
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
शशी चक्र असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या आपले पती राहुल चक्र आणि दोन लहान मुलांसह कल्याण पूर्वेतील हनुमान नगर भागात राहत होत्या. बुधवारी परिसरात मुसळधार पाऊस सुरु होता. याच दरम्यान मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या. मात्र, रस्त्यावर महावितरणची मुख्य वीज वाहिनी उघड्यावर तुटून पडलेली होती. पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण परिसरात विजेचा करंट पसरला होता. या पाण्यातून जात असताना शशी चक्र यांना विजेचा जोरदार झटका बसला. हा शॉक इतका भीषण होता की, शशी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी ‘बंटी-बबली’ दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल…
पतीचा पोलिसांवर गंभीर आरोप
या प्रकरणाचा तपास डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस करत आहेत. पती राहुल चक्र यांनी पोलिसांवरच गंभीर आरोप करत आहे. “माझी पत्नी आम्हाला सोडून गेली, माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन लहान मुलं आईसाठी रडत आहेत. आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये कायदेशीर आणि शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेलो, तेव्हा तिथे असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आमच्याकडे थेट ‘खर्चा-पाणी’ देण्याची मागणी केली. हॉस्पिटलमध्ये काही खर्च करावा लागेल, आम्हाला काही द्यावं लागेल, असं तो म्हणाला.
महावितरणचे अधिकारी जबाबदार
पावसाळ्यापूर्वी महावितरणने उघड्या वीज वाहिन्या, उघडे डीपी बॉक्स दुरुस्त करणे बंधनकारक असतानाही हनुमान नगर भागात निष्काळजीपणा करण्यात आला. त्यामुळे या अपघाताला पूर्णपणे महावितरणचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत नागरिकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याची निष्पक्ष चौकशी करून त्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.
Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ
Ans: कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली.
Ans: रस्त्यावर पडलेल्या उघड्या वीजवाहिनीमुळे पावसाच्या पाण्यात पसरलेल्या विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला.
Ans: महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला असून, मृत महिलेच्या पतीने एका पोलीस कर्मचाऱ्यावर 'खर्चा-पाणी'ची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.