Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha reservation : मराठा आरक्षणाबाबत विखे पाटलांची मोठी माहिती; सातारा गॅझेटसंदर्भातही स्पष्टचं सांगितलं

एसईबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. हैदराबाद गॅझेट न्यायालयात टिकेल, अशी सक्षम कायदेशीर तयारी सरकारने केली आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 27, 2026 | 04:33 PM
मराठा आरक्षणाबाबत विखे पाटलांची मोठी माहिती; सातारा गॅझेटसंदर्भातही स्पष्टचं सांगितलं

मराठा आरक्षणाबाबत विखे पाटलांची मोठी माहिती; सातारा गॅझेटसंदर्भातही स्पष्टचं सांगितलं

Follow Us
Follow Us:

सांगली : आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने ठोस पावले उचलली असून, एसईबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. हैदराबाद गॅझेट न्यायालयात टिकेल, अशी सक्षम कायदेशीर तयारी सरकारने केली असून आता सातारा गॅझेटही न्यायालयीन कसोटीवर टिकेल, अशा दृष्टीने सर्व तयारी सुरू असल्याची माहिती राज्याचे मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे प्रस्तावित बॅरेजच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी हरिपूर-कोथळी पुलावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठा आरक्षण, मराठा समाजाच्या मागण्या आणि सरकारच्या भूमिकेबाबत त्यांनी सविस्तर भाष्य केले.

 

सकारात्मक निर्णयामुळे मराठा समाजात पूर्वीसारखा रोष नाही

मराठा संघटनांशी सरकार कोणतीही चर्चा करत नाही, असा विरोधकांकडून केला जाणारा आरोप फेटाळून लावत विखे पाटील म्हणाले, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. जे प्रतिनिधी चर्चा करण्यासाठी येतात, त्यांच्याशी सरकार सातत्याने संवाद साधत आहे. संवादाची दारे कधीही बंद केलेली नाहीत. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्याचा दावा करत ते म्हणाले, जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या जवळपास सर्वच महत्त्वाच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मराठा समाजामध्ये पूर्वीप्रमाणे असलेला रोष आता राहिलेला नाही. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम सुरू ठेवले आहे.

हे सुद्धा वाचा : ऊसतोड उचलीच्या पैशांवरुन अल्पवयीन मुलाचे अपहरण; धाराशिव तालुक्यातील घटनेनं खळबळ

मराठा आरक्षणाचा विषय कायदेशीरदृष्ट्या भक्कम करण्यावर सरकारचा भर

मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, एसईबीसी प्रश्न आम्ही सोडवला आहे. हैदराबाद गॅझेट न्यायालयात टिकेल, अशी भक्कम कायदेशीर बाजू उभी केली आहे. आता सातारा गॅझेटसंदर्भातही न्यायालयात टिकेल, अशी सर्व तयारी सुरू असून सरकार कोणतीही त्रुटी राहू देणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, आरक्षणाचा विषय केवळ राजकीय न ठेवता कायदेशीरदृष्ट्या भक्कम करण्यावर सरकारचा भर असल्याचेही विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; दारूड्याकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या

Web Title: Minister radhakrishna vikhe patil has responded regarding maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Maratha Arakshan
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना
2

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

Neela Vikhe Patil : विखे पाटलांची पुतणी स्विडनच्या संसदेत ! स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून करणार काम …
3

Neela Vikhe Patil : विखे पाटलांची पुतणी स्विडनच्या संसदेत ! स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून करणार काम …

सोनोरीत रस्त्याला २० लाख खर्च तरीही खड्डेच; बांधकाम अभियंत्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी
4

सोनोरीत रस्त्याला २० लाख खर्च तरीही खड्डेच; बांधकाम अभियंत्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.