मुंबई: दोन दिवसांपूर्वी राज्यात मराठी भाषेचा विजयी मेळावा पार पडला. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान कोणत्याही स्थितीमध्ये महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा ठाकरे बंधू यांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केलेल्या एका विधानावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.
वरळी येथे झालेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. “सगळ्यांचे लक्ष आमच्या भाषणाकडे आहे. पण आमच्या भाषणांपेक्षा यांचे एकत्र दिसणे महत्वाचे आहे. आमच्यामध्ये जो काही आंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला,” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याचे बहुमत दिले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कोंग्रेस आणि कॉँग्रेसची अनैसर्गिक युती केली. उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलले याला काडीचे महत्व नाही, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंची भाजपवर खोचक टीका
उद्धव ठाकरे वरळीच्या विजयी मेळाव्यात बोलताना म्हणाले, “गद्दारी करून आमचे सरकार पाडले. तुमचे मालक तिकडे बसले आहेत. त्यांचे बुड चाटण्यासाठी तुम्ही हे सगळ करत आहात. ते म्हणतात म हा महापालिकेचा आहे. अरे म महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्रही काबीज करू.”
Uddhav Thackeray Vijayi Melava: “… नाहीतर पोरीलाच पळवून नेतील”; उद्धव ठाकरेंची भाजपवर खोचक टीका
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “आमच्यावर सक्ती केली तर अशी शक्ती दाखवू की पुन्हा तुम्ही डोके वर काढणार नाही. आज आपण एकत्र आलो. आता हे पुन्हा काड्या घालण्याचे काम करतील. कोणाच्याही लग्नात भाजपला बोलावू नका. श्रीखंड, बासुंदी पुरी खातील आणि नवरा-बायकोमध्ये भांडणे लावून दुसऱ्या लग्नात जातील. नाही तर पोरीलाच पळवून नेतील.
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं
आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आबहे. आपल्यातील भांडणे विसरून जे आमच्यासाठी एकत्र आले त्यांचेही अभिनंदन. आमच्यातीलं आंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला. एकत्र आलोय आहोत. आम्ही दोघ एकत्र आलो आहोत पण त्यासठी कोण लिंबू कापतंय उतारा टाकत आहे. कोणी टाचण्या मारतयं कोणी रेडे कापत असतील त्यांना एकच सांगण आहे या अंधश्रद्धेच्या विरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता.