Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा’, मनसे आमदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला

‘350 वर्षानंतर ..पुन्हा तोच योग’ या आशयाच्या डोंबिवलीतील शिवजयंतीच्या देखाव्यात एका बाजूला भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण सुपूर्द करताना देखाव्यात दाखवण्यात आलं आहे.

  • By साधना
Updated On: Mar 11, 2023 | 12:07 PM
‘शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा’, मनसे आमदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : शिवजयंतीनिमित्त (Shivjayanti 2023) शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून डोंबिवली (Dombivali) शहर शाखेसमोर साकारण्यात आलेला देखावा सध्या डोंबिवलीमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.  ‘350 वर्षानंतर ..पुन्हा तोच योग’ या आशयाच्या या देखाव्यात एका बाजूला भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण सुपूर्द करताना देखाव्यात दाखवण्यात आलं आहे.

कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते,आहेत आणि राहतील.… https://t.co/2sEAaL9eyL pic.twitter.com/c4f36FQipJ

— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 10, 2023


हा देखावा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून हा देखावा सध्या डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरला आहे. या देखाव्याबाबत मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil Tweet) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे.

शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा! असा खोचक सल्ला दिलाय. राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते,आहेत आणि राहतील.… ”

या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टॅग केलं आहे. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना करणं चूक असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमधून अधोरेखित केलं आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

Web Title: Mns mla raju patil advise to cm eknath shinde for controling his workers nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2023 | 12:00 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan dombivali news
  • Marathi News
  • MNS MLA Raju Patil

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.