Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवसाला पावणाऱ्या ‘लालबागच्या राजा’ची स्थापना कधी झाली? जाणून घ्या गणपतीमागचा इतिहास आणि परंपरा

नवसाला पावणारा गणपती म्हणून भारतासह जगभरात सगळीकडे लालबागच्या राजाची ओळख आहे. १९३४ मध्ये लालबाग बाजारात गणेशाची मूर्ती कायमस्वरूपी स्थापना करण्यात आली. चला तर जाणून घेऊया लालबागच्या राजाचा इतिहास.

  • By सुरुची कदम, दिपाली नाफडे
Updated On: Sep 02, 2026 | 01:07 PM
नवसाला पावणाऱ्या ‘लालबागच्या राजा’ची स्थापना कधी झाली? जाणून घ्या गणपतीमागचा इतिहास आणि परंपरा

नवसाला पावणाऱ्या ‘लालबागच्या राजा’ची स्थापना कधी झाली? जाणून घ्या गणपतीमागचा इतिहास आणि परंपरा

Follow Us
Follow Us:

लालबागच्या राजाची शान काही वेगळीच आहे. पण तुम्हाला या लालबागच्या राजाचा इतिहास माहीत आहे का? आणि लालबागचा राजा नक्की कधीपासून प्रसिद्ध झाला काय आहे याची कहाणी. १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होतोय आणि आजपासून आपण मुंबईतील विविध गणपतींचा इतिहास जाणून घेऊया आणि प्रारंभ करूया लालबागच्या राजाच्या आशिर्वादाने. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना मुंबईतील परळ भागातील लालबाग येथील कोळी समाज (मच्छीमार) आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी केली. सुमारे १९३२ मध्ये, एक कापड गिरणी बंद पडल्याने कामगार आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायात व्यत्यय आला होता आणि तेव्हाच स्थानिकांनी कायमस्वरूपी बाजारासाठी गणपतीकडे प्रार्थना केली.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Ganapati Special Trains: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! ९ सप्टेंबरपासून २६२ विशेष ट्रेन फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

या व्यापाऱ्यानी केलेला नवस आणि जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण झाली, तेव्हा त्यांनी १९३४ मध्ये लालबाग बाजारात गणेशाची मूर्ती कायमस्वरूपी स्थापित केली. तेव्हापासून, हा लालबागचा राजा “नवसाचा गणपती” म्हणून ओळखला जातो, ज्याचा अर्थ नवस आणि इच्छा पूर्ण करणारा राजा असा होतो. सुरुवातीला एका लहान वस्तीचा उत्सव असलेला हा सण आता भारत आणि परदेशातील लाखो भक्तांसाठी श्रद्धेचे एक प्रमुख केंद्र बनला आहे. दहा दिवसांच्या भव्य गणेशोत्सवाच्या पूजेनंतर, अनंत चतुर्दशीला गिरगाव चौपाटी येथे मूर्तीचे विसर्जन केले जाते. दरम्यान या गणपतीला आता बऱ्यापैकी व्यावसायिक रूपही प्राप्त झाले आहे आणि अनेक सेलिब्रिटी इथे दर्शनाला येताना दिसतात. आजही भाविकांची मोठी रांग लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दिसून येते.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

लालबागचा राजा केवळ मुंबईमध्ये नाहीतर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी भक्त खूप लांबून येतात. १९३५ पासून लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याची परंपरा कांबळी कुटुंबाकडे आहे. तीच परंपरा अजूनही फॉलो केली जात आहे. लालबागचा राजा घडवण्याची चालू झालेली परंपरा आज कांबळी कुटुंबाची तिसरी पिढी सांभाळत आहे. संतोष कांबळी हे केवळ मूर्तिकार नसून एका परंपरेचे संरक्षक आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्याकडूनच लालबागच्या राजाची मूर्ती बनवून घेतली जाते. राजाची मूर्ती एका दिवसात नाहीतर दोन ते तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर साकारली जाते.

 

Web Title: When was the wish fulfilling lalbaugcha raja established learn about the history and traditions behind this ganpati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Ganapati Festival
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.