सलग सुट्ट्यांमुळे पन्हाळा हाऊसफुल्ल; नगरपरिषदेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ (File Photo)
पन्हाळा : ‘युनेस्को’ने जागतिक वारसास्थळात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा संकल्पने खाली नामांकित केले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळा गडचा समावेश झाला आहे.
साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश केला आहे. युनेस्को ही संस्था निवडलेल्या वारसास्थळांचे संरक्षण करण्यासाठी आर्थिक मदत करत नाही. त्यामुळे भारतीय सरकारलाच या स्थळांचे संरक्षण चालू ठेवावे लागणार आहे.
हेदेखील वाचा : Shrikant Shinde ED Notice : खासदार श्रीकांत शिंदेंना ईडीची नोटीस? मुलासाठी वडीलांनी अधिवेशन सोडत गाठली दिल्ली?
डॉ. सुहास जोशी, ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’, पुणे येथील युनेस्को सादरीकरण समितीचे सदस्य, यांनी सांगितले की, ‘‘यादीत समावेश झाल्यास किल्ल्यांचे संरक्षण अधिक प्रभावी होईल. कारण हे एकदाच होणारे कार्य नसून, सातत्याने करावे लागते. यादीत समावेश झाल्यावर जागतिक निकषांनुसार देखभाल करावी लागेल, जे भविष्यासाठी चांगले ठरेल.
महाराष्ट्रातून याआधी समाविष्ट झालेली स्थळे
अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, घारापुरी (एलिफंटा) लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको वास्तुकला (मुंबई) पम श्चिघाट.
नवीन शिफारस
सिंधुदुर्ग, लोहगड, विजयदुर्ग, पन्हाळा, रायगड या किल्ल्यांचा समावेश असणार आहे.
शिवरायांच्या किल्ल्यांचा वारसा यादीत समावेश
आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर छत्रपती शिवाजी महाराजच उभे राहतात. अशातच UNESCO कडून शिवरायांच्या किल्ल्यांचा वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आणि शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा सत्कारच आहे.
जुलै २०२४ मधील युनेस्कोच्या ४६व्या अधिवेशनात राज्याच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक सादरीकरण केले. त्यानंतर ICOMOS तज्ज्ञ ह्वाजोंग ली यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये सर्व १२ किल्ल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या स्थापत्य, संरक्षणयोजना आणि सांस्कृतिक मूल्यांचे मूल्यांकन केले. जिल्हा प्रशासन, वन विभाग व गडसंवर्धन समित्यांनीही आवश्यक सहकार्य केले.






