Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांसाठी खुशखबर! समूह पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आपली हक्काची घरं

म्हाडा मुंबईकडून एक महत्वाची माहिती मिळाली आहे. आता समूह पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मुंबईत घरं उपलब्ध होणार अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 08, 2024 | 09:20 PM
म्हाडाच्या तब्बल 2147 घरांसाठी लॉटरचा मुहूर्त ठरला; 5 फेब्रुवारीला काढली जाणार लॉटरी

म्हाडाच्या तब्बल 2147 घरांसाठी लॉटरचा मुहूर्त ठरला; 5 फेब्रुवारीला काढली जाणार लॉटरी

Follow Us
Close
Follow Us:

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 2030 सदनिकांकरीता सुमारे एक लाख तेरा हजार अर्जदारांचा लाभलेला प्रतिसादावरून मुंबईतील परवडणार्‍या दरातील घरांची वाढती मागणी अधोरेखित होत आहे. या मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुंबईचे सीमित भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता घरांच्या तुटवडयाचा प्रश्न पुनर्विकासाच्या माध्यमातून सोडविता यावा यादृष्टीने राज्य शासनातर्फे पुनर्वसन नियमावली अधिकाधिक सुलभ करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.

समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहसाठा निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर शहरातील पायाभूत सुविधांचे नियोजन देखील सुलभरित्या करता येणार आहे म्हणूनच त्यांत दाटीवाटीने वसलेल्या दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा समूह पुनर्वसन प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प व काळाचौकी अभ्युदयनगर वसाहत, जोगेश्वरी येथील पीएमजी प्रकल्पातील इमारतींचा पुनर्विकास तसेच म्हाडा अभिन्यासातील जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासातून मुंबई शहराला मोठ्या प्रमाणात अतिरिक्त गृहसाठा नजीकच्या भविष्यात निर्माण होणार आहे. याद्वारे सर्वसामान्यांसाठी मुंबईत हक्काची घरे उपलब्ध होणार असून सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.

हे देखील वाचा: वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यभर राबविले जाणार विविध उपक्रम, तुम्हीही होऊ शकता या उपक्रमात सहभागी

नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली.

म्हाडाच्या या सोडतीमुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना घर मिळणार आहे. म्हाडाने मुंबईतील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

हे देखील वाचा: सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांवर अन्याय, महाविकास आघाडीच्यावतीने पीक विमा रक्कम मिळण्यासाठी धरणे आंदोलन

याप्रसंगी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर- सिंह यांनी म्हाडाच्या नूतन संगणकीय सोडत प्रणालीचे कौतुक करताना सांगितले की, संगणकीय सोडत प्रणाली पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहित करणे हे मोठे आव्हान आहे मात्र हे म्हाडाने शक्य केले आहे. या पारदर्शक सोडतीवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपली पसंती आणि विश्वास नोंदविला आहे. म्हाडाच्या सोडतीतील निर्णयावर आजवर नागरिकांनी देखील सहमती दर्शविली आहे म्हणूनच म्हाडा आणि विश्वास हे समीकरण सक्षमतेने मांडले जात आहे, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Mhada homes are available to common people through group redevelopment projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 09:20 PM

Topics:  

  • maharashtra news
  • MHADA Homes

संबंधित बातम्या

कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा
1

कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये युतीची प्रचारात आघाडी, सरस्वती काथारांसह इतर उमेदवारांना वाढता पाठिंबा

‘त्यांनी मला शिवी नाही दिली तर मुंबईच्या…’, उद्धव ठाकरेंवर अमित साटम यांचा हल्लाबोल
2

‘त्यांनी मला शिवी नाही दिली तर मुंबईच्या…’, उद्धव ठाकरेंवर अमित साटम यांचा हल्लाबोल

Maharashtra Politics : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा
3

Maharashtra Politics : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.