Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांनी दिला होता ‘हा’ महत्वाचा निरोप; रोहित पाटील यांनी दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आशा दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण करणार होते, याबाबत आमदार रोहित पाटील यांनी माहिती दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 31, 2026 | 02:48 PM
अजित पवारांनी दिला होता 'हा' महत्वाचा निरोप; रोहित पाटील यांनी दिली माहिती

अजित पवारांनी दिला होता 'हा' महत्वाचा निरोप; रोहित पाटील यांनी दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवारांनी दिला होता महत्वाचा निरोप
  • रोहित पाटील यांनी दिली माहिती
  • हिंगणगाव येथील सभेत सगळचं सांगितलं
सांगली/प्रवीण शिंदे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आशा दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण करणार होते, त्याबाबत त्यांनी दिवंगत नेते आर. आर. आबा पाटील यांचे चिरंजीव व तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांना सूचना दिल्या होत्या. याबाबतचे स्पष्टीकरण खुद्द रोहित पाटील यांनी हिंगणगाव ( ता. कवठेमहांकाळ) येथील एका सभेत दिले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता राष्ट्रवादी एकत्रीकरण होण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, मात्र अजित पवार हे त्यासाठी आग्रही होते, शिवाय त्यांनी त्याबाबत अनेक बैठकाही घेतल्या होत्या. तसेच अनेक महत्वाच्या आंदरांशीही ते बोलत होते, मात्र आता त्यांच्या पश्चात एकत्रीकरण होणार का ? अशी चर्चा सुरू असताना आमदार रोहित पाटील यांनी एका सभेत याबाबत स्पष्टीकरण दिले.

महत्वाची दिली होती सूचना

रोहित पाटील म्हणाले, ‘नुकतेच अजितदादा यांनी मला निवडणुकीनंतर आपली पक्षीय परिस्थिती वेगळी असणार आहे, असे सांगून दोन्ही पक्ष एकत्रीकरण करणार असल्याचे संकेत दिले होते, त्यानुसार कामाला लाग, तुझ्या मतदार संघात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या नेत्यांशी भेटून चर्चा करून योग्य त्या ठिकाणी उमेदवार देऊन सामंजस्य ठेवून निवडणुका लढा, असे अजितदादांनी सांगितले होते. तासगाव तालुक्यात मी भेटू शकणार नाही असे दादांना सांगितले होते. मात्र कवठेमहांकाळ तालुक्यात मी संबधीताना भेटायला गेलो, मात्र त्यांनी मला कोणतही चर्चा करायची नाही, असे सांगून टाळले. कारण माझ्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येण्याचे आधीच ठरले होते, असा आरोपही आमदार पाटील यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता केला.

हे सुद्धा वाचा : सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाची इतकी घाई कशासाठी? पडद्यामागे नेमकं काय घडलं?

फक्त दादांना सांगा मी भेटून गेलो म्हणून…

पाटील म्हणाले, अजितदादा यांना आदरांजली वाहताना अत्यंत दुःख होत आहे, त्यांनी नेहमीच मला मदत केली आहे, त्यांच्या जाण्याने जे नुकसान झाले आहे ते कधीच भरून निघणारे नाही, सुरू असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझ्या मतदारसंघात त्यांनी दिलेल्या सूचना पाळण्यासाठी मी त्या नेत्यांना भेटायला गेलो, मात्र त्यांनी आमचा प्रस्थाव धुडकावून लावला, त्याची करणे ठावूक आहेत, मात्र मी त्या नेत्यांना सांगितले की, फक्त दादांना सांगा मी येऊन गेलो म्हणून, कारण मला दादांची आदरयुक्त भीती होती. असेही आमदार रोहित पाटील म्हणाले.

Web Title: Mla rohit patil has given great information about deputy chief minister ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • MP Sharad pawar
  • Rohit Patil

संबंधित बातम्या

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!
1

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Zp Election 2026 : विरोधकांच्या भुलथापांना, अमिषाला बळी बडू नका; देवराज पाटील यांचे आवाहन
2

Zp Election 2026 : विरोधकांच्या भुलथापांना, अमिषाला बळी बडू नका; देवराज पाटील यांचे आवाहन

चार दिवसांपूर्वी भेटलो होतो, आज मला…; अजित पवारांच्या आठवणींने निशिकांत भोसले पाटलांना अश्रू अनावर
3

चार दिवसांपूर्वी भेटलो होतो, आज मला…; अजित पवारांच्या आठवणींने निशिकांत भोसले पाटलांना अश्रू अनावर

अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीतील समीकरणे बदलणार? स्थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता
4

अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीतील समीकरणे बदलणार? स्थानिक राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.