Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Vans : विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी, प्रताप सरनाईक यांची माहिती

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आता सुरक्षित वाहतुकीसाठी रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 11, 2025 | 06:50 PM
विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी, प्रताप सरनाईक यांची माहिती (फोटो सौजन्य-X)

विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी, प्रताप सरनाईक यांची माहिती (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी अनाधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. या बाबतची अधिसूचना निर्गमित होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्यावतीने ‘हर घर तिरंगा ; हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात, स्वातंत्र्यदिनासोबत स्वच्छतेचाही एल्गार

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्रथम प्राधान्य आहे. सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्कूल व्हॅनला मंजुरी देण्यात येत आहे. नव्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना राज्य शासनाकडून परवाने देण्यात येतील. राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन धावती करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

परिवहन विभागाने बोलावलेल्या पालक आणि बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्ययावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय (स्कूल) व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. सदर वाहने BS-VI या श्रेणीतील असणार आहेत. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

राज्य‍ शासनाकडून परिवहन विभागामार्फत सन २०१८ पर्यंत स्कूल व्हॅनसाठी परवाने देण्यात येत होते. मात्र स्कूल व्हॅन विद्यार्थी वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्र सरकारच्या मानकानुसार राज्य शासनाने नियमावली तयार करून व्हॅन सुरू करण्याबाबतची सूचनावली प्रसिद्ध केली आहे. त्याआधारे राज्य शासनाने हे धोरणात्मक पाऊल टाकले असून या संदर्भात अधिसूचना निर्गमित होईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतुकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे. व्हॅनचे दरवाजे बंद असतात. चार चाके असल्याने वाहन उलटण्याची शक्यता नगण्य असते. व्हॅनमध्ये शाळेची बॅग, पाण्याची बाटली आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा असते.

स्कूल व्हॅनमधील वैशिष्ट्ये

– जीपीएस

– सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन

– अग्निशमन अलार्म प्रणाली

– दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा

– ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर

– पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे

– स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी

– गाडीच्या छतावर शाळेचे नाव

Pune News: कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत; अजित पवारांची घोषणा

Web Title: Minister pratap sarnaik informed that state government approval for student school vans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • education
  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Local Body Election : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ३५ जागांवरील निवडणूक रद्द, नेमकं कारण काय?
1

Local Body Election : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ३५ जागांवरील निवडणूक रद्द, नेमकं कारण काय?

ST Bus: शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू, प्रताप सरनाईक यांची माहिती
2

ST Bus: शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू, प्रताप सरनाईक यांची माहिती

Mumbai News : मुंबईत ९० हजार भटके श्वान, शल्टर मात्र केवळ आठ; निवासस्थानांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव
3

Mumbai News : मुंबईत ९० हजार भटके श्वान, शल्टर मात्र केवळ आठ; निवासस्थानांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव

Sambhajinagar : धक्कादायक! जेवणात आढळली पाल, समाज कल्याणच्या वसतिगृहातील 28 विद्यार्थ्यांना विषबाधा
4

Sambhajinagar : धक्कादायक! जेवणात आढळली पाल, समाज कल्याणच्या वसतिगृहातील 28 विद्यार्थ्यांना विषबाधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.