• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Minister Pankja Munde Statement About Enviornment Economy In Mumbai Climate Week Marathi News

“पर्यावरण संवर्धन हे…” ; Mumbai Climate Week दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंचे भाष्य

पर्यावरण संवर्धनाची संकल्पना स्थानिक पातळीवर रुजून ती जागतिक चळवळ बनावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करण्यावर भर दिला.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 18, 2026 | 02:19 PM
“पर्यावरण संवर्धन हे…” ; Mumbai Climate Week दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंचे भाष्य

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (फोटो- ट्विटर)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

स्वच्छ हवा, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थेला राज्य शासनाचे प्राधान्य 
मुंबई क्लायमेट वीक परिषदेत पंकजा मुंडे यांचे भाष्य 
भारतात प्रथमच अर्थ शॉट प्राईज उपक्रम

मुंबई: राज्य शासन स्वच्छ हवा, स्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. मुंबई क्लायमेट वीकदरम्यान आयोजित अर्थशॉट प्राईज उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी अर्थशॉट प्राइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन नॉफ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते.

जगप्रसिद्ध ‘द अर्थशॉट प्राइज’ या जागतिक पर्यावरणीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नोव्हेंबर 2026 मध्ये मुंबईत होणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली. भारतात प्रथमच अर्थ शॉट प्राईज उपक्रम होत असल्याचा आनंद व्यक्त करत पर्यावरण मंत्री मुंडे यांनी या आयोजनासाठी सर्व सहभागी व आयोजकांचे आभार मानले.

मंत्री मुंडे म्हणाल्या, अर्थशॉट उपक्रमाने स्वच्छ हवा, कचरामुक्त जग, निसर्ग संवर्धन, सागरी परिसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि हवामान सुधारणा या पाच महत्त्वाच्या उद्दिष्टांना प्राधान्य दिले आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि स्वच्छ माती या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास पर्यावरणाचे नैसर्गिक संरक्षण होते.

At the ongoing Climate Week 2026 in Mumbai, the Environment and Climate Change Department of the Government of Maharashtra has taken a historic step.
– Significant MoUs have been signed to combat climate change and promote the circular economy.
▪︎ Maha-rPET initiative: India’s… pic.twitter.com/2SyPSLpQuG
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 17, 2026

विकासासोबत जबाबदारीही येते, हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून मंत्री मुंडे म्हणाल्या की, औद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा गांभीर्याने विचार करूनच पुढील वाटचाल करावी लागेल. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर सुरू होणाऱ्या कृतींचा जागतिक पातळीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरण संवर्धन हे आर्थिक विकासाला चालना देणारे आहे, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक पद्धती, चक्रीय अर्थव्यवस्था आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती यांवर भर दिला जात असून स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी सक्रिय आहेत. यामुळे ऊर्जा स्वावलंबन साध्य होण्यास मदत होईल, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

निसर्ग, वनसंपदा आणि जैवविविधतेचे संरक्षण हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्राची विस्तीर्ण किनारपट्टी लक्षात घेता सागरी किनारी पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जात असून नैसर्गिक उपाययोजनांद्वारे हवामान बदलाला सामोरे जाण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

पर्यावरण संवर्धनाची संकल्पना स्थानिक पातळीवर रुजून ती जागतिक चळवळ बनावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करण्यावर भर दिला. या उपक्रमातून विश्वासार्ह आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य उपायांना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

जेसन नॉफ म्हणाले की, ज्याप्रमाणे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याचे धाडसी ध्येय गाठले, तसेच पृथ्वी वाचवण्यासाठी आता मोठ्या आणि आहे. भारताने या उपक्रमात सर्वाधिक विजेते देऊन आपले जागतिक नेतृत्व सिद्ध केले असल्याचे जेसन नॉफ यांनी सांगितले. यावेळी या स्पर्धेतील अंतिम स्पर्धकाची मुलाखत घेण्यात आली.

Web Title: Minister pankja munde statement about enviornment economy in mumbai climate week marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • environment
  • Mumbai
  • Pankaja Munde

संबंधित बातम्या

Mumbai Climate Week 2026 मध्ये महत्त्वाचे सामंजस्य करार; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची खास उपस्थिती
1

Mumbai Climate Week 2026 मध्ये महत्त्वाचे सामंजस्य करार; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची खास उपस्थिती

Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?
2

Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया
3

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
4

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लग्नातील हळदी समारंभासाठी पिवळ्या साडीवर करा स्पेशल आणि हटके लुक, नवरीच्या सौंदर्यात पडेल भर

लग्नातील हळदी समारंभासाठी पिवळ्या साडीवर करा स्पेशल आणि हटके लुक, नवरीच्या सौंदर्यात पडेल भर

Feb 18, 2026 | 03:45 PM
अरेरे पाकवर काय ही वेळ! ‘आम्ही भांडीही धुतली…’ कर्णधाराने हॉटेलमध्ये मिळालेल्या वागणुकीची कहाणी उलगडली 

अरेरे पाकवर काय ही वेळ! ‘आम्ही भांडीही धुतली…’ कर्णधाराने हॉटेलमध्ये मिळालेल्या वागणुकीची कहाणी उलगडली 

Feb 18, 2026 | 03:43 PM
Guru Margi: गुरुच्या कृपेने 11 मार्चपासून या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Guru Margi: गुरुच्या कृपेने 11 मार्चपासून या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Feb 18, 2026 | 03:40 PM
मोमो लव्हर्ससाठी खास, यंदा घरी बनवा ज्यूसी, हेल्दी आणि टेस्टी ‘दुधीचे मोमोज’, एकदा तर खातच रहाल

मोमो लव्हर्ससाठी खास, यंदा घरी बनवा ज्यूसी, हेल्दी आणि टेस्टी ‘दुधीचे मोमोज’, एकदा तर खातच रहाल

Feb 18, 2026 | 03:40 PM
Muslim reservation Cancellation: गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित…; मुस्लिम आरक्षण रद्द होताच इम्तियाज जलील स्पष्टच बोलले

Muslim reservation Cancellation: गरीब मुस्लिम शिक्षणापासून वंचित…; मुस्लिम आरक्षण रद्द होताच इम्तियाज जलील स्पष्टच बोलले

Feb 18, 2026 | 03:36 PM
Gram Panchayat Election: लांजा तालुक्यात रंगणार ग्रामपंचायत पोटनिवडणूक

Gram Panchayat Election: लांजा तालुक्यात रंगणार ग्रामपंचायत पोटनिवडणूक

Feb 18, 2026 | 03:35 PM
धक्कादायक! कन्नड अभिनेत्रीचा स्टेडियमच्या वॉशरूममध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघड

धक्कादायक! कन्नड अभिनेत्रीचा स्टेडियमच्या वॉशरूममध्ये शूट केला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघड

Feb 18, 2026 | 03:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.