Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेत असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार भाजपसोबत जातील असे वाटत नसल्याचे सांगतानाच अर्थखात्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले.

  • By विवेक
Updated On: Jul 17, 2026 | 06:03 PM
'केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,' राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत

'केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,' राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत

Follow Us
Follow Us:
  • एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया
  • ‘शरद पवार भाजपसोबत जातील असे वाटत नाही,’ असे स्पष्ट मत
  • जयंत पाटील आणि अर्थखात्याचा अंतिम निर्णय दिल्लीतच होईल, असा दावा
 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटींनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘शरद पवार भाजपसोबत जातील असे वाटत नाही’

अंबादास दानवे म्हणाले की, “शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष आणि प्रतिगामी शक्तींविरोधात सातत्याने लढत आला आहे. त्यामुळे केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी ते भाजपसोबत जातील, असे मला तरी वाटत नाही. मात्र, राजकारणात कोणाच्या मनात काय आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आणखी चालना मिळाली आहे.

Supriya Sule: ‘दादांना जे हवं होतं ते झालं नाही..’, अजित पवार यांची आठवण काढून सुप्रिया सुळे भावुक, म्हणाल्या…

जयंत पाटील आणि अर्थखात्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया

जयंत पाटील यांना अर्थखाते मिळण्याची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता दानवे म्हणाले की, अर्थखाते कोणाला द्यायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही. अंतिम निर्णय दिल्लीतूनच होतो.

ते पुढे म्हणाले, “शिंदे स्वतः काही ठरवू शकत नाहीत, तर अर्थखात्याचा निर्णय काय घेणार? हे सर्व दिल्लीतच ठरणार आहे.”

दिल्लीतील राजकीय हालचालींवरही भाष्य

दिल्लीत वाढलेल्या राजकीय हालचालींबाबत विचारले असता दानवे यांनी सावध भूमिका घेतली. “केवळ शक्यतांवर भाष्य करण्यात अर्थ नाही. घडामोडी प्रत्यक्ष घडल्यानंतरच त्यावर बोलणे योग्य ठरेल,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरून सुनेत्रा पवार नाराज? सुनील तटकरे यांनी दिलं स्पष्ट उत्तर

जयंत पाटलांना अर्थखाते मिळणार?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याला काही काही तास उलटत नाहीत तोच ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. विशेषतः, संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात जयंत पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, याची चर्चा सुरू आहे. पण जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या या संदर्भात फक्त राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कच काढले जात आहे.

Web Title: Ambadas danve on sharad pawar nda speculation jayant patil finance ministry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • BJP
  • Eknath Shinde
  • jayant patil
  • Sharad Pawar NCP

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा
1

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
2

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती
3

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
4

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.