Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHADA Redevelopment : म्हाडाच्या प्रश्नांवर सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; बीडीडी चाळीसह विविध प्रलंबित विषयांवर चर्चा

MHADA Redevelopment : म्हाडाशी संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्वसन आणि पुनर्विकासाच्या प्रश्नांवर विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बीडीडी चाळीसह विविध प्रकल्पांतील नागरिकांच्या मागण्यांवर चर्चा झाली.

  • By विवेक
Updated On: Sep 03, 2026 | 09:05 PM
म्हाडाच्या प्रश्नांवर सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

म्हाडाच्या प्रश्नांवर सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Follow Us
Follow Us:
  • सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली म्हाडाच्या प्रश्नांवर बैठक
  • बीडीडी चाळ पुनर्विकासातील घरवाटप आणि पर्यायी निवासावर चर्चा
  • मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याचे निर्देश
 

MHADA Redevelopment : म्हाडा प्राधिकरणाशी संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्वसन आणि पुनर्विकासाच्या प्रलंबित प्रश्नांवर विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे बैठक झाली. मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्थांच्या समस्या आणि नागरिकांच्या मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याचे निर्देश सचिन अहिर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बीडीडी चाळ पुनर्विकासातील प्रश्नांवर चर्चा

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील लॉटरीद्वारे होणाऱ्या घरवाटपातील अडचणी, वरळी बीडीडी चाळीतील कुटुंबांना पर्यायी निवास आणि संक्रमण शिबिरातील नागरिकांच्या विविध मागण्या बैठकीत मांडण्यात आल्या.

लोअर परळ येथील सरस्वती बिल्डिंगमधील दहा रहिवाशांना पर्यायी सदनिका देण्याचा प्रश्नही चर्चेत आला. याशिवाय ना. म. जोशी मार्गावरील ३६५ आणि शिवशक्ती पार्क येथील तानवडे यांच्यासह अन्य ३० रहिवाशांनी केलेल्या निवेदनांवरही चर्चा करण्यात आली.

मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार- केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 

मुंबईतील विविध सोसायट्यांचे प्रश्न ऐरणीवर

भायखळा येथील गीतांजली बिल्डिंगचा पाच म्हाडा इमारतींच्या क्लस्टरमध्ये समावेश करण्याच्या मागणीवरही बैठकीत चर्चा झाली. एसव्हीपी नगर सोसायटीतील एचआयजी आणि एलआयजी पुनर्वसनाचा मुद्दा तसेच टागोर नगरमधील घरकुल सोसायटीतील कुटुंबांना कायमस्वरूपी मालकी हक्क देण्याचा प्रश्नही मांडण्यात आला. अभ्युदयनगरमधील इमारतींचा पुनर्विकास, रुस्तम ताडीवाला चाळ आणि शाहसदन सोसायटीशी संबंधित निवेदनांवरही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

मुंबईतील जुन्या आणि पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक इमारती तसेच गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकरणातील अडचणी समजून घेऊन कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता

बैठकीस म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह म्हाडाचे संबंधित अधिकारी आणि विविध गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Mhada redevelopment meeting sachin ahir bdd chawl mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • MHADA Homes
  • Mumbai News
  • Sachin Ahir

संबंधित बातम्या

बेटिंग ॲपद्वारे तब्बल तीन हजार कोटींचा घोटाळा? मुंबईसह चार राज्यांत ईडीची छापेमारी
1

बेटिंग ॲपद्वारे तब्बल तीन हजार कोटींचा घोटाळा? मुंबईसह चार राज्यांत ईडीची छापेमारी

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
2

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा
3

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका
4

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.