Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : मालमत्ता कर वाढीवरून शिवसेना आक्रमक; मनपा कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन

मीरा-भाईंदर शहरात 60 टक्के मालमत्ता कर वाढीच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 24, 2026 | 02:04 PM
Mira Bhayander : मालमत्ता कर वाढीवरून शिवसेना आक्रमक; मनपा कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन
Follow Us
Follow Us:

 

  • मालमत्ता कर वाढीवरून शिवसेना आक्रमक
  • मनपा कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन
भाईंदर/विजय काते : मीरा-भाईंदर शहरात 60 टक्के मालमत्ता कर वाढीच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 18 फेब्रुवारी  रोजी झालेल्या महासभेत विषयपत्रिकेत कर वाढीचा कोणताही मुद्दा नसताना सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी 60 टक्के मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव मांडून बहुमताच्या जोरावर तो मंजूर केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखालील भाजप गटाने 78नगरसेवकांच्या पाठिंब्याने हा प्रस्ताव मंजूर केल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक आर्थिक बोजा टाकण्यात आल्याची टीका होत आहे.  या निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ‘भीक मागो’ आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप केला.

Thane-Ghodbunder Road: ठाणेकरांच्या अडचणी वाढणार? ठाणे-घोडबंदर रोडचं रुंदीकरण कधी होणार?

“महापालिकेच्या आर्थिक अपयशाची किंमत सामान्य नागरिकांनी का मोजावी?

“महापालिकेच्या आर्थिक अपयशाची किंमत सामान्य नागरिकांनी का मोजावी? महापालिकेकडे निधी नसल्यास नागरिकांकडून जबरदस्तीने वसुली करण्याचा कोणताही अधिकार महापौरांना नाही,” अशी भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडली. प्रक्रियेवर प्रश्नचिन्हविरोधकांनी महासभेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विषयपत्रिकेत नसलेला मुद्दा अचानक मांडून मंजूर करण्यात आला का? संबंधित समित्यांची मंजुरी घेण्यात आली होती का? नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या का? अशा अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरणाची मागणी करण्यात येत आहे.

नागरिकांमध्ये संतापदरम्यान, 60 टक्के कर वाढीमुळे सर्वसामान्य गृहधारक, लघु व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण पडणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. आधीच वाढती महागाई, वीजदर, पाणीपट्टी आणि इतर खर्चामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.आंदोलन तीव्र करण्याचा इशाराशिवसेनेने इशारा दिला आहे की, कर वाढीचा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. शहरभर जनजागृती मोहीम, रास्ता रोको आणि अन्य लोकशाही मार्गांनी निषेध व्यक्त केला जाईल, असे संकेत देण्यात आले.दरम्यान, सत्ताधारी भाजपकडून या आरोपांवर अधिकृत भूमिका मांडली जाण्याची प्रतीक्षा आहे. या निर्णयावरून मीरा-भाईंदरमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माथेरानमधील रस्त्यासाठी आणलेले बांधकाम साहित्य जप्त, विरोधी पक्षाच्या मागणीला यश

Web Title: Mira bhayander shiv sena aggressive over property tax hike in front of the municipal corporation office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • muncipal corporation

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
1

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
2

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस
3

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

Mira-Bhayandar News: भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईने मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापले; सरनाईकांची प्रशासनाकडे मोठी मागणी
4

Mira-Bhayandar News: भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाईने मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापले; सरनाईकांची प्रशासनाकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.