Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेट्रोचे काम २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान ; प्रकल्पाचे सुमारे ४५ टक्के काम पूर्ण , ८० टक्के खांबाची उभारणीही पूर्ण

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो मार्ग ३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्याच्या कार्यान्वयासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे.

  • By Aparna
Updated On: Sep 22, 2023 | 04:35 PM
Shocking! Metro materials worth 31 lakhs were stolen within a month; Complaint from Pune Metro officials to police Pune

Shocking! Metro materials worth 31 lakhs were stolen within a month; Complaint from Pune Metro officials to police Pune

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : हिंजवडीतील माहिती-तंत्रज्ञान (आयटी) केंद्राला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणेरी मेट्रो प्रकल्पाच्या कामाने वेग पकडला आहे. मागील १४ महिन्यांत या प्रकल्पाचे सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उरलेले काम मार्च २०२५ पर्यंत १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान आहे. या मार्गिकेसाठीच्या चार हजार सेगमेंटची उभारणी पूर्ण करण्यात आली असून, ८० टक्के खांबाची उभारणीही पूर्ण झाली आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो मार्ग ३ चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्याच्या कार्यान्वयासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाला पुणेरी मेट्रो असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठीचे भूसंपादन पूर्ण झाले असून, मेट्रो मार्ग उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत मार्च २०२५ आहे. त्यामुळे आगामी काळात मेट्रो मार्गांची उभारणी, गणेश खिंड रस्त्यावरील दुमजली उड्डाणपूल आणि मेट्रो स्थानकांचे काम करण्याचे आव्हान आहे.

आतापर्यंत या मेट्रो मार्गाच्या ८० टक्के खांबाची उभारणी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर या मार्गाच्या चार हजार सेगमेंटची उभारणी बुधवारी पूर्ण झाली. विशेष बाब म्हणजे, तीन हजार सेगमेंटच्या उभारणीनंतर केवळ ६९ दिवसांत आणखी एक हजार सेगमेंटची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी २३ जुलैला या प्रकल्पाचा पहिला सेगमेंट हिंजवडी येथे कास्ट करण्यात आला. त्यानंतर पुढील १४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल चार हजार सेगमेंट उभे करण्यात आले आहेत.

[blockquote content=” हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या चार हजार सेगमेंटची उभारणी ४०० दिवसांत (१४ महिने) झाली आहे. तसेच काम सुरू झाल्यापासून वर्षभरातच एकूण खांब उभारणीपैकी ८० टक्के खांब उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. ” pic=”” name=” -आलोक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड”]

पुणेरी मेट्रोची सेगमेंट उभारणी

सेगमेंटची संख्या – कास्टिंगला लागलेला कालावधी
० ते १००० – २८५ दिवस
१००१ ते २००० – ९० दिवस
२००१ ते ३००० – ७९ दिवस
३००१ ते ४००० – ६९ दिवस

Web Title: Metro work to be completed by 2025 about 45 per cent of the project work has been completed 80 per cent of the pillars have also been constructed nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2023 | 04:35 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharastra
  • Pune
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.