
Raj Thackeray on Ganeshotsav 2026: ‘गणेशोत्सवात दंगल घडवणार...’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आज ठाण्यातील राम गणेश गडकरी नाट्यगृहात मनसेचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, “तुम्हाला मुद्दाम गुंतवूण ठेवलं जातंय. सध्या सोशल मीडियावर पण हाच विषय सुरू आहे. आता 14 तारखेला गणपती येणार मात्र मला सगळ्यात जास्त भीती हीच आहे की गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील. मी फक्त महाराष्ट्राबद्दल बोलत नाहीये, देशात दंगली घडतील. जेणेकरून तुम्ही त्यात अडकून पडाल आणि मूळ प्रश्नांकडे तुमचं लक्ष जाणार नाही.” Raj Thackeray on Ganeshotsav 2026:
ते पुढे म्हणाले की, “मुंबईत त्याची झलक तुम्ही आत्ताच पाहिली. एक-दोन घटना घडल्या, ही तर फक्त सुरुवात आहे. यामागे मोठी यंत्रणा काम करत आहे. भाजपमधली लोकं पण यावर बोलू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. राज ठाकरेंनी सगळ्या लोकांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले, जो सुजाण हिंदू आहे आणि जो सुजाण मुस्लीम आहे, त्या दोघांनाही मी सांगतोय की सतर्क राहा.”
पुढे ते म्हणाले की, “तुमच्या आणि त्यांच्या नावाने कोणीतरी घुसखोरी करेल आणि दंगली घडवेल. त्यात आपलीच सुद्धा पोरं जातील आणि त्यांची पण पोरं जातील. तुम्हाला एकमेकांचा द्वेष करायला लावून मूळ प्रश्नांपासून दूर ठेवण्याचा हा सगळा खेळ आहे. देशाची परिस्थिती सध्या खूपच वाईट आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की देशात बेरोजगारी, महागाई असे खूप प्रश्न आहेत. त्या प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी मुद्दाम दंगलीचा डाव आखला जात आहे.”
याच भाषणात राज ठाकरेंनी मराठी-हिंदी वादावर पण भाष्य केलं. ते म्हणाले की “काही अमराठी लोकांना मुद्दाम मराठीबद्दल वाईट बोलायला लावलं जातंय. ‘आम्ही मराठी बोलणार नाही, तुमचं काय उखडायचंय ते उखडा’ असं बोलायला लावतात, जेणेकरून मराठी माणूस त्यात अडकेल आणि भांडणं होतील.नवी मुंबईत होणाऱ्या हिंदी संमेलनावर पण ते बोलले. ते म्हणाले की तिथे अमित शाह येणार आहेत म्हणून बातम्या सुरू झाल्या आहेत की महाराष्ट्रात हिंदी संमेलन होतंय. पण याकडे लक्ष देऊ नका. ते होऊन जाऊ द्या. दुर्लक्ष करा.”
म्हणाले की, अमित शाह हिंदी संमेलनात आले तरी त्यांचं हिंदी सुधारणार नाही, कारण ते पण ‘परेस, जयेस’ वालेच आहेत.एकंदरीत राज ठाकरेंच्या या भाषणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर त्यांनी दंगलीचा दावा केल्यामुळे आता पोलीस आणि प्रशासन पण अलर्ट झाले आहे. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार लोकांनी शांत राहणं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवणं गरजेचं आहे.”