Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ‘मनरेगा’ योजना आता शहरातही लागू होणार? आमदार मनोज घोरपडे यांच्या मागणीवर मंत्री गोगावले यांचे मोठे संकेत

कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी रोजगार हमी योजना नगरपालिका आणि निमशहरी भागातही राबवण्याची आग्रही मागणी केली आहे. रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 10, 2026 | 03:15 PM
आमदार मनोज घोरपडे यांच्या मागणीवर मंत्री गोगावले यांचे मोठे संकेत

आमदार मनोज घोरपडे यांच्या मागणीवर मंत्री गोगावले यांचे मोठे संकेत

Follow Us
Follow Us:
  • मोठी बातमी!
  • ‘मनरेगा’ योजना आता शहरातही लागू होणार?
  • आमदार मनोज घोरपडे यांच्या मागणीवर मंत्री गोगावले यांचे मोठे संकेत!
कराड/प्रतिनिधी: ग्रामीण भागापुरती मर्यादित असलेली रोजगार हमी योजना आता नगरपालिका आणि निमशहरी भागातही राबविण्यात यावी, अशी ठोस मागणी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरी भागातील बेरोजगार आणि स्थलांतरित मजुरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रोजगार हमी, विकसित भारत रोजगार व आजीविका मिशन’ या राज्यस्तरीय कार्यशाळेत आमदार घोरपडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. या कार्यशाळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, केंद्रीय ग्रामीण विकास विभागाच्या संयुक्त सचिव रोहिणी भाजीभाकरे, राज्यातील विविध मतदारसंघांचे आमदार, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार घोरपडे म्हणाले, रोजगार हमी योजनेमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. मात्र, नगरपालिका क्षेत्रातही रस्त्यांची देखभाल, नालेसफाई, वृक्षारोपण, तलावांचे खोलीकरण, सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची अनेक कामे या योजनेतून करता येऊ शकतात. त्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच शहरांच्या विकासालाही गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

कृष्णा कारखाना निवडणूक; सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ; वाढलेल्या टक्केवारीचा कौल कोणाला, उत्सुकता शिगेला

नगरपालिका क्षेत्रात वाढती बेरोजगारी आणि स्थलांतरित मजुरांची समस्या गंभीर बनत असल्याचे सांगत, या घटकांनाही रोजगार हमी योजनेचा लाभ मिळणे ही काळाची गरज असल्याचे घोरपडे यांनी अधोरेखित केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर ग्रामीण आणि शहरी भागातील विकासातील दरी कमी करण्यासाठी या योजनेची व्याप्ती वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, आमदार घोरपडे यांनी मांडलेल्या प्रस्तावाची रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि उपस्थित केंद्रीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक दखल घेतली. नगरपालिका व निमशहरी भागात रोजगार हमी योजना विस्तारण्याबाबत शासनस्तरावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा, वीज कार्यालयावर धडक

Web Title: Mla manoj ghorpade demands extension of rozgar hami yojana to urban areas marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Karad news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.