Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: सस्पेन्स संपला! शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं

Maharashtra Politics News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या पक्षात फूट पडण्याच्या आणि महायुतीत येण्याच्या चर्चांवर मोठे विधान केले आहे. महायुतीत कोणताही नवीन पक्ष येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 07, 2026 | 08:29 PM
शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं (Photo Credit- X)

शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • सस्पेन्स संपला!
  • शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही?
  • देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे गटात पडलेल्या उभ्या फुटीनंतर, आता शरद पवार यांच्या पक्षातही (NCP SP) मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. शरद पवारांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) किंवा राज्यातील महायुतीत सामील होणार असल्याचा दावा काही घटकांकडून केला जात आहे. दरम्यान, या सर्व चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

कोणाचाही पक्ष फोडण्याचा आमचा हेतू नाही – देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत नर्मदा नदी खोऱ्यातील प्रकल्पांसंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

‘मिसिंग लिंक’च्या निकृष्ट कामावरून रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, राम मंदिर घोटाळ्याची न्यायिक चौकशी करण्याची मागणी

महायुतीत आणखी एका बड्या पक्षाची भर पडणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातून एनडीएमध्ये किंवा राज्यातील महायुतीत सध्या कोणताही नवीन पक्ष येणार नाही. पक्षाच्या विस्तारासाठी किंवा आगामी निवडणुकांसाठी कोणाचाही पक्ष फोडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. सध्याची महायुती भक्कम असून आगामी काळातही आम्ही सर्व घटक पक्ष एकत्रच पुढे जाणार आहोत.” “शरद पवारांच्या पक्षाचे आमदार किंवा खासदार फोडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी सर्व तर्कवितर्कांना थांबवले आहे.

आमदार रोहित पवारांचा पलटवार

दुसरीकडे, शरद पवार यांचा पक्ष थेट एनडीएत सहभागी होऊ शकतो किंवा एनडीएला बाहेरून पाठिंबा दिला जाऊ शकतो, अशा चर्चा सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले आहे. “आम्ही एनडीएला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीचे नेते आणि शरद पवार गटाचे नेते या दोघांनीही या चर्चा फेटाळून लावल्या असल्या, तरी आगामी काळातील राजकीय समीकरणे काय वळण घेतात, याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाच्या आमदारांची आज ‘मातोश्री’वर महत्त्वपूर्ण बैठक; बैठकीत नेमकं काय घडणार?

Web Title: Will sharad pawars party join the nda or not devendra fadnavis has stated it quite plainly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • NDA
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त
4

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.