Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेचा राहुल गांधींना इशारा; म्हणाले, ‘सावरकरांबद्दल अपमानजनक बोलाल तर…’

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काही अपमानजनक बोलाल तर खपवून घेणार नाही, महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा स्पष्ट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 13, 2024 | 02:39 PM
मनसेचा राहुल गांधींना इशारा; म्हणाले, ‘सावरकरांबद्दल अपमानजनक बोलाल तर…’
Follow Us
Follow Us:

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रामध्ये आली आहे. यामुळे मनसेने कॉंग्रेस व राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काही अपमानजनक बोलाल तर खपवून घेणार नाही, महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा स्पष्ट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. माध्यमांशी संवाद साधत संदीप देशपांडे यांनी मुंबईतील सभेवरुन इशारा दिला.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या मुंबईतील सभेवरुन इशारा दिला आहे. देशपांडे म्हणाले, “छत्रपती शिवाजी पार्क हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर हे या मैदानाच्या जवळ आहे. तुम्ही महाराष्ट्रात येताय, तुमचं जे म्हणणं आहे ते मांडा, त्याला आमची ना नाही. पण इथे येऊन जर मागच्या वेळेसारखं स्वा. सावरकर यांच्याबद्दल कुठलंही अपमानजक वक्तव्य केलं किंवा काही अद्वातद्वा बोललात तर ही महाराष्ट्राची 14 कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही, महाराष्ट्रात येऊन शिवाजी पार्क मैदानात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलाल तर खपवून घेतलं जाणार नाही,” असा थेट इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

ठाकरे गटाला देखील मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी खडेबोल सुनावले आहेत. ‘आणि या कोल्ह्यांसोबत जे लांडगे सामील झाले आहेत, त्यांनीपण हे लक्षात ठेवावं, महाराष्ट्रात त्यांची मग काही खैर नाही. त्या कोल्हेकुईला साथ देणाऱ्या लांडग्यांनाच सांगतोय. आमचा इशारा आहे” अशा स्पष्ट शब्दांत मनसेने ठाकरे गटालाही सुनावले आहे. हा ईशारा देत असताना देशपांडे यांनी काँग्रेसचा कोल्हे म्हणून तर ठाकरे गटाचा लांडगे म्हणून उल्लेख केला.

Web Title: Mns sandeep deshpande warns congress leader rahul gandhi not to speak anything about swatantryaveer savarkar nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2024 | 02:38 PM

Topics:  

  • Congress
  • political news
  • Rahul Gandhi
  • Sandeep Deshpande

संबंधित बातम्या

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
1

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
2

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
3

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान
4

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.