Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Shelke News: रोहित पवारांनी ‘भविष्यवाणीचा’ धंदा सुरू केलाय का? सुनील शेळके यांचा जळजळीत सवाल

Sunil Shelke- आमच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळत आहे. स्थानिक प्रश्न मार्गी लागत असताना आम्ही दुसरा पर्याय का शोधू?” असा सवालही उपस्थित करत भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत केला

  • By anuradha sagar
Updated On: May 13, 2026 | 05:30 PM
Sunil Shelke News, Rohit Pawar Prediction, NCP MLAs Joining BJP

Sunil Shelke News, Rohit Pawar Prediction, NCP MLAs Joining BJP

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादीचे १५ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा रोहित पवारांचा दावा सुनील शेळके यांनी फेटाळला
  • रोहित पवार हे २०२९ मध्ये बारामतीतून स्वतः काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत – सुनील शेळके
  • मतदारसंघातील विकासकामे आणि निधी वेळेवर मिळत असल्याने आम्ही दुसरा कोणताही राजकीय पर्याय शोधण्याचे कारण नाही- सुनील शेळके
Sunil Shelke News: रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते भाजपमध्ये जाणार असून त्यांच्यासोबत १५ आमदारही जाणार असल्याचा दावा केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या दाव्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबुतीने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

आमदार सुनील शेळके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांवर टीका करत म्हटले की, “अजित दादांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवार सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत आहेत. इतकं खोटं सातत्याने बोललं जात आहे की महाराष्ट्रातील जनतेलाही ते खरं वाटू लागलं आहे.”

NCP Politics: ‘आम्ही कष्ट केले आणि आमचीच नावे नाहीत?’; राष्ट्रवादीत पटेल-तटकरेंच्या नाराजीनाट्याने खळबळ

तसेच, काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करत रोहित पवारांनी भविष्यवाणीचा नवीन धंदाच सुरू केला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. सुनील तटकरे , प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील , धनंजय मुंडे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते पक्ष मजबूत करण्यासाठी काम करत आहेत,” असे शेळके यांनी स्पष्ट केले.

“आमच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळत आहे. स्थानिक प्रश्न मार्गी लागत असताना आम्ही दुसरा पर्याय का शोधू?” असा सवालही त्यांनी उपस्थित करत भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सुनील शेळके यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप करत सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नये यासाठीच ते प्रयत्न करत आहेत. “बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार द्यावा यासाठी रोहित पवारांनी हट्ट धरला होता. तसेच २०२९ मध्ये ते स्वतः काँग्रेसकडून बारामतीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत,” असा दावा त्यांनी केला.

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! 

“जर रोहित पवारांनी नैतिकतेबद्दल बोलायचं असेल, तर त्यांनी आधी जाहीर करावं की ते भविष्यात सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कधीही उभे राहणार नाहीत,” असे आव्हानही शेळके यांनी दिले.

तसेच, “पवार साहेब आणि अजित दादांसोबत ३५ ते ४० वर्षे अडचणीच्या काळात उभे राहिलेल्या नेत्यांवर आरोप करून तुम्हाला काय साध्य करायचे आहे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी रोहित पवारांवर पक्षात संभ्रम निर्माण करण्याचा आरोप केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी काळात आणखी मजबुतीने उभा राहील आणि २०२९ च्या निवडणुकीत २०२४ पेक्षा अधिक चांगला परफॉर्मन्स देईल, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

 

 

 

Web Title: Sunil shelke news rohit pawar prediction ncp mlas joining bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • rohit pawar
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा
1

मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भेट; रोहित पवारांचा मोठा दावा

‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका
2

‘शरद पवार गटाचा एकही आमदार फुटणार नाही’; रोहित पवारांचा ठाम विश्वास, संजय दिना पाटील यांच्या वर्तनावरही टीका

‘RTI कायद्यात बदल करुन प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठीचं..,’ रोहित पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा
3

‘RTI कायद्यात बदल करुन प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठीचं..,’ रोहित पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.