Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus : सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीची UPI ची मात्रा..! यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे परिवहन मंत्र्‍यांच्या सूचना

एसटी बसमधून प्रवास करताना अनेकदा सुट्टे पैशांवरून प्रवासी आणि वाहकामध्ये वाद होतात. परंतु, आता एसटी महामंडळाने ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 31, 2025 | 01:52 PM
यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे परिवहन मंत्र्यांच्या सूचना (फोटो सौजन्य-X)

यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे परिवहन मंत्र्यांच्या सूचना (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या (एसटी) बसमध्ये प्रवाशांना तिकिटाची रक्कम ऑनलाइन देता येणार आहे. महामंडळाने प्रवाशांना ‘क्यूआर कोड’च्या मदतीने तिकिटाचे पैसे देण्याची सोय केली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार असून, त्याचा फायदा प्रवाशांबरोबरच महामंडळालाही होणार आहे.

प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन केलेल्या सूचनेनुसार सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांच्या मध्ये वाद होऊ नये यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंट द्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढली आहे. याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याची निर्देश स्थानीक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात.

दिलासादायक ! घरगुती वीज आता एक रुपयाने होणार स्वस्त; सौरऊर्जेच्या वापरासाठी MERC ला प्रस्ताव

एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील. अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामंळाने युपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये युपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढणाऱ्यां प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये युपीआय पेमेंट द्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. तसेच एका परिपत्रकाद्वारे सूचना देऊन वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावेत, अशा सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासना दिल्या आहेत. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भभवणार नाहीत,याची काळजी महामंडळाने घ्यावी अशी सूचना देखील परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

तसेच ऑनलाइन तिकीट काढताना रक्कम वजा झाल्यास आणि तिकीट न मिळाल्यास प्रवाशांच्या मदतीसाठी महामंडळाकडून ‘४००’ या क्रमांकावर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. प्रवासी ८८००६८८००६ या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवू शकतात. याशिवाय wecare@aritelbank.com येथे संपर्क साधूनही मदत मिळवता येणार आहे. हेल्पलाइनचे क्रमांक २४ तास उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

“मागील 53 दिवस मला टार्गेट केले जात आहे…”; अखेर मंत्री धनंजय मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद

Web Title: Minister pratap sarnaik took note and appealed to passengers to withdraw tickets using upi payment to avoid a dispute between carriers and passengers over holiday money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू
1

ST Bus Service: मुंबईकरांसाठी विमानतळ प्रवास आणखी सोपा! दादर ते NMIA थेट ST बससेवा सुरू

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा
2

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
3

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
4

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.