Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maval Hyundai Company Fraud : मावळातील उद्योजकांची दिशाभूल? स्थानिक दलाल अन् PMRDA अधिकाऱ्यांविरोधात आमदार शेळके आक्रमक

मावळमध्ये हुंदाईसारखी कोरियन कंपनीची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 09, 2025 | 05:50 PM
MLA Sunil Shelke aggressive local brokers and PMRDA officials over Maval Hyundai company fraud case

MLA Sunil Shelke aggressive local brokers and PMRDA officials over Maval Hyundai company fraud case

Follow Us
Close
Follow Us:
  • मावळमध्ये हुंदाई कोरियन कंपनीची फसवणूक
  • स्थानिक दलाल आणि पीएमआरडीए अधिकाऱ्यांमुळे ही फसवणूक
  • आमदार सुनील शेळके यांचा आक्रमक पवित्रा
Maval Hyundai Company Fraud : वडगाव मावळ : मावळ तालुक्यात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांची काही दलालांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. याबाबत गंभीर आरोप आमदार सुनील शेळके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केले आहेत. हुंदाईसारखी कोरियन कंपनी महाराष्ट्रात आणणाऱ्या महायुती सरकारचा उद्देश रोजगारनिर्मिती असताना, काही दलालांनी कंपनीच्या व्हेंडरना बेकायदेशीर व फसवे दस्तऐवज दाखवून मिळकतीची विक्री करून आंतरराष्ट्रीय कंपनीलाच आर्थिक गंडा घातला, असे त्यांनी स्पष्ट केले.

फसवणुकीत सामील दलालांनी खोट्या मोजणी नकाशावर बांधकाम परवानगी घेतल्याचे, कोणताही पूर्णत्वाचा दाखला (OC) न घेता प्रकल्पांची विक्री केल्याचे, शिवाय वनीकरण झोनमध्ये बेकायदेशीर बांधकाम करून हजारो ब्रास उत्खननही केल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे अनेक कंपन्यांची फसवणूक झाल्याने, संबंधित दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार शेळके यांनी मांडली. पीएमआरडीएनेही या प्रकरणांवर नोटीस बजावल्यानंतर या व्यवहारांमधील धांदली अधिक स्पष्टपणे बाहेर आली आहे.

हे देखील वाचा : वाढत्या थंडीने बारामती परिसरात हुडहुडी; व्यायामासाठी तरुणांची वाढती गर्दी

मावळातील एमआयडीसी परिसरात वाढत्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या कंपन्या येथे व्यवसाय उभारण्यास इच्छुक आहेत. मात्र काही दलाल बनावट झोन दाखले, नकाशे बदलणे, चुकीची परवानगी दाखवणे, आणि गुंतवणूकदारांना दिशाभूल करून मिळकतीची विक्री करीत असल्याचे शेळके यांनी निदर्शनास आणले. “मी मागील सहा वर्षांत माझ्या मतदारसंघातील उद्योगांच्या ठाम पाठीशी उभा राहिलो आहे. कोणत्याही कंपनीचा ठेका घेतलेला नाही,” असे सांगत त्यांनी स्वतःवरील आरोपांनाही उत्तर दिले. पुढे ते म्हणाले की, “मावळ तालुक्यात येणाऱ्या उद्योगांशी फसवणूक करणाऱ्या दलालांना आम्ही सुट्टी देणार नाही,” असा कठोर इशारा देत आमदार शेळके यांनी या सर्वांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हे देखील वाचा : पुत्र प्रेमापोटी कोकणातील ‘या’ नेत्याला डावललं? विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर

याचदरम्यान, या गंभीर फसवणूक प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती सादर केली. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तत्काळ कारवाईचे संकेत दिल्याचे समजते. त्यामुळे पुढील काही दिवसांत संबंधित दलालांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. या भेटीमुळे संपूर्ण प्रकरणाला आता राज्यस्तरावरून गती मिळणार असल्याची चर्चा राजकीय व औद्योगिक क्षेत्रात सुरू आहे.

Web Title: Mla sunil shelke aggressive local brokers and pmrda officials over maval hyundai company fraud case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • hyundai Motors
  • maval news
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Maval News : महसूल कार्यालयात केवळ खुर्चा अधिकारी नाहीच; खाजगी ऑफिसमधून ‘राजकारभार’ सुरु
1

Maval News : महसूल कार्यालयात केवळ खुर्चा अधिकारी नाहीच; खाजगी ऑफिसमधून ‘राजकारभार’ सुरु

नाव मोठे आणि दर्शन छोटे! Safety Test मध्ये ‘या’ कारला मिळाली शून्य रेटिंग, कंपनीची तर झोपच उडाली
2

नाव मोठे आणि दर्शन छोटे! Safety Test मध्ये ‘या’ कारला मिळाली शून्य रेटिंग, कंपनीची तर झोपच उडाली

किंमत कमी आणि परफॉर्मन्सची हमी! दमदार मायलेज आणि सनरूफ सोबत येतात ‘या’ 3 कार
3

किंमत कमी आणि परफॉर्मन्सची हमी! दमदार मायलेज आणि सनरूफ सोबत येतात ‘या’ 3 कार

Tata Sierra vs Hyundai Creta: दोन्ही एकाच सेगमेंटच्या कार, मात्र तुमच्यासाठी बेस्ट कोणती? जाणून घ्या
4

Tata Sierra vs Hyundai Creta: दोन्ही एकाच सेगमेंटच्या कार, मात्र तुमच्यासाठी बेस्ट कोणती? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.