
Jalgaon News: गोविंदा आला रे…! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Jalgaon Dahi Handi 2026: जळगावकरांसाठी शनिवारचा दिवस एकदम खास असणार आहे. नेहमी मुलं दहीहंडी फोडतात हे आपण बघतो, पण यावेळी जळगावात मुलींचा थरार बघायला मिळणार आहे. धाडस, ताकद आणि संस्कृतीचा संगम असलेला एक भारी सोहळा होणार आहे.भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशनने मिळून ‘युवतींची दहीहंडी २०२६’ हा मोठा कार्यक्रम ठेवला आहे. हा कार्यक्रम शनिवारी, ५ सप्टेंबरला संध्याकाळी ६ ते रात्री ९.३० पर्यंत शिवतीर्थ मैदान म्हणजे जी.एस. ग्राउंडवर होईल. Jalgaon News:
या सोहळ्यासाठी तब्बल १५ महिला गोविंदा पथकं तयार झाली असून यामध्ये एकूण ६८५ युवती सहभागी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणी कसून सराव करत असून मानवी मनोरे कसे बनवायचे, वर कसे जायचे याची प्रॅक्टिस जोरात चालू आहे. त्यांचा हा थरार बघण्यासाठी जळगावकर खूप उत्सुक आहेत. परंतू आयोजकांनी सुरक्षेची पूणपणे काळजी घेतली आहे. प्रत्येक तरुणीचा 10 लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे, म्हणजेच कोणत्याही व्यक्तींला लागलं तरी त्याचा मोफत उपचार केला जाईल.
हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी बिना तिकीट खुला आहे. या गोविंदामध्ये किड्स गुरुकुल इंटरनॅशनल, अनुभूती स्कूल, आर. आर. इंग्लिश मीडियम स्कूल, उडान फाउंडेशन, केसीई मुलींचे वसतिगृह, अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, एल. एच. पाटील पब्लिक स्कूल आणि हरिजन कन्या छात्रालय अशा शाळा-कॉलेजच्या १५ टीम येणार आहेत. या सगळ्या मुली मिळून शिवतीर्थ मैदानावर आपलं साहस दाखवणार आहेत.
आयोजकांनी एक खूप चांगली गोष्ट केली आहे. ही स्पर्धा असून त्याला उत्सव म्हणून पाहिलं तर वेगळा आनंद निर्माण होईल. तसेच या मैदानावर एक नाहीतर, एकूण 15 दहीहंड्या लावल्या जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला एक हंडी फोडण्याची संधी मिळणार आहे. आपल्यामधले कौशल्य दाखवण्याचा या स्पर्धामागचा उद्देश आहे.
मुलांप्रमाणेच मुलीसुद्धा धाडसी खेळ खेळू शकतात, त्यांना सुद्धा समान संधी मिळाली पाहिजे या संदेश देण्याचा आयोजकांचा उद्देश आहे. पहिल्या नंबरच्या टीमला ३१,१११ रुपये, दुसऱ्या नंबरला २१,१११ रुपये आणि तिसऱ्या नंबरला ११,१११ रुपये अशी एकूण ६३,३३३ रुपयांची रोख बक्षिसं दिली जाणार आहेत.