कल्याण – अमजद खान : कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण पूर्वेत भाजप शिवसेना वादावर पडदा पडला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश आले आहे. भाजप आणि गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा असल्याचे कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांचा सह कल्याण भाजपा अध्यक्ष संजय मोरे, नितेश म्हात्रे, गुड्डू खान इतर पदाधिकारी उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदार संघ भाजपला मिळावा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती ती गैर नव्हती. मात्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराची घोषणा केली त्या भूमिकेचं स्वागत आहे.
गणपत गायकवाड यांनी भूमिका कार्यकर्त्याना कळवली आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे, राज्यात 45 पार करायचं आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना बहुमताने निवडून द्यायचे आहे, गणपत गायकवाड यांच्या भूमिकेचं सर्व कार्यकर्त्यांनी समर्थन केलं असल्याची माहिती कल्याण भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर टीका करणारे शिवसेना कार्यकर्ता दीपेश म्हात्रे यांना देखील सूर्यवंशी यांनी प्रेमाचा सल्ला देत कान उघडणी केली आहे. दीपेश म्हात्रे यांनी शिवसेनेबद्दल बोलावे भाजपा बद्दल बोलायची गरज नाही.