Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना…”; मंत्री पंकजा मुंडेंची माहिती

राज्यातील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नियमित पाहणी करण्यात येत असून, पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई केली जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2026 | 09:31 PM
"पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना..."; मंत्री पंकजा मुंडेंची माहिती

"पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना..."; मंत्री पंकजा मुंडेंची माहिती

Follow Us
Follow Us:

पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटिस
सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला प्रश्न 
आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई

मुंबई: चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या औद्योगिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर विविध उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रदूषण कमी करण्यासाठी तांत्रिक सुधारणा, धूळ नियंत्रण, स्वच्छता उपाययोजना आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यावर शासनाचा भर आहे. चंद्रपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी स्वतः भेट देणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत नियमित पाहणी करण्यात येत असून, पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर नियमांनुसार कडक कारवाई केली जाते.

“पर्यावरण संवर्धन हे…” ; Mumbai Climate Week दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंचे भाष्य

मंडळाकडून उद्योगांची वेळोवेळी तपासणी करून पर्यावरणीय नियमांचे पालन होत आहे की नाही, याची पडताळणी केली जाते. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. तसेच आवश्यकतेनुसार अंतरिम निर्देश व प्रस्तावित निर्देश जारी करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री पंकजा मुंडेंचे भाष्य

राज्य शासन स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंबई क्लायमेट वीकदरम्यान आयोजित अर्थशॉट प्राईज उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी अर्थशॉट प्राइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन नॉफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते.

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

जगप्रसिद्ध ‘द अर्थशॉट प्राइज’ या जागतिक पर्यावरणीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नोव्हेंबर 2026 मध्ये मुंबईत होणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली. भारतात प्रथमच अर्थ शॉट प्राईज उपक्रम होत असल्याचा आनंद व्यक्त करत पर्यावरण मंत्री मुंडे यांनी या आयोजनासाठी सर्व सहभागी व आयोजकांचे आभार मानले. मंत्री मुंडे म्हणाल्या, अर्थशॉट उपक्रमाने स्वच्छ हवा, कचरामुक्त जग, निसर्ग संवर्धन, सागरी परिसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि हवामान सुधारणा या पाच महत्त्वाच्या उद्दिष्टांना प्राधान्य दिले आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि स्वच्छ माती या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास पर्यावरणाचे नैसर्गिक संरक्षण होते.

Web Title: Minister pankja munde said notices sent to industries violating environmental regulations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • environment
  • MIDC
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
1

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

‘भूसंपादन गतिमान करा, उद्योगांना वेळेत जमिनी द्या!’, मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘वर्षा’ निवासस्थानावरील आढावा बैठकीत निर्देश
2

‘भूसंपादन गतिमान करा, उद्योगांना वेळेत जमिनी द्या!’, मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘वर्षा’ निवासस्थानावरील आढावा बैठकीत निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.