Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यासोबतच पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 01, 2026 | 02:32 PM
शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळात बळीराजाला मोठा दिलासा!
  • शेती कर्जवसुलीला स्थगिती
  • पीक कर्जाच्या पुनर्गठनाचेही आदेश
Maharashtra Drought 2026: राज्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक भागांत पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेती कर्जवसुलीला स्थगिती देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. यासोबत पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सरकारच्या निर्णयानुसार बँकांना पीक कर्जाच्या पुनर्गठनासंदर्भातील प्रक्रिया 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामात आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबतही बँकांना सूचना करण्यात आल्या आहेत.

305 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1’ उपाययोजना

अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या ट्रिगर-1 अंतर्गत उपाययोजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी 265 तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आणखी तालुक्यांचा समावेश करत दुष्काळी उपाययोजनांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

वर्ग ‘ब’ मधील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याचा मान बोरगाव पोलिस ठाण्यास; प्रशस्तीपत्रक देऊन आले गौरवण्यात

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर कर्जवसुलीसाठी दबाव आणला जाऊ नये, याबाबतही सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळाच्या काळात कर्जवसुलीसाठी बँक किंवा पतसंस्थेचा कर्मचारी शेतकऱ्यांच्या दारात जाता कामा नये, अशा सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनाही आवश्यक सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही दिलासा

दुष्काळाचा आर्थिक फटका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसू नये यासाठी सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दुष्काळग्रस्त कुटुंबांवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी करण्याचा यामागील उद्देश आहे.

रोजगारासाठी 6,728 कोटींची तरतूद

दुष्काळी भागातील शेतकरी आणि शेतमजुरांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार हमी योजना विभागाने 6 हजार 728 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून सिंचनाशी संबंधित कामे, गायगोठे, वैयक्तिक फळबाग लागवड, बोअरवेल पुनर्भरण, बांबू लागवड, प्रधानमंत्री आवास योजनेतील कामे, रेशीम उद्योगासाठी शेड, कंपोस्ट खड्डे आणि सार्वजनिक तलावांच्या दुरुस्तीसारखी विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. कर्जवसुलीला स्थगिती, पीक कर्जाचे पुनर्गठन, नवीन खरीप कर्जाची उपलब्धता आणि रोजगार हमीच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड

Web Title: Maharashtra drought farm loan recovery stayed crop loan restructuring fadnavis government sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmers
  • Loan
  • maharashtra

संबंधित बातम्या

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
1

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.