Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पण गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारे ध्वनिप्रदूषण आणि रस्ते-पादचारी मार्ग अडवून उभारण्यात येणारे अनधिकृत मंडप रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 03, 2026 | 08:55 AM
गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका

गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका

Follow Us
Follow Us:

Thana News: गणेशोत्सवादरम्यान डीजेवर बंदी आणावी, हा मुद्दा पुण्यातील बापट यांनी उपस्थित केला होता. आता ठाण्यातही अशाच प्रकारची मागणी जोर धरू लागली असून, जनहित याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा, अशी मागणी केली आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारे ध्वनिप्रदूषण आणि रस्ते-पादचारी मार्ग अडवून उभारण्यात येणारे अनधिकृत मंडप रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी बेडेकर यांनी सरकारकडे केली आहे. नियमभंग झाल्यानंतर किंवा नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रशासनाने स्वतःहून पुढे येऊन उत्सव सुरू होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, असे त्यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात सांगितले आहे.(फोटो सौजन्य – istock)

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण

हायकोर्टाच्या निर्देशांचे पालन व्हावे!

सण-उत्सवांच्या काळात डीजे, लाऊडस्पीकरमुळे होणारा कानठळ्या बसवणारा आवाज आणि पदपथ व्यापून उभारण्यात येणाऱ्या बेकायदा मंडपांविरोधात डॉ. महेश बेडेकर यांनी २०१० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे व कडक निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांचे पालन व्हावे यासाठी डॉ. बेडेकर यांनी राज्याचा गृह विभाग, पर्यावरण विभाग, पोलीस महासंचालक, ठाणे पोलीस आयुक्त, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सविस्तर पत्र पाठवून न्यायालयाच्या आदेशांची आठवण करून दिली आहे.

रस्त्यांवर चालण्याचा पादचाऱ्यांचा अधिकार आणि शांततेत जगण्याचा ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे. मंडप वा इतर तात्पुरत्या संरचनांना पादचारी वाहनचालकांचा विचार करूनच परवानगी देण्यात यावी. एखाद्या आयोजकाकडून यापूर्वी नियमांचे उल्लंघन झाले असल्यास, भविष्यात त्याला परवानगी देताना पूर्वीच्या उल्लंघनांची नोंद व त्यावरील कारवाई विचारात घेण्यात यावी, असे मत -डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केले आहे.

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता

तक्रारींसाठी सक्षम यंत्रणा उभारावी:

  • ध्वनिप्रदूषणाविरोधात दाद मागण्यासाठी सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होईल अशी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज डॉ. बेडेकर यांनी व्यक्त केली.
  • याकरिता टोल-फ्री क्रमांक, पोलीस हेल्पलाईन, एसएमएस, ई-मेल आणि व्हॉट्सअॅप तक्रार निवारण क्रमांक सुरू करावेत.
  • प्रत्येक तक्रारीला विशिष्ट संदर्भ क्रमांक द्यावा, जेणेकरून त्यावर काय कारवाई झाली हे तक्रारदाराला समजू शकेल.
  • प्रत्येक प्रभागातील पथकांना पुरेशा प्रमाणात आधुनिक ध्वनिमापक यंत्रे देऊन आवाजाची पातळी मोजूनच दंडात्मक कारवाई करावी.
  • तसेच प्रभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक सार्वजनिक करावेत, अशी मागणी डॉ. बेडेकर यांनी केली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Play loudspeakers within limits during ganeshotsav after punes bapat dr mahesh bedekar from thane takes a similar stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन
1

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र
2

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण
3

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
4

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.