Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर रोहित पवार यांची टीका; म्हणाले…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकिय व्यक्तीची नियुक्ती नको. रुपाली चाकणकर यांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहीजे असे रोहीत पवार म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 31, 2025 | 04:24 PM
रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर रोहित पवार यांची टीका; म्हणाले...

रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर रोहित पवार यांची टीका; म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकिय व्यक्तीची नियुक्ती नको. गेल्या काही प्रकरणात आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भुमिका योग्य दिसून आली नाही. पक्षाचा एक विभाग असल्यासारखे आयोगाचे काम कोणी चालवित असेल, तर ते योग्य ठरणार नाही, असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच चाकणकर यांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहीजे असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेच्या वतीने ‘एमपीएल’ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने आयोजित पत्रकार परीषदेत आमदार पवार यांनी राजकीय विषयांवरही भाष्य केले. वैष्णवी कस्पटे – हगवणेच्या आत्महत्येनंतर राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्यावर टिका केली गेली. या संदर्भात बोलताना आमदार पवार यांनी राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तींची नियुक्ती करता कामा नये. या पदावर निवृत्त न्यायाधीश, निवृत्त पोलिस अधिकारी आदी क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती झाली पाहीजे. यासंदर्भात आम्ही विधानसभेच्या पुढील अधिवेशनात विषय उपस्थित करणार आहोत. महीला आयोगाप्रमाणेच इतर आयोगावर अराजकीय व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राजकीय व्यक्तीची आयोगावर नियुक्ती झाली, तर तेथे राजकारण होणारच, असे नमूद करीत आमदार पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षांत या आयोगाच्या अध्यक्षपदावर काम करणाऱ्या व्यक्ती या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. यामुळे महीला आयोग हा आपल्या पक्षाचा विस्तारित विभाग असल्यासारखे कामकाज केले जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

आणखी काय म्हणाले आमदार पवार ?

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून केलेल्या वक्तव्यांवर आमदार पवार यांनी नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणुसकीशून्य असलेलल्या कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि काय बोलावे याचा क्लास त्यांना लावावा, असा मार्मिक सल्ला दिला.

दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्यासंदर्भात आमदार पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे बोट दाखविले. ‘‘मी आणि जयंत पाटील यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात पत्र दिल्याची माहीती खोटी आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विषयी निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांना दिले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Mla rohit pawar has criticized rupali chakankars working methods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 04:24 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • MLA Rohit Pawar
  • pune news
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

साखर कारखानदारांची ‘काटामारी’, वजनात तफावत; ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
1

साखर कारखानदारांची ‘काटामारी’, वजनात तफावत; ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

Satara News: महिला डॉक्टरच्या आत्महत्येने गृहखात्याच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगली; काँग्रेसचा फडणवीसांवर पुन्हा हललाबोल
2

Satara News: महिला डॉक्टरच्या आत्महत्येने गृहखात्याच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगली; काँग्रेसचा फडणवीसांवर पुन्हा हललाबोल

Phaltan Doctor suicide case: फलटण डॉक्टर आत्महत्येची महिला आयोगाने गांभीर्याने घेतली दखल; चाकणकरांनी व्यक्त केला संताप
3

Phaltan Doctor suicide case: फलटण डॉक्टर आत्महत्येची महिला आयोगाने गांभीर्याने घेतली दखल; चाकणकरांनी व्यक्त केला संताप

पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध; दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव
4

पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध; दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.