Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महाराष्ट्रात युवक-युवतींसाठी…”; मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी दिली माहिती

मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचीही भेट त्यांनी घेतली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 16, 2026 | 07:58 PM
“महाराष्ट्रात युवक-युवतींसाठी…”; मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी दिली माहिती
Follow Us
Follow Us:

कौशल्य विकास केंद्रांची एक हजार पर्यंत वाढवली जाणार
महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा
झोपडपट्टी परिसरातही ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार

मुंबई: कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र प्रथम टप्प्यात शंभर केंद्र सुरू करण्यात येणार आहेत आगामी काळात राज्यात या कौशल्य विकास केंद्रांची एक हजार पर्यंत ही संख्या वाढविणार आहोत.ही योजना मुंबई महापालिका क्षेत्रात ही मुंबई शहर व उपनगर मध्ये राबविण्यात येणार आहे.महानगरपालिकेमार्फत या कौशल्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आली आहे अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेत आयोजित पत्रकारांशी संवाद साधताना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांचीही भेट त्यांनी घेतली. या भेटीदरम्यान मुंबईच्या विविध समस्यांसह तरुणांच्या रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणे या योजनेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणासोबत कौशल्याची सांगड घालण्यात येणार आहे.

झोपडपट्टी परिसरातही ही प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आवश्यक असलेले कौशल्य शिकविण्यात येतील. पदवी सोबत कौशल्य अवगत असेल तरच रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतील.

आज मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे जी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या भेटीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. प्रामुख्याने तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महानगरपालिकेच्या सहकार्याने उपनगरातील दुर्गम व झोपडपट्टी… pic.twitter.com/coi0hVqjJp — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) April 16, 2026

हँगिंग गार्डन (फिरोजशहा मेहता गार्डन) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रॅम्प तयार करणे, सायन येथील ‘अम्मान देखनी’ संस्थेजवळील डीपी रोडवर झालेले अतिक्रमण हटवून तो रस्ता रहिवाशांसाठी मोकळा करावा, याबाबत मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.मुंबईतील पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून काम करतील, असा विश्वास यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

‘इंडिया स्किल स्पर्धेतील विजेत्यांना…’; Mangal Prabhat Lodha यांची घोषणा

Mangal Prabhat Lodha यांची घोषणा

इंडिया स्किल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना १ लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे विशेष पुरस्कार कौशल्य विकास विभागामार्फत देण्याची घोषणा कौशल्य,रोजगार,उद्योजकता व विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कौशल्य मंत्री लोढा यांच्याहस्ते कौशल्य विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. यावेळी कौशल्यमंत्री लोढा यांनी राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि ‘कौशल्याचार्य’ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिल्पनिदेशकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

Web Title: Minister mangal prbhat lodha said mahatma jyotirao phule skill training center to be launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • Skill Department

संबंधित बातम्या

Mumbai News: आगीचा धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेचा कायापालट! रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल
1

Mumbai News: आगीचा धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेचा कायापालट! रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
3

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना
4

लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.