Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराडजवळ भीषण अपघात; दर्शन घेऊन परतले, पण घरी पोहोचलेच नाहीत,चौघांचा दुर्दैवी अंत

महालक्ष्मीचे दर्शन घेऊन सात मित्र स्कॉर्पिओने गावाकडे निघाले… वाटेत कराडजवळ नव्या सहापदरी उड्डाणपुलावर काळाने घाला घातला. रात्री ११च्या सुमारास स्कॉर्पिओ ट्रकवर आदळली आणि काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. चौघांचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. हादरवून टाकणाऱ्या या अपघाताने कातरखटाव गावावर शोककळा पसरली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 21, 2026 | 09:40 AM
image

image

Follow Us
Follow Us:
  • स्कॉर्पिओ-ट्रक धडकेत चौघांचा मृत्यू
  • तिघे गंभीर जखमी; कृष्णा रुग्णालयात उपचार
  • कातरखटाव गावावर शोककळा
 

सातारा जिल्ह्यातील कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊन स्कॉर्पिओ गाडीने गावाकडे परतणाऱ्या सात तरुणांच्या वाहनाची ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या या नव्या उड्डाणपुलावरील हा पहिलाच अत्यंत भीषण अपघात ठरला आहे.

महालक्ष्मी दर्शनाहून परतताना काळाचा घात

कातरखटाव (ता. खटाव) येथील काही तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूर येथील आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी स्कॉर्पिओने गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते रात्री गावाकडे परतत होते. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कराड शहराजवळ पुणे-बेंगलोर महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर त्यांच्या स्कॉर्पिओची ट्रकला मागून जोरदार धडक बसली. धडक एवढी भीषण होती की स्कॉर्पिओचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत चालक तेजस देशमुख (२५), सागर निंबाळकर (२३), सुयश चिंचकर (२०) आणि रोहित धोत्रे (२१) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋतुराज दुबळे (२१), शंतनू शिंगाडे (२०) आणि अमन तांबोळी (२३) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कातरखटाववर शोककळा

अपघातातील सर्व तरुण हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे रहिवासी आहेत. एकाच गावातील चार तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा: बहिणीला घटस्फोट दिल्याचा राग, मेव्हण्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर फेकला; २८ वर्षांनी मुख्य आरोपीला अटक

पोलिसांची घटनास्थळी धाव

अपघाताची माहिती मिळताच कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, अमृत बाबर, दस्तगीर आगा, राहुल कदम आणि सचिन देवकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. पोलिस आणि नागरिकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातामुळे विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी कराड पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कराडजवळ अपघात कुठे झाला?

    Ans: पुणे-बेंगलोर महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर अपघात झाला.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: कोल्हापूरहून महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या स्कॉर्पिओची ट्रकला मागून जोरदार धडक बसली.

Web Title: Karad pune bangalore highway scorpio truck accident four youths death sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Accident Death
  • highway news
  • Karad news

संबंधित बातम्या

Columbia News: कोलंबिया हादरलं! सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 14 ठार अनेक जण जखमी
1

Columbia News: कोलंबिया हादरलं! सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 14 ठार अनेक जण जखमी

कराड तालुक्यातील कांबिरवाडीत शॉर्ट सर्किटमुळे 35 गुंठे ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे तब्बल 5 लाखांचे नुकसान
2

कराड तालुक्यातील कांबिरवाडीत शॉर्ट सर्किटमुळे 35 गुंठे ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे तब्बल 5 लाखांचे नुकसान

अवघ्या 3 महिन्यांचा संसार, देवीदर्शनाहून परतताना काळाचा घाला! नवविवाहित लोकेशचा दुर्दैवी अंत
3

अवघ्या 3 महिन्यांचा संसार, देवीदर्शनाहून परतताना काळाचा घाला! नवविवाहित लोकेशचा दुर्दैवी अंत

सिन्नरजवळ गोंदे-दातली मार्गावर भीषण अपघात; कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू
4

सिन्नरजवळ गोंदे-दातली मार्गावर भीषण अपघात; कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.