संग्रहित फोटो
जळगाव : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला करून तिची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवार (दि. २६) सकाळी सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतवाडी तांडा येथे आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०) याने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली. पत्नी ललिता आत्माराम राठोड (वय ३६) यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आत्मारामने घरातील चाकूने तिच्या पोटावर वार केले. या हल्ल्यात ललिता राठोड गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : गोळीबार प्रकरण चांगलेच भोवले! अधिकाऱ्यांची बदली; पोलीस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय
भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा हादरला
या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. दारूच्या व्यसनातून निर्माण होणारे कौटुंबिक वाद आणि त्यातून हिंसक घडणाऱ्या घटनांमुळे समाजासमोर गंभीर प्रश्न उभे राहत असल्याची भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे.
संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
भक्त राहणाऱ्या पत्नीच्या खोलीवर मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पतीला पत्नी व तिच्या मित्राने मारहाण केली, त्यानंतर मित्राने चाकूने हल्ला करुन पतीला गंभीर जखमी केले आहे. ही घटना २४ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बजाजनगर परिसरात घडली आहे. मारहाण करणाऱ्या पत्नीसह चाकू हल्ला करणाऱ्या चेतन पोळ याच्याविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात किरण भगवान बागूल (३२, रा. बजाजनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पेंटिंगचे काम करतात. त्यांची पत्नी काजल या पाच महिन्यांपासून त्याच परिसरात त्या मुलांसह स्वतंत्र खोली घेऊन राहत आहेत.






