मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा महाराष्ट्राला इशारा (फोटो सौजन्य - Facebook)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी १२ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, या ऐतिहासिक वास्तूंवरील सर्व अनधिकृत बांधकामे हटवली पाहिजेत, मग हे अतिक्रमण करणारे कोणत्याही समुदायाचे असोत. इतकंच नाही तर राज ठाकरे इशारा देत म्हणाले की, सरकारने जागतिक वारसा दर्जा हलक्यात घेऊ नये, कारण जर नियमांचे योग्य पालन केले नाही तर तो काढून घेतला जाऊ शकतो (फोटो सौजन्य – Facebook)
जागतिक वारसा यादीत समाविष्ट हे किल्ले
मराठा शासकांच्या तटबंदी व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारे ‘मराठा लष्करी भूदृश्य’ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या (WHC) ४७ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘मराठा लष्करी भूदृश्य’मध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजय दुर्ग आणि सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील गिंगी किल्ल्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण ! शिवरायांच्या 12 किल्यांचा UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समावेश
अतिक्रमणं पाडा
मनसे प्रमुखांनी त्यांच्या फेसबुक हँडलवर लिहिले आहे की, “सरकारने अतिक्रमण करणाऱ्यांचा धर्म किंवा जात यांचा विचार न करता या किल्ल्यांवरील सर्व अनधिकृत बांधकामे ताबडतोब पाडावीत. या प्रसंगी महाराष्ट्राच्या कामगिरीबद्दल बोलणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची कल्पना किती दूरवर पोहोचली होती हे लक्षात येईल आणि दोन भाषा आणि संस्कृतींमधील पूल किती जुना आणि मजबूत आहे हेदेखील त्यांना कळेल,”
‘आता किल्ल्यांवर योग्य लक्ष’
त्यांनी पुढे लिहिले आहे की, “युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यानंतर, वास्तूंच्या संवर्धन आणि जीर्णोद्धारासाठी कठोर नियम आहेत ज्यांचे पालन करावे लागेल आणि आपल्या महाराजांच्या किल्ल्यांना ते योग्य लक्ष मिळेल.” याशिवाय आता किल्ल्यांकडे अधिक लक्षपूर्वक पहायला लागेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
‘मागील सरकारांनी जीर्ण अवस्थेत सोडले आहे’
त्यांनी असेही म्हटले आहे की, “या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार निधी मिळवेल आणि राज्याने स्वतःच्या खिशातूनही अधिक निधी वाटप करावा.” ठाकरे म्हणाले की, भूतकाळातील प्रत्येक सरकारने हे किल्ले जीर्ण अवस्थेत सोडले होते, ज्यामुळे जगाला त्यांना भेट देण्यासाठी आणि शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचे वैभव दाखवण्यासाठी आमंत्रित करणे अशक्य झाले होते आणि सर्वात पोस्टच्या शेवटी त्यांनी सर्वांचे अभिनंदही केले आहे. युनेस्कोकडून मिळालेला हा दर्जा सांभाळण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि शासनाने याकडे अधिक लक्ष द्यावे असंही त्यांच्या पोस्टमधून त्यांनी सांगितले असल्याचे दिसून आले.
जागतिक वारसास्थळात कोल्हापूरच्या पन्हाळगडाचा समावेश; ‘युनेस्को’चे डॉ. जोशी म्हणाले…
राज ठाकरेंची पोस्ट