Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli News: ‘बॅज लावूनच फिरा, म्हणजे पक्ष कळेल’; मनसे मेळाव्यात राजू पाटील यांची दीपेश म्हात्रेंवर सडकून टीका

डोंबिवलीतील मनसेच्या निर्धार मेळाव्यात मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पक्षांतर, मतदारसंघातील विकासकामे आणि कोविड काळातील आपल्या योगदानाचा उल्लेख करत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2026 | 10:16 AM
Dombivli News: 'बॅज लावूनच फिरा, म्हणजे पक्ष कळेल'; मनसे मेळाव्यात राजू पाटील यांची दीपेश म्हात्रेंवर सडकून टीका

Dombivli News: 'बॅज लावूनच फिरा, म्हणजे पक्ष कळेल'; मनसे मेळाव्यात राजू पाटील यांची दीपेश म्हात्रेंवर सडकून टीका

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवलीतील मेळाव्यात राजू पाटील यांनी दीपेश म्हात्रे आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.
  • ठाकरे गटासोबत चर्चा सुरू असतानाच दीपेश म्हात्रे पक्ष सोडणार असल्याची माहिती आधीच होती आणि ‘प्लॅन बी’ तयार होता, असा दावा राजू पाटील यांनी केला.
  • कोविड काळातील आपल्या कामांचा उल्लेख करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डोबिंवली येथे मनसेच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर पुन्हा टीका केली आहे.

राजू पाटील म्हणाले, “मी बोलण्याच्या ओघात ‘तो रवी कुठे’ असे म्हटले. मात्र, त्याचा वेगळाच अर्थ काढून बाजार मांडण्यात आला. माझा आक्षेप बॅज लावून जाण्याबाबत होता. दीपेश म्हात्रे यांनी तो बॅज लावूनच जावे, म्हणजे ते कोणत्या पक्षात आहेत हे सर्वांना समजेल. दीपेश म्हात्रे बोलतात सूर्यावर थुकू नको. अरे तू थुकून थुकून थोबडा ओला केला आहे.”

मुंबईत वृक्षांचे होणार शास्त्रीय सर्वेक्षण! धोकादायक झाडांची होणार स्वतंत्र नोंद; विविध श्रेणींमध्ये केले जाणार वर्गीकरण

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी मनसे नेते राजू पाटील यांनी डोंबिवलीतील दुरावस्ते बाबत बोलताना असे विधान केले होते की, रवी दिसला आहे. परंतु डोंबिवलीतील रवी दिसत नाही. राजू पाटील यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी राजू पाटलांवर पलटवार केला होता. रवी म्हणजे सूर्य. सूर्यावर थुकायचे नसतं. दीपेश म्हात्रे यांच्या या वक्तव्याला मनसे नेते राजू पाटील यांनी पलटवार केला आहे.

आम्ही आधीच ‘प्लॅन बी’ तयार ठेवला होता – राजू पाटील

यावेळी त्यांनी दावा केला की, “ठाकरे पक्षासोबत वाटाघाटी सुरू असतानाच दीपेश म्हात्रे पक्ष सोडणार हे आम्हाला माहीत होते. त्यामुळे आम्ही आधीच ‘प्लॅन बी’ तयार ठेवला होता. तसेच, आम्ही कोणत्याही पक्षात गेलो नाही. अटी-शर्तींसह सत्ताधाऱ्यांसोबत गेलो आहोत. मतदारसंघातील विकासकामे करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असेही राजू पाटील यांनी स्पष्ट केले. मनसेच्या मेळाव्यात राजू पाटील यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपा नगरसेवक दीपेश महाराष्ट्र यांना लक्ष केले आहे आता भाजपाकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लाखो रुपये कोविडमध्ये मी खर्च केले – राजू पाटील

राजू पाटील पुढे म्हणाले की, रवींद्र चव्हाण डोंबिवलीचे आमदार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. मग त्यांनी डोंबिवली साठी काय केलं? भुंकणारे कुत्रे मला ट्रोल करत आहेत की आम्ही काय केलं. हॉस्पिटल कोविडमध्ये दिलं, तर आरोप करतात दहा लाख भाडं घेतलं. याची माहिती देखील त्यांना नाही, त्यावेळेला कोणी कोणाच्या घरी, नातेवाईकांकडे जात नव्हते. कोविडच्या वेळेला हॉस्पिटल देण्याची दानत मी दाखवली. हे जे आरोप करतात त्यांच्या थोबाडावर हे मारा आणि यांचा दादा कोकणात आईनस्टाईनसारखा दाढी वाढून बसलेला. हा त्याच्यात आणि माझ्यातला फरक आहे. गवंडी सारखं हॅन्ड ग्लोज घालून तो फिरायचा आणि हे आम्हाला सांगतात. लाखो रुपये कोविडमध्ये मी खर्च केले केलेले. मदत बोलून दाखवायची नसते मात्र यांच्या अंध भक्तांना हे मला सांगायचं आहे. मला तीन वेळा कोविड झाला. आता हे त्यांच्या जिल्ह्याला माझ्यावर टीका करण्यासाठी बोलतात, त्यामुळे त्यच्यावर त्याच पद्धतीने उत्तर द्या.

बोटांचे ठसे जुळत नसल्याने ज्येष्ठांना मिळेना एसटीचे NCMC कार्ड; पर्यायी व्यवस्थाही नसल्याने अडचणींत वाढ

रवींद्र चव्हाण यांना इशारा देत राजू पाटील म्हणाले की, डोंबिवलीचं राजकारण असं नव्हतं. यांना वाटतं आम्ही सगळ्यांवर भारी आहे. एका लिमिट पर्यंत सहन करा, नंतर उत्तर द्या. माहौल खराब होईल असं काय करू नका. सगळे मला बोलतात दादा यांना काहीतरी करू पण मी बोललो ते मुद्द्यावर बोलतात का? रवींद्र चव्हाण यांनी हॉस्पिटलसाठी काय केलं?

सगळ्यांना विनंती आहे की, यांच्या मागे लागू नका. मी सक्षम आहे. माझ्या बाजूलाच आहे. तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही.. आम्ही तुमच्या बरोबर नाही मात्र शिवसेना तुमच्या बरोबर आहे. चार चांगल्या गोष्टी घेऊन या एकत्र काम करा. चांगले विषय घेऊन पुढे जा. या कुत्र्या मांजराच्या पाठी लागू नका, असे आवाहन राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Web Title: Mns leader raju patil slashes bjp deepesh mhatre ravindra chavan at dombivli nirdhar melava

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • dombivali news
  • maharashtra
  • raju patil

संबंधित बातम्या

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
1

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात
2

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील
3

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब
4

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.