रो कोणत्या मार्गावर धावणार आहे?
मेट्रो लाईन ३ ही हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावणार आहे.

3. या मार्गावर चाचण्या सुरू आहेत का?
होय. गेल्या शंभरहून अधिक दिवसांपासून या मार्गावर मेट्रोच्या ट्रायल रन सुरू आहेत.

Hinjawadi Shivajinagar Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो उद्घाटनाशिवाय तातडीने सुरू करा; आदित्य ठाकरेंचा सल्ला

Web Title: Metro line 3 from hinjawadi to shivajinagar will run soon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

सांडपाण्याने बदलली मुळा-मुठेची सूक्ष्मजीवसृष्टी; पावसाळ्यातील प्रवाहानंतरही अस्तित्व पूर्ववत होईना
1

सांडपाण्याने बदलली मुळा-मुठेची सूक्ष्मजीवसृष्टी; पावसाळ्यातील प्रवाहानंतरही अस्तित्व पूर्ववत होईना

Pune MLC Election Result: ७ ते ८ मतपेट्यांचे सील तुटले; पुणे पदवीधर मतमोजणी केंद्रावर हर्षदा देशमुख आक्रमक
2

Pune MLC Election Result: ७ ते ८ मतपेट्यांचे सील तुटले; पुणे पदवीधर मतमोजणी केंद्रावर हर्षदा देशमुख आक्रमक

पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीच्या बैठकीची प्रतीक्षा; शेतकरी, नागरिकांचे लक्ष
3

पुणे जिल्ह्याच्या कालवा समितीच्या बैठकीची प्रतीक्षा; शेतकरी, नागरिकांचे लक्ष

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…
4

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.